IPL 2024 | हा घातक बॉलर आयपीएलला मुकणार, बोर्डाकडून बंदी!

IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमातील ऑक्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या ऑक्शनसाठी अनेक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहेत. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार बॉलर आयपीएल 17 व्या हंगामात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

IPL 2024 | हा घातक बॉलर आयपीएलला मुकणार, बोर्डाकडून बंदी!
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 7:45 PM

मुंबई | इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेची क्रिकेट चाहत्यांना कायम उत्सुकता असते.काही दिवसांपूर्वी एकूण 10 संघांनी आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमासाठी कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त खेळाडूंची यादी जाहीर केली. आयपीएल 2024 साठी काही दिवसातच ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएलने 3 नोव्हेंबर रोजी ऑक्शनची तारीख निश्चित केली. त्यानुसार दुबईत 19 डिसेंबर रोजी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी एकूण 1 हजार 166 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. एक घातक बॉलर 17 व्या मोसमाला मुकणार आहे. क्रिकेट बोर्डाने या गोलंदाजाला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नकार दिलाय.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला आयपीएल 2024 मध्ये खेळता येणार नाही. मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चर याला करारमुक्त केलं आहे. त्यानंतर आता जोफ्राला खेळता येणार नसल्याचं समजतंय. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर जोफ्राला आयपीएलच्या 17 व्या मोसमातून माघार घ्यायला सांगितल्याची माहिती समोर येत आहे. नियमांनुसार, प्रत्येक खेळाडूला विदेशातील क्रिकेट लीग स्पर्धेत खेळण्यासाठी बोर्डाची एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं.

मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चर याला 2022 मध्ये 8 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. जोफ्राला 2023 मध्ये दुखापतीमुळे संपूर्ण मोसमात खेळता आलं नाही. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. इतकंच नाही, तर जोफ्राचं 17 व्या मोसमातील ऑक्शनमध्ये नावही नाही. जोफ्राला क्रिकेट करिअरमध्ये अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जोफ्राला आयपीएलमध्ये खेळण्यापासून मज्जाव केल्याचंही म्हटलं जात आहे. आयपीएलनंतर लगेचच टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

जोफ्रा आर्चर याचं आयपीएल कारकीर्द

दरम्यान जोफ्रा आर्चर याने आतापर्यंत एकूण आयपीएलच्या 4 मोसमात खेळला आहे. जोफ्राने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. जोफ्राने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले आहेत. जोफ्राने याने 40 सामन्यांमध्ये 48 विकेट्स घेतल्या आहेत. जोफ्राने 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 20 विकेट्स घेतल्या होत्या. जोफ्राची ही एका मोसमातील सर्वोत्तम कामगिरी होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.