AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनासारखं होत नाही…! कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर व्यक्त केली खंत, म्हणाला

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सची आठव्या स्थानावर घसरण झाली. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सची पुढची वाट बिकट होणार आहे. ऋतुराज गायकवाडने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

मनासारखं होत नाही...! कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर व्यक्त केली खंत, म्हणाला
Ruturaj Gaikwad CSKImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 05, 2025 | 9:33 PM
Share

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी हवी तशी होताना दिसत नाही. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध एकमेव विजय मिळवला आहे. असं असातना चेन्नई सुपर किंग्सची वाट बिकट होत जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 6 गडी गमवून 183 धावा केल्या. तसेच विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान चेन्नई सुपर किंग्ससाठी खूपच अवघड गेलं. आघाडीचे फलंदाज या धावांचा पाठलाग करताना झटपट बाद झाले. रचिन रविंद्र, डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा स्वस्तात बाद झाले. विजय शंकर त्यातल्या त्यात 54 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने 26 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या.

कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘गेल्या काही सामन्यांपासून ते आपल्या मनासारखे चालत नाहीये. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत पण आमच्या मनासारखे चालत नाहीये. निश्चितच खूप विकेट्स गमावल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी विभागातही ही एक मोठी चिंता आहे. आम्ही 15-20 धावा जास्त देत आहोत किंवा खूप विकेट्स गमावत आहोत. आम्ही प्रयत्न करत आहोत पण ते घडत नाहीये. मला वाटते की पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही थोडे जास्त चिंतेत आहोत किंवा संशयास्पद आहोत.’

दोन्ही संघाची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना.

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.