IPL 2023 : Rinku Singh कडून मुलाची धुलाई पाहवली नाही, वडिलांनी लगेच उचलल हे पाऊल
IPL 2023 : गुजरातचा पुढचा सामना पाहण्यासाठी यशचे वडिल स्वत: स्टेडियममध्ये येणार आहेत. जेणेकरुन मुलाचा आत्मविश्वास वाढेल. सामन्यानंतर त्यांनी यशसोबत चर्चा केली.
IPL 2023 Rinku Singh News : कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये रविवारी धमाकेदार सामना झाला. गुजरात जिंकणार असं वाटत असतानाच, केकेआरच्या रिंकू सिंहने लास्ट ओव्हरमध्ये 5 सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला. रिंकूची बॅटिंग पाहून अनेकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नसेल. त्याने टीमला एका अद्भभूत विजय मिळवून दिला. रिंकूने मैदानाता सिक्सचा पाऊस पाडला.
रिंकूची बॅटिंग पाहून त्याचे कुटुंबीय, केकेआरचे फॅन्स नक्कीच खूश झाले असतील. पण त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि यश दयालसह त्याच्या कुटुंबीयांना दु:ख झालं.
यशच्या डोळ्याच अश्रू आले
रिंकू सिंह यश दयालची गोलंदाजी फोडून काढत असताना यशच्या वडिलांनी टीव्ही बंद केला. इतकच नाही, त्यांनी यशच्या मदतीसाठी नातेवाईकांना पाठवून दिलं. रिंकूने लास्ट ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स मारुन कोलकाताला विजय मिळवून दिला. रिंकूने लास्ट बॉलवर सिक्स मारताच यशच्या डोळ्याच अश्रू आले. त्यावेळी त्याचे वडिल चंद्रपाल यांनी टीव्ही बंद केला.
Everyone celebrating that 5 consecutive 6⃣ in the last over and praising Rinku Singh …… But hardly seen anyone talking about Yash Dayal who was having bad day and for his tough luck… ?? Both are gems and belong to Uttar pradesh #Rinku #YashDayal pic.twitter.com/GDSfShmJr5
— Saurabh Yadav (@Saurabhkry_45) April 10, 2023
मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वडिलांनी काय केलं?
यशच्या वडिलांनी मुलाच्या डोळ्यात अश्रू पाहून नातेवाईकांना मदतीसाठी पाठवून दिलं. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय. यशचे काका, काकी आणि चुलत बहिण मॅच पाहण्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये उपस्थित होते. चंद्रपाल यांनी भावाला यशला भेटून त्याचा आत्मविश्वात वाढवायला सांगितलं. गुजरातचा पुढचा सामना पाहण्यासाठी यशचे वडिल स्वत: स्टेडियममध्ये येणार आहेत. जेणेकरुन मुलाचा आत्मविश्वास वाढेल. सामन्यानंतर त्यांनी यशसोबत चर्चा केली. मोठ्या बॉलर्ससोबत असं झालय. त्यातून तुला शिकायला मिळेल. यशला असं घडवडं वडिलांनी
चंद्रपाल यांनी यशला त्याच्या चुकांवर काम करण्यास सांगितलं. यशला क्रिकेटच्या पीचपर्यंत पोहोचवण्यात त्याच्या वडिलांच महत्वाच योगदान आहे. सुरुवातीला यशला वडिलांचा सपोर्ट मिळाला नाही. पण नंतर त्यांनी मुलाची गोलंदाजी पाहिली व सपोर्ट केला. वयाच्या 12 व्या वर्षी यशने क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला.