MI IPL 2023 Playoff Scenario : मुंबईसाठी प्लेऑफच गणित कठीण, SRH विरुद्ध इतक्या रन्सनी हवा विजय

Mumbai Indians could get eliminated : एका पराजयाने सगळ समीकरण बदललं. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध हरुन मुंबई इंडियन्सने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारलीय. रनरेटमध्ये मुंबई RCB पेक्षा मागे आहे.

MI IPL 2023 Playoff Scenario : मुंबईसाठी प्लेऑफच गणित कठीण, SRH विरुद्ध इतक्या रन्सनी हवा विजय
MI IPL 2023 playoff raceImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 8:39 AM

मुंबई : IPL 2023 च पॉइंट्स टेबल आधीपासून इंटरेस्टिंग बनलय. लखनऊ विरुद्ध मुंबई मॅचनंतर ते आणखी रंगतदार झालय. लखनऊने मुंबई इंडियन्सला हरवलं. त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बरच काही बदललं. आता 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या टीमवर बाहेर होण्याचा धोका आहे. मुंबई इंडियन्सची टीम स्पर्धेबाहेर गेली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्ही विचार करत असाल, असं आम्ही का म्हणतोय?.

लखनऊकडून पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे 13 सामन्यात 14 पॉइंट्स आहेत. साखळी गटातील SRH विरुद्ध शेवटचा सामना जिकंला, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील.

मायनस, प्लसचा खेळ

चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्सने आपले उर्वरित एक-एक सामने जिंकले आणि RCB ने शेवटचे दोन सामने जिंकले, तर मुंबई इंडियन्सच बाहेर होणं निश्चित आहे. RCB आणि MI दोघांचे जास्तीत जास्त 16 पॉइंट्स होतील. अशावेळी रनरेटवर पेच फसेल. तिथे मुंबई इंडियन्सला फटका बसू शकतो. कारण मुंबईचा रनरेट मायनस आणि RCB चा प्लसमध्ये आहेत.

चांगल्या रनरेटसाठी मुंबईला किती रन्सनी जिंकावं लागेल

मुंबई इंडियन्सचा रनरेट कसा सुधारेल? हा आता प्रश्न आहे. त्यासाठी RCB ने आपले शेवटचे दोन सामने जिंकले, तर त्यांचं विजयाच मार्जिन 10 रन्सपेक्षा जास्त नको. त्याचवेळी मुंबईला SRH वर कमीत कमी 80 रन्सनी विजय मिळवावा लागेल, तरच मुंबई रनरेटच्या बाबतीत RCB च्या पुढे जाऊ शकते. असं होणं खूप कठीण आहे.

मुंबई इंडियन्सला प्रार्थनेची गरज

आपले उर्वरित दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये दाखल होणं हा मुंबई इंडियन्ससमोर सोपा मार्ग होता. आता एका पराभवामुळे मुंबई इंडियन्सला प्रार्थनाची गरज पडणार आहे. मुंबईला आता SRH विरुद्ध जिंकावच लागेल. त्याशिवाय CSK, LSG, RCB आणि PBKS यांचा उर्वरित सामन्यात पराभव व्हावा, यावर अवलंबून रहाव लागेल. दुसरी पण मॅच मुंबई हरली, तर पुढे काय?

मुंबई इंडियन्सने SRH विरुद्ध सामना गमावला, तर त्यांचे 14 पॉइंट्स राहतील. अशा स्थितीत RCB आणि PBKS चा एका सामन्यात पराभव व्हावा, यासाठी प्रार्थना करावी लागेल. RCB चा मोठा पराभव झाला, तर त्यांचा रनरेट कमी होईल.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.