AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : गोलंदाजांची उघडपणे फसवणूक! बॅट घोटाळ्यामुळे धाबे दणादणले? नेमकं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळण घेत आहे. गुणतालिकेत उलथापालथ होत असताना एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे फलंदाजांच्या बॅट तपासणं भाग पडलं आहे. चला जाणून घेऊयात हे बॅट प्रकरण नेमकं आहे तरी काय?

IPL 2025 : गोलंदाजांची उघडपणे फसवणूक! बॅट घोटाळ्यामुळे धाबे दणादणले? नेमकं काय ते जाणून घ्या
सुनील नरीनImage Credit source: PTI
| Updated on: Apr 16, 2025 | 7:13 PM
Share

आयपीएल स्पर्धा म्हंटलं की गोलंदाजांची काही खैर नाही. चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहता गोलंदाजांना कुठे टप्पा टाकावा हे देखील कधी कधी कळत नाही. असं असताना बॅट प्रकरणाची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचे दोन मोठे खेळाडू अप्रमाणित बॅटसह पकडले गेले आहेत. सुनील नरीन आणि एनरिक नोर्त्जे यांच्या बॅट निर्धारित मानकांनुसार नव्हत्या. या दोघांच्या बॅटचे आकार ठरलेल्या मानकांनापेक्षा मोठ्या आढळून आल्या. त्यामुळे नरीन आणि नॉर्त्जे या दोघांना बॅट बदलाव्या लागल्या. पण खरंच या खेळाडूंना बॅट निर्धारित मानांकन माहिती नव्हतं का? मुद्दाम असं केलं तर नाही ना? जर जाणीवपूर्वक असं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पण बॅट घोटाळा होतो तरी कसा? फलंदाज गोलंदाजांना फसवतात तरी कसे? जाणून घ्या.

क्रिकेटमध्ये लांब षटकार मारण्यासाठी टायमिंग आणि चांगल्या बॅटचा वापर होतो. बॅट या इंग्लीश विलोपासून तयार होतात आणि त्यात पॉवर असते. पण बॅटची साईज जरा आणखी वाढवून घेतली तर फलंदाजांना फायदा होतो. यामुळे चेंडूवर प्रहार करणं लांब पोहोचवणं सोपं होतं. त्यामुळे लांब षटकार मारणं सोपं होतं. चला जाणून घेऊयात खेळाडू कसे आपल्या बॅटची जाडी वाढवतात.साधारणत: बॅटचा खालचा भाग हा जाड असतो. त्यामुळे फायदा असा होतो की बॅट स्विंग होते. तसेच फलंदाजाला फटके मारताना सहजता मिळते. खालच्या पट्ट्यात चेंडू लागला की लांब जातो.

फलंदाजांना बाद करण्यासाठी डेथ ओव्हरमध्ये जास्तीत जास्त यॉर्करचा वापर केला जातो. यामुळे फलंदाजी खालच्या बाजूला लागल्याने झेलबादही होतात. पण जर खालची बाजू जाड असेल तर यॉर्कर चेंडूवरही मोठे शॉट्स खेळू शकतात. यामुळे गोलंदाजांचं नुकसान होतं. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलमध्ये बॅट चेक करणं सुरु केलं आहे. चेकिंग मॅचपूर्वी ड्रेसिंग रुममध्ये होत होती. पण आता आता मैदाना किंवा डगआऊटमध्ये चेक केली जाते.

पंजाब कोलकाता सामन्यात दोन खेळाडूंना अशा बॅटसह पकडलं होतं. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्येही अशा पद्धतीने बॅट वापरणार्‍या खेळाडूंना पकडलं आहे. तेव्हा त्या खेळाडूंना दंड आणि त्यांच्या टीमचे गुणही कापले होते. आता आयपीएलमध्ये असं होणार की नाही हे बीसीसीआयच ठरवू शकते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.