AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs KKR : केकेआरच्या गोलंदाजांसमोर चेन्नईची दुरावस्था, कोलकातासमोर 104 धावांचं माफक आव्हान

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders 1st Innings Highlights : चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल इतिहासातील आतापर्यंतची घरच्या मैदानातील ही सर्वात निराशाजनक कामगिरी ठरली आहे. केकेआरविरुद्ध यलो आर्मीचे फलंदाज अपयशी ठरले.

CSK vs KKR : केकेआरच्या गोलंदाजांसमोर चेन्नईची दुरावस्था, कोलकातासमोर 104 धावांचं माफक आव्हान
Kolkata Knight Riders Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 11, 2025 | 10:02 PM
Share

चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दुरावस्था झाली आहे. सीएसकेच्या एकाही फलंदाजाला घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईच्या फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.चेन्नईने रडतखडत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. यासह चेन्नईची ही आयपीएलच्या इतिहासातील घरच्या मैदानातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. केकेआरला विजयासाठी 104 धावांचं सोपं आव्हान मिळालं आहे. आता केकेआरकडे या धावा झटपट पूर्ण करुन नेट रनरेट वाढवण्याची संधी आहे.

चेन्नईची घसरगुंडी

चेन्नईसाठी पहिल्या 5 पैकी रचीन रवींद्र याचा अपवाद वगळता 4 फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. रचीन रवींद्र 4 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी आणि विजय शंकर हे त्रिकुट चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करु शकले नाहीत. कॉनव्हे 12, त्रिपाठी 16 आणि विजय शंकर 29 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर तर चेन्नईच्या बॅटिंगची घसरगुंडी झाली. चेन्नईच्या 5 पैकी दोघांना भोपळाही फोडता आला नाही. रवींद्र जडेजा आणि दीपक हुड्डा या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर आर अश्विन, कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि नूर अहमद हे तिघे प्रत्येकी 1-1 धाव करुन आऊट झाले.

तर दुसऱ्या बाजूला अखेरपर्यंत शिवम दुबे याने एक बाजू लावून धरली. दुबेला चेन्नईच्या एकाही सहकाऱ्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र शिवमने संघर्ष केला. शिवमने 29 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 31 रन्स केल्या. शिवमने ही खेळी करत चेन्नईला 100 पार पोहचवलं आणि लाज राखली. तर अंशुल कंबोज 3 धावा करुन नाबाद परतला. तसेच केकेआरचे पाचही गोलंदाज यशस्वी ठरले. केकेआरसाठी सुनील नारायण याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर वैभव अरोरा आणि मोईन अली या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.