AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 LSG vs CSK Live Streaming: गुरु-शिष्य आमेनसामने, चेन्नईसमोर लखनौचं आव्हान, सीएसकेसाठी ‘करो या मरो’ स्थिती

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Streaming: सलग 5 सामने गमावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ससमोर लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे. चेन्नईसाठी हा सामना अटीतटीचा आहे.

IPL 2025 LSG vs CSK Live Streaming: गुरु-शिष्य आमेनसामने, चेन्नईसमोर लखनौचं आव्हान, सीएसकेसाठी 'करो या मरो' स्थिती
csk ms dhoni and lsg huddle talk ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 13, 2025 | 4:02 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 30 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात गुरु-शिष्य यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे. तर महेंद्रसिंह धोनी याच्याकडे चेन्नई सुपर किंगसच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे अनुभवी धोनीसमोर तुलनेने नवख्या पंतच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

लखनौ आणि चेन्नई दोन्ही संघांचा हा या मोसमातील सातवा सामना असणार आहे. लखनौने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तसेच लखनौने गेल्या 3 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. तर दुसर्‍या बाजूला चेन्नईने सलग 5 सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईसमोर पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान असणार आहे. तर लखनौचा सलग 3 विजयांमुळे विश्वास दुणावलेला आहे. अशात आता दोघांपैकी कोण वरचढ ठरतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना सोमवारी 14 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमम, लखनौ येथे आयोजित करण्यात आला आहे.

लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.

लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.