Ajinkya Rahane IPL Auction 2025 : अजिंक्य रहाणेला मोठा झटका, मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड
Ajinkya Rahane Unsold : मुंबईला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी मिळवून देणारा कॅप्टन अजिंक्य रहाणे मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियातील गेल्या दौऱ्यात विराट कोहली याच्या अनुपस्थितीत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अजिंक्य रहाणे गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियापासून दूर आहे. तसेच अजिंक्य रहाणे याच्याऐवजी श्रेयस अय्यर याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत मुंबईचं कर्णधार करण्यात आलं आहे. रहाणेची यंदाच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहाणेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली, असं म्हटलं जात असताना त्याला मोठा झटका लागला आहे. अजिंक्य रहाणे आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे. रहाणेची बेस प्राईज ही 2 कोटी होती. मात्र रहाणेला कोणत्याच टीमने आपल्या गोटात घेण्यात रस दाखवला नाही. परिणामी रहाणे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. त्यामुळे रहाणेचं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर आयपीएल करियरही संपल, असं म्हटलं जात आहे.
रहाणेसह आणखी कोणते कॅप्ड फलंदाज अनसोल्ड?
मेगा ऑक्शनमधील दुसऱ्या दिवसाला कॅप्ड बॅट्समन या सेटपासून सुरुवात झाली. या सेटमधील पहिले 2 फलंदाज अनसोल्ड राहिले. केन विलियमसन आणि ग्लेन फिलिप्स या दोघांना पहिल्या फेरीत कुणीच आपल्या ताफ्यात घेण्यास रस दाखवला नाही. त्यानंतर रोव्हमॅन पॉवेल याला केकेआरने दीड कोटींमध्ये घेतलं. दिल्लीने फाफ डु प्लेसीस याच्यासाठी 2 कोटी मोजले. त्यानंतर रहाणेचं नाव घेण्यात आलं. मात्र रहाणेसाठी कुणीच उत्साही दिसलं नाही. परिणामी रहाणे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला.
अजिंक्य रहाणेची आयपीएल कारकीर्द
अजिंक्य रहाणे याने आयपीएलमध्ये 185 सामने खेळले आहेत. रहाणेने या सामन्यांमधील 171 डावांमध्ये 123.42 च्या स्ट्राईक रेटसह आणि 30.14 च्या सरासरीने 30 अर्धशतक आणि 2 शतकांसह 4 हजार 642 धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे अनसोल्ड
Ajinkya Rahane remains UNSOLD! #TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
मुंबईला मोठा धक्का
दरम्यान अजिंक्य रहाणे याच्यानंतर मुंबईचा पृथ्वी शॉ हा देखील अनसोल्ड राहिला. पृथ्वीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कुणीच रस दाखवला नाही. पृथ्वीला तो अनसोल्ड राहिल याची शक्यता होतीच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पृथ्वीने त्याची बेस प्राईज ही 75 लाख रुपये इतकी ठेवली होती.