AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs RR Super Over : जैस्वाल-राणाची अर्धशतकी खेळी, मात्र राजस्थान 189 धावा करण्यात अपयशी, सामना बरोबरीत, आता सुपर ओव्हर

Delhi Capitals vs Rajasthan Royals Super Over : दिल्ली कॅपिट्ल्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीने राजस्थानला 188 धावांवर रोखलं. त्यामुळे सामना बरोबरी सुटला. त्यामुळे आता सामन्याचा विजेता संघ हा सुपर ओव्हरच्या माध्यमातून ठरणार आहे.

DC vs RR Super Over : जैस्वाल-राणाची अर्धशतकी खेळी, मात्र राजस्थान 189 धावा करण्यात अपयशी, सामना बरोबरीत, आता सुपर ओव्हर
Nitish Rana And Yashasvi Jaiswal DC vs RRImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 16, 2025 | 11:45 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 वा सामना हा बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरनंतर स्पष्ट होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. दिल्ली कॅपिट्ल्सने अरुण जेटली स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी चिवटपणे या धावांचा बचाव केला आणि सामना बरोबरीत रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता सुपर ओव्हरनंतर कोणता संघ यशस्वी ठरतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. अशाप्रकारे हा या मोसमातील टाय झालेला पहिलावहिला सामना ठरला.

राजस्थान 189 धावा करण्यात अपयशी

यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा या युवा फलंदाजांनी अर्धशतकी खेळी आणि राजस्थानला विजयाजवळ आणून ठेवलं. त्यामुळे राजस्थान जिंकेल, अशी स्थिती होती. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग केल्याने सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. राजस्थानकडून मैदानात ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर ही जोडी होती. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने 20 वी ओव्हर टाकली. राजस्थानला शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज होती. एक एक चेंडू कमी होत होता. तर दुसर्‍या बाजूला थरार वाढत होता. राजस्थानला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. मात्र राजस्थान 2 धावा करण्यात अपयशी ठरली.

ध्रुव जुरेलने शेवटच्या बॉलवर फटका मारला. ध्रुवने 1 धाव पूर्ण केली. त्यानंतर ध्रुव दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने धाव घेतली. मात्र अक्षर पटेल याने अचूक थ्रो केला. अक्षरचा हा थ्रो विकेटकीपर केएल राहुल याने अचूक पकडला आणि ध्रुवला रन आऊट केलं. अशाप्रकारे सामना 20 ओव्हरनंतर 4 बाद 188 धावांवर बरोबरी सुटला आणि या 18 व्या सिजनमधील पहिली मॅच टाय झाली.

18 व्या ओव्हरमधील पहिली सुपरओव्हर

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी 51-51 धावा केल्या. रियान पराग याने 8 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन याने 31 धावांचं योगदान दिलं. शिमरॉन हेटमायर 15 धावांवर नाबाद परतला. तर ध्रुव जुरेल राजस्थानच्या डावातील शेवटच्या चेंडूवर 26 धावांवर रनआऊट झाला आणि सामना बरोबरीत सुटला. दिल्लीकडून कुलदीप यादव, मिचेल स्टार्क आणि कर्णधार अक्षर पटेल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.