IPL 2025 : या खेळाडूसाठी तीन संघांनी लावली फिल्डिंग, कोट्यवधि रुपये खर्च करण्याची तयारी

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव जसा जवळ येत आहे. तसा खेळाडूंना संघात घेण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. असाच एक खेळाडू तीन फ्रेंचायझींना हवा आहे. त्यासाठी कोट्यवधि रुपयांची किंमत मोजण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.

IPL 2025 :  या खेळाडूसाठी तीन संघांनी लावली फिल्डिंग, कोट्यवधि रुपये खर्च करण्याची तयारी
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 3:05 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी 31 ऑक्टोबरपर्यंत सुपूर्द करायची आहे. त्यानंतर मेगा लिलावात इतर खेळाडूंवर बोली लागणार आहे. फ्रेंचायझी खेळाडूंसाठी हवी तितकी रक्कम मोजण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, मुंबई इंडियनस, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरसाठी फिल्डिंग लावली आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी फ्रेंचायझींची आहे. वॉशिंग्टन सुंदर सध्या सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. पण त्याला रिटेन करण्याची शक्यता फारच कमी आहे. पण राइट टू मॅट कार्डचं वापर करून त्याला सनरायझर्स हैदराबाद विकत घेऊ शकते. दरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी एक वेळा जेतेपद पटकावलं आहे. पण वॉशिंग्टन सुंदरची इतकी डिमांड का आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला तर या मागचं कारण जाणून घ्या

वॉशिंग्टन सुंदर मागच्या दोन वर्षात जबरदस्त फॉर्मात आहे. अष्टपैलू म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. ऑफ स्पिनरसह तो टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. इतकंच काय तर सुंदर नव्या चेंडूनेही गोलंदाजी करू शकतो. त्याचा टी20 क्रिकेटमधील इकोनॉमी रेड हा जबरदस्त आहे. वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत खेळलेल्या 52 टी20 सामन्यात 47 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रे हा 6.87 प्रति ओव्हर आहे. त्यामुळे इतक्या ताकदीचा खेळाडू संघात आला की क्षमता वाढेल यात शंका नाही.

वॉशिंग्टन सुंदरने आयपीएल 2017 मध्ये डेब्यू केलं होतं. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. त्यानंतर 2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत त्याला स्थान मिळालं. चार वर्षे या संघासोबत खेळल्यानंतर मागच्या तीन पर्वात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. आयपीएलच्या 58 टी20 सामन्यात त्याने 37 विकेट घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीतही चांगला आहे. पण त्याला आयपीएलमध्ये टॉप ऑर्डरला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.