AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 4 धावांनी विजय

आयपीएल 2025 स्पर्धेतली 21वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 238 धावांचं बलाढ्य आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं.

KKR vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 4 धावांनी विजय
| Updated on: Apr 08, 2025 | 7:28 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 21वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. या खेळपट्टीचा लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. 20 षटकात 3 गडी गमवून 238 धावा केल्या आणि विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं. यावेळी मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी आक्रमक खेळी केली. मिचेलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 38 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण कोलकात्याच्या फलंदाजांनी तशीच साजेशी खेळी केली. पण धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही. रिंकु सिंहने शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करत सामन्यात येण्याचा प्रयत्न केला. पण तसं काही शक्य झालं नाही.

कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 234 धावा केल्या. पण विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यरने चांगली खेळी केली. अजिंक्य रहाणेने 35 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 61 धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने 29 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 45 धावा केल्या. तर रिंकु सिंहने 15 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 38 धावा केल्या. रिंकु सिंहने विजय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. पण आवेश खानच्या षटकात दोन बॉल डॉट गेल्याने प्रेशर वाढलं. तसेच शेवटच्या चेंडूवर चौकार आल्याने स्ट्राईक बदलली आणि गणित चुकलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी.

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...