IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर विराट कोहली याला आठवलं आपलं षटक, असाच गमावला होता सामना Watch Video

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही सामना कोण जिंकेल? असाच काहीसा सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात झाला. पण विराट कोहलीची जखम मात्र ओली झाली.

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर विराट कोहली याला आठवलं आपलं षटक, असाच गमावला होता सामना Watch Video
Video: राजस्थान रॉयल्सचा पराभवानंतर विराट कोहलीची मनस्थिती बिघडली! 4042 दिवसांपूर्वी असंच काही घडलं होतं Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 1:08 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रोमहर्षक सामन्यांची मेजवानी क्रीडारसिकांना मिळत आहे. काही विजय तर तोंडात बोटं घालायला लावणारे आहेत. रिंकु सिंहने शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून असाच विजय मिळवून दिला होता. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोण बाजी मारेल? सांगता येत नाही. असंच काहीसं सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात पाहायला मिळालं. राजस्थानने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 2 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनराईजर्स हैदराबादनं शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. पण सामना राजस्थाननं गमवला असला तरी विराट कोहलीची जखम मात्र ताजी झाली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा 18 व्या षटकापर्यंत विजय निश्चित होता. पण शेवटच्या दोन षटकांमुळे सामन्याचं चित्रच पालटलं. हैदराबादच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहलीची आठवण क्रीडा रसिकांना पडली आहे. कारण असंच काहीसं विराट कोहलीसोबत झालं होतं.आजपासून 4042 दिवसांपूर्वी आरसीबीसोबत झालं होतं. या पराभवासाठी विराट कोहली जबाबदार होता.

12 एप्रिल 2012 रोजी म्हणजेच आजपासून 4042 दिवसांपूर्वी आरसीबीने राजस्थान-हैदराबादप्रमाणे सामना गमावला होता. समोर चेन्नई सुपर किंग्स संघ होता. त्यावेळेस चेन्नईला शेवटच्या दोन षटकात 43 धावा करायच्या होत्या. त्या वेळेस संघाची धुरा डेनियल विटोरीकडे होती. त्याने विराट कोहलीकडे 19 वं षटक सोपवलं.

विराट कोहलीच्या षटकाचा सामना करण्यासाठी समोर एल्बी मॉर्कल होता. त्याने विराटच्या षटकाची धुलाई केली. एका षटकात 28 धावा केल्या. विराटच्या षटकावर मॉर्कलने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकले.

शेवटच्या दोन षटकात 43 धावा

विराट कोहलीने महागडं षटक टाकल्यानंतर आरसीबीला 15 धावा वाचवायच्या होत्या. पण मार्कल आणि जडेजा जोडीने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. म्हणजेच आरसीबीने शेवटच्या 2 षटकात 43 धावा दिल्या. आयपीएलच नाही तर टी 20 क्रिकेटमधला हा विक्रम आहे.

आरसीबी व्यतिरिक्त टी 20 ब्लास्टमध्ये ग्लूस्टरशर आणि या हंगामात गुजरात टायटन्सने शेवटच्या दोन षटकात 43-43 धावा दिल्या होत्या. तर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या दोन षटकात 41 धावा दिल्या.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.