AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 CSK vs DC Live Streaming : चेन्नई पाहुण्या दिल्लीविरुद्ध भिडणार, यलो आर्मी घरच्या मैदानात जिंकणार?

Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Streaming: शनिवारी 5 एप्रिलला आयपीएलच्या 18 व्या मोसमात डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात लढत होणार आहे.

IPL 2025 CSK vs DC Live Streaming : चेन्नई पाहुण्या दिल्लीविरुद्ध भिडणार, यलो आर्मी घरच्या मैदानात जिंकणार?
CSK vs DC Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 04, 2025 | 10:16 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात होणार आहे. मात्र त्यानंतरही चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान असणार आहे. दिल्ली या पर्वात अंजिक्य आहे.दिल्लीने दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्लीचा हा तिसरा सामना असणार आहे. तर चेन्नईचा हा चौथा सामना आहे. चेन्नईला 3 पैकी एकच सामना जिंकता आला आहे. चेन्नईने विजयी सुरुवातीनंतर सलग दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईसमोर दिल्लीची विजयी घोडदौड रोखण्यासह विजयी ट्रॅकवर परतण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना केव्हा?

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना शनिवारी 5 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना कुठे?

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह मॅच पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

दिल्ली कॅपिटल्स टीम: जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, करुण नायर, डोनोवन फरेरा, त्रिपुराना विजय, दर्शन नळकांडे, दुष्मंथा चमीरा, केएल राहुल, टी नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल आणि माधव तिवारी.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.