AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 KKR vs PBKS : पंजाब किंग्सने मैदान मारलं! 111 धावा विजयासाठी देऊनही कोलकात्याला रोखलं

आयपीएल 2025 स्पर्धेतील 31वा सामन्यात पंजाब किंग्सने गेलेला सामना परत मिळवला. या सामन्यात गोलंदाजांनी चॅम्पियन्ससारखी खेळी केली. पंजाबने मागच्या सामन्यात पराभवामुळे लय गमावली होती. पण पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आली आहे. पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेलं 112 धावांचं आव्हान रोखून दाखवलं.

IPL 2025 KKR vs PBKS : पंजाब किंग्सने मैदान मारलं! 111 धावा विजयासाठी देऊनही कोलकात्याला रोखलं
पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सImage Credit source: Punjab Kings Twitter
| Updated on: Apr 16, 2025 | 12:13 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला धोबीपछाड दिला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. मात्र असं होऊनही सर्व काही चुकत गेलं. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. इतकंच काय तर पंजाब किंग्स संघाला 20 षटकंही पूर्ण खेळता आली नाही. पंजाबचा संघ 15.3 षटकात 111 धावांवर ऑलआऊट झाला. कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 112 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान कोलकाता सहज गाठेल असं वाटत होतं. पण पंजाबने तसं होऊ दिलं नाही. पॉवर प्लेमध्ये दोन मोठे धक्के दिले. पंजाब किंग्सने कमबॅकसाठी सर्वस्वी पणाला लावलं होतं. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांना धाव सावरला आणि सावध खेळी केली. पण ही जोडी फुटली आणि सर्व काही धडाधड कोसळलं.

कोलकाता नाईट रायडर्सकडून क्विंटन डी कॉक आणि सुनील नरीन ही जोडी मैदानात आली होती. पण सुनील नरीन 4 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकही काही खास करू शकला नाही. डी कॉक फक्त 2 धावा करून बाद झाला. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी साजेशी खेळी केली. पॉवर प्लेमध्ये 55 धावांपर्यंत मजल मारून अर्ध लक्ष्य गाठलं होतं. 62 धावांपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. कोलकात्याचा संपूर्ण संघ 95 धावांवर बाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सर्वच गोलंदाजांना कमाल केली होती. हार्षित राणाच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाब बॅकफूटवर गेली. हार्षित राणाने 3 षटकात 25 धावा देत 3 गडी बाद केले. तर वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 21 धावा देत 2 गडी टिपले. सुनील नरीनला फलंदाजीत काही खास करता आलं नाही. पण गोलंदाजीत कमाल केली. त्याने 3 षटकात 14 धावा देत दोन गडी बाद केले. तर वैभव अरोरा आणि एनरिक नोर्त्जेने प्रत्येकी 1 गडी बाद केला. पण या सर्वांवर युझवेंद्र चहल भारी पडला. त्याने पंजाबला या सामन्यात कमबॅक करण्यात यश मिळवलं.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.