LSG vs GT : आयुष बदोनीची Impact खेळी, लखनौची विजयी हॅटट्रिक, गुजरातला रोखण्यात यशस्वी
Lucknow Super Giants vs Gujarat Titans Match Result : लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंत याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सला पराभूत करत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.

अखरेच्या क्षणी इम्पॅक्ट प्लेअर आयुष बदोनी (Ayush Badoni) याने केलेल्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) घरच्या मैदानात आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. लखनौने गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) 6 विकेट्सने धमाकेदार विजय साकारला. लखनौने यासह गुजरातला सलग पाचवा विजय मिळवण्यापासून पद्धतशीर रोखलं. गुजरातने लखनौला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनौने हे आव्हान 3 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनौने 19.3 ओव्हरमध्ये 186 रन्स केल्या.
लखनौची बॅटिंग
कर्णधार ऋषभ पंत आणि एडन मारक्रम या सलामी जोडीने लखनौला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. मारक्रम आणि पंत जोडीने 65 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पंत आऊट झाला. पंतने 18 बॉलमध्ये 4 चौकारांसह 21 धावांची खेळी केली. पंतनंतर निकोलस पूरन मैदानात आला. मारक्रम आणि पूरन या दोघांनी फटकेबाजी केली. दोघांनी मैदानात चौफेर फटके मारले. मारक्रमने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. मारक्रम-पूरन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. मारक्रम 58 धावांवर आऊट झाला.
आयुष बदोनीची निर्णायक खेळी
मारक्रमनंतर लखनौने काही षटकानंतर तिसरी विकेट गमावली. निकोलस पूरन आऊट झाला. पूरनने 34 चेंडूत 61 धावा केल्या. मारक्रम-पूरन सेट जोडी आऊट झाल्याने डेव्हिड मिलरकडून विजयी खेळीची अपेक्षा होती. मात्र मिलरने निराशा केली. मिलर निर्णायक क्षणी 7 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे लखनौला शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती. मैदानात इमपॅक्ट प्लेअर आयुष बदोनी आणि अब्दुल समद जोडी होती. समदने पहिल्या बॉलवर सिंगल घेत आयुषला स्ट्राईक दिली. त्यानंतर आयुषने दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला. त्यामुळे स्कोअर लेव्हल झाला. आयुषने तिसऱ्या बॉलवर सिक्स ठोकला आणि लखनौला सलग तिसरा विजय मिळवून दिला. आयुषने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. तर समद 2 रन्स करुन नॉट आऊट परतला. गुजरातकडून प्रसिध कृष्णा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर राशीद खान आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.
