DC vs RCB : विराट कोहली-केएल राहुल भर सामन्यात भिडले, व्हीडिओ व्हायरल
Heated conversation between KL Rahul and Virat Kohli : टीम इंडियासाठी एकत्र खेळणारे विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांमध्ये आयपीएल 2025 मधील सामन्यात खटके उडाले. या दोघांमध्ये नक्की काय झालं? जाणून घ्या.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 46 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे या सामन्यात दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल आणि आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि ओपनर विराट कोहली या दोघांमध्ये वाद झालेल्या पाहायला मिळाला. हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावात आरसीबीच्या बॅटिंग दरम्यान घडला. कुलदीप यादव आरसीबीच्या डावातील आठवी ओव्हर टाकत होता. या ओव्हरदरम्यान केएल आणि विराट या दोघांमध्ये कोणत्या तरी विषयावरुन वादावादी झालेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराटला केएलने काहीतरी म्हटलेलं पटलं नाही. त्यामुळे विराट विकेटकीपर केएल सोबत बोलण्यासाठी स्टंपमागे गेला. विराट केएलसमोर उभा राहून सलग काही तरी बोलू लागला. विराट हातवारे करुन काही सांगत होता. तर दुसऱ्या बाजूला केएल विराटला स्पष्टीकरण देतोय, असं वाटत होतं. त्यांतर विराट पुन्हा स्टंप्ससमोर आला. मात्र त्यानंतरही दोघांमध्ये काही तरी सुरुच होतं. मात्र दोघांमध्ये नक्की हा वाद कशामुळे झाला? ते अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
आरसीबीची दिल्लीवर 6 विकेट्सने मात
दरम्यान अरुण जेटली स्टेडिममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दिल्लीने आरसीबीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे विजयी आव्हान 18.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आरसीबीने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 165 धावा केल्या. कृणाल पंड्या हा आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
विराट-केएल राहुलमध्ये लफडा!
Things are heating up in Delhi! 🔥#ViratKohli and #KLRahul exchange a few words in this nail-biting match between #DC and #RCB. 💪
Watch the LIVE action ➡ https://t.co/2H6bmSltQD#IPLonJioStar 👉 #DCvRCB | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2, Star… pic.twitter.com/Oy2SPOjApz
— Star Sports (@StarSportsIndia) April 27, 2025
कृणालने 47 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 73 रन्स केल्या. तर विराट कोहलीने 51 धावांची खेळी केली. कृणाल आणि विराट या दोघांनी आरसीबीच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. तसेच इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. आरसीबीचा हा या मोसमातील सातवा विजय ठरला.
आरसीबी एक नंबर
दरम्यान आरसीबीने या 7 व्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानी उडी घेतली. आरसीबीने 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या गुजरात टायटन्सला मागे टाकलं. त्यामुळे आता आरसीबीचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
