AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs DC Toss : दिल्लीने लखनौविरुद्ध सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकला, कॅप्टन अक्षर पटेलचा असा निर्णय

Lucknow Super Giants vs Delhi Capitals Toss : दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांची आयपीएल 2025 मध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. दिल्लीने या सामन्यात टॉस जिंकला आहे.

LSG vs DC Toss : दिल्लीने लखनौविरुद्ध सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकला, कॅप्टन अक्षर पटेलचा असा निर्णय
LSG vs DC Toss IPL 2025Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 22, 2025 | 7:39 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात अक्षर पटेल हा दिल्लीचं तर ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करत आहे. लखनौ आणि दिल्ली दोन्ही संघांची ही या मोसमातील साखळी फेरीत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ ठरली आहे. दिल्ली आणि लखनौ 24 मार्चनंतर पु्न्हा एकमेकांसमोर आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीने टॉस जिंकला. दिल्लीची लखनौविरुद्ध सलग टॉस जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. कर्णधार अक्षर पटेल याने लखनौविरुद्ध पुन्हा फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेतला आहे. अक्षरने 24 मार्चलाही लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं होतं.

दिल्लीकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

दिल्ली कॅपिट्ल्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. दिल्लीने दुश्मंता चमीरा याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर मोहित शर्मा या सामन्यात खेळणार नाहीय. तर दुसऱ्या बाजूला लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ  पराभवाची परतफेड करणार का?

दरम्यान दिल्लीने 24 मार्चला लखनौवर अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगतदार झालेल्या सामन्यात 1 विकेटने विजय मिळवला होता. त्यामुळे आता जवळपास महिन्याभराने दोन्ही संघ आमनेसामने आहेत. लखनौकडे या घरच्या मैदानात विजय मिळवून दिल्लीविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. आता यात लखनौ यशस्वी ठरणार की दिल्ली सलग दुसऱ्यांदा विजयी होणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दिल्लीचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रिन्स यादव.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमी आणि, मुकेश कुमार.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.