AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ipl Mega Auction : विराटसोबत पंगा घेणारा तो खेळाडू अनसोल्ड, 18 सामन्यांनंतरच आयपीएल करियर संपलं!

PL 2025 Mega Auction Unsold : 25 वर्षांचा युवा आणि वेगवान गोलंदाज आयपीएल 18 व्या मोसमातील मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे.

Ipl Mega Auction : विराटसोबत पंगा घेणारा तो खेळाडू अनसोल्ड, 18 सामन्यांनंतरच आयपीएल करियर संपलं!
ipl virat kohli rcb celebrationImage Credit source: PTI
| Updated on: Nov 25, 2024 | 10:35 PM
Share

आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये आतापर्यंत अनेक कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचं नशिब फळफळलं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडू हे दुर्देवी ठरले आहेत. मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबरला भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूही अनसोल्ड राहिले. टीम इंडिया आणि आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्यासह एकेकाळी भरमैदानात भिडणारा खेळाडू दुर्देवी ठरला आहे. या खेळाडूला कोणत्याच फ्रँचायजीने आपल्या ताफ्यात घेतलं नाही. तो खेळाडू कोण आहे? जाणून घेऊयात.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक हा अनसोल्ड राहिला आहे. नवीन उल हक याच्यावर कुणी बोलीही लावली नाही. नवीनची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती. मात्र 10 पैकी एकाही फ्रँचायजीला नवीनला आपल्या गोटात घ्यावसं वाटलं नाही. याच नवीन उल हक याने आयपीएलच्या 16 व्या हंगामात विराट कोहलीसोबत पंगा घेतला होता.

आयपीएलच्या 16 व्या हंगामात लखनऊ विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामन्यात नवीनने विराटसोबत पंगा घेतला होता. नवीन तेव्हा लखनऊ टीमकडून खेळत होता. विराट आणि नवीन यांच्यात भरमैदानात शा‍ब्दिक वादावादी पाहायला मिळाली होती. त्यानंतर लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीर याने या वादात उडी घेतली आणि विराटसोबत भिडला होता. त्यानंतर काही महिन्यांनी विराट आणि नवीन या दोघांमध्ये सर्वकाही निट झालं. मात्र आता नवीन अनसोल्ड राहिल्याने साऱ्या क्रिकेट चाहत्यांना अफगाणी क्रिकेटरने विराटसोबत घेतलेला पंगा आठवला.

नवीनची आयपीएल कारकीर्द

नवीन उल हक याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले आहेत. नवीन 2023 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. नवीनने आतापर्यंत 18 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र लखनऊने त्याला रिटेन केलं. त्यामुळे नवीन ऑक्शनमध्ये उतरला. मात्र नवीनला कोणत्याच टीमने घेतलं नाही. त्यामुळे नवीनचं 18 सामन्यानंतरच आयपीएल करियर संपलं, असं म्हटलं जात आहे.

नवीन उल हक अनसोल्ड

वनडे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती

दरम्यान नवीन उल हक याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र नवीन टी 20 क्रिकेट खेळतोय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.