AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI : कॅप्टन हार्दिकला पराभवासह दुहेरी झटका, पुन्हा नको ती चूक, बीसीसीआयकडून दणका

Gujarat Titans vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्याकडून गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात एक चूक झाली. हार्दिकला ही चूक चांगलीच महागात पडली आहे.

GT vs MI : कॅप्टन हार्दिकला पराभवासह दुहेरी झटका, पुन्हा नको ती चूक, बीसीसीआयकडून दणका
Hardik Pandya Mi IplImage Credit source: PTI
| Updated on: Mar 30, 2025 | 6:46 PM
Share

गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 29 मार्चला मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी विजय मिळवला. गुजरातने यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं. गुजरातचा हा या मोहिमेतील दुसरा सामना होता. तर गुजरातला पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याला मोठा झटका लागला आहे. हार्दिक पंड्याला एका चुकीमुळे लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयने हार्दिकवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे हार्दिकला 12 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

हार्दिकवर स्लो ओव्हर रेटमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कर्णधार हार्दिक गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत 20 ओव्हर पूर्ण करण्यात अपयशी ठरला. नियमानुसार, ठराविक वेळेत 20 ओव्हर होणं बंधनकारक असतं. मात्र तसं न झाल्याने हार्दिकला दंड ठोठवला गेला. आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

हार्दिकला दणका

आयपीएल कोड ऑफ कंडक्टमध्ये, 2.2 या नियमात स्लो ओव्हर रेटसाठी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. हार्दिकची यंदाच्या मोसमातील ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे हार्दिकला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे”, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान गुजरातने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 160 धावाच करता आल्या.

हार्दिकला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.