Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RCB Score And Highlights IPL 2025: आरसीबीने स्पर्धेत विजयाने केली सुरुवात, केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा

| Updated on: Mar 23, 2025 | 12:48 AM

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Score And Highlights in Marathi: आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर मात करत विजयी सलामी दिली आहे.

KKR vs RCB Score And Highlights IPL 2025: आरसीबीने स्पर्धेत विजयाने केली सुरुवात, केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा
Image Credit source: TV9 Network

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) ‘रन’संग्रमाला शनिवारी 22 मार्चपासून सुरुवात झाली. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने होते. या सामन्यात आरसीबीने गतविजेता कोलकातावर विजय मिळवला. केकेआरने आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. आरसीबीसाठी विराट कोहली याने विजयात प्रमुख भूमिका बजावली. विराटने नाबाद 59 धावा केल्या. तर फिलीप सॉल्ट याने 56 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार रजत पाटीदार याने 16 बॉलमध्ये 34 धावांची झंझावाती खेळी केली.

त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केेकेआरसाठी सुनील नारायण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर केकेआरचा डाव गडगडला. त्यामुळे केकेआरला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. केकेआरला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 174 धावाच करता आल्या. केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. तर सुनील नारायण याने 44 धावा जोडल्या. तर अंगकृष रघुवंशी याने  30 धावांची निर्णायक खेळी केली. मात्र इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. परिणामी केकेआरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे आरसीबीने 175 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Mar 2025 10:46 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: आरसीबीने केकेआरला पहिल्याच सामन्यात लोळवलं

    आरसीबीने पहिल्या सामन्यात आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात विजयासाठी दिलेलं 175 धावांचं आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं.

  • 22 Mar 2025 10:40 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : सॉल्टनंतर विराटचं अर्धशतक, आरसीबी विजयाच्या उंबरठ्यावर

    आरसीबीच्या फिल सॉल्टनंतर विराट कोहली याने अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे आरसीबी विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

  • 22 Mar 2025 10:22 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : आरसीबीला दुसरा धक्का, पडीक्कल माघारी

    आरसीबीने दुसरी विकेट गमावली आहे. देवदत्त पडीक्कल 10 धावा करुन माघारी परतला आहे.

  • 22 Mar 2025 10:17 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : आरसीबीच्या 10 ओव्हरनंतर 104 धावा

    आरसीबीने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 104 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल ही जोडी खेळत आहे. तर फिल सॉल्ट 56 धावा करुन आऊट झाला.

  • 22 Mar 2025 10:01 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : आरसीबीच्या पावर प्लेनंतर बिनबाद 80 धावा, विराट-सॉल्टकडून कडक सुरुवात

    आरसीबीने केकेआरविरुद्ध 175 धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली आहे. आरसीबीने पावर प्लेमधील 6 ओव्हरमध्ये बिनबाद 80 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि फिल सॉल्ट या दोघांनी आरसीबीला कडक सुरुवात करुन दिली आहे. विराट 29 आणि सॉल्ट 49 रन्सवर नॉट आऊट आहेत.

  • 22 Mar 2025 09:29 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी विराट-सॉल्ट जोडी मैदानात

    विजयी धावांचा पाठलाग करण्याासाठी विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली आहे.

  • 22 Mar 2025 09:13 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: कोलकात्याचं आरसीबीसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान

    कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं आहे. कोलकात्याकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली.

  • 22 Mar 2025 09:08 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : केकेआरला सातवा धक्का

    बंगळुरुने केकेआरला सातवा झटका दिला आहे. अंगकृष रघुवंशी 30 धावा करुन माघारी परतला.

  • 22 Mar 2025 08:54 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : केकेआरला सहावा झटका, आंद्रे रसेल आऊट

    आरसीबीने फिरकी गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात दणक्यात कमबॅक केलं आहे. आरसीबीच्या फिरकीपटूंनी स्फोटक रिंकू सिंह याच्यानंतर आंद्रे रसेल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

  • 22 Mar 2025 08:36 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : केकेआरला चौथा झटका, वेंकटेश अय्यर आऊट

    केकेआरने चौथी विकेट गमावली आहे. उपकर्णधार वेंकटेश अय्यर 6 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 22 Mar 2025 08:28 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : रहाणे आऊट, केकेआरला तिसरा झटका, आरसीबीचं कमबॅक

    आरसीबीने झटपट 2 विके्टस घेत सामन्यात कमॅबक केलं आहे. कृणाल पंड्या याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला 56 धावांवर आऊट केलं. त्याआधी सुनील नारायण 44 धावा करुन बाद झाला. अशाप्रकारे केकेआरने 3 विकेट्स गमावल्या आहेत.

  • 22 Mar 2025 08:24 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : सुनील नारायण आऊट, केकेआरला दुसरा झटका

    केकेआरने दुसरी विकेट गमावली आहे. ओपनर सुनील नारायण 26 बॉलमध्ये 44 रन्स करुन आऊट झाला आहे.

  • 22 Mar 2025 08:02 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025 : केकेआरच्या 6 ओव्हरनंतर 60 रन्स

    केकेआरने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये अफलातून सुरुवात केली आहे. केकेआरने 1 विकेट गमावून 10 च्या रन रेटने 60 धावा केल्या आहेत. फिल सॉल्ट याच्या रुपात केकेआरने पहिली आणि एकमेव विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन रहाणे आणि सुनील नरीन या दोघांनी फटकेबाजी करत टीमला 60 धावांपर्यंत पोहचवलं.

  • 22 Mar 2025 07:37 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: पहिल्याच षटकात केकेआर धक्का, फक्त चार धावा करून डीकॉक बाद

    पहिल्या षटकात कोलकात्याला धक्का बसला आहे. क्विंटन डीकॉकला जीवदान मिळालं होतं. पण त्याचा फायदा उचलण्यात अपयशी ठरला आणि 4 धावा करून बाद झाला.

  • 22 Mar 2025 07:22 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: दोन्ही संघांची प्लेइंग 11

    कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

    रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

  • 22 Mar 2025 07:19 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला…

    केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘या संघाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. आमची तयारी चांगली झाली आहे, कोअर ग्रुपही तसाच आहे. आधी चांगली फलंदाजी करण्याची आणि नंतर बचाव करण्याची अपेक्षा आहे. हे सर्व खेळाडूंना स्वातंत्र्य देण्याबद्दल आणि त्यांना एक संघ म्हणून खेळण्याची परवानगी देण्याबद्दल आहे. आम्ही ३ वेगवान गोलंदाज आणि 3 फिरकीपटू खेळवत आहोत.’

  • 22 Mar 2025 07:18 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदार म्हणाला..

    रजत पाटीदार म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, खेळपट्टी कठीण दिसत आहे. आरसीबीचे नेतृत्व करणे आश्चर्यकारक आहे आणि महान खेळाडूंकडून शिकण्याची उत्तम संधी आहे. आम्ही गेल्या 10-15 दिवसांपासून योग्य तयारी केली आहे. या प्रभावशाली खेळाडूबद्दल मी गोंधळलो आहे. आम्ही 4 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूंसह जात आहोत.’

  • 22 Mar 2025 07:16 PM (IST)

    KKR vs RCB Live Score, IPL 2025: नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

    आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव फॅक्टर लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. पण नव्या नियमानुसार दुसऱ्या डावात 10 षटकानंतर दुसरा चेंडू वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे या सामन्यानंतर एक वेगळाच ट्रेंड सेट होईल यात काही शंका नाही.

  • 22 Mar 2025 07:04 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : विराट आणि रिंकू शाहरुखच्या गाण्यांवर नाचले

    शाहरुख खानने सर्वप्रथम विराट कोहलीला स्टेजवर बोलावले आहे. सलग १८ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. याशिवाय, शाहरुखने रिंकूलाही स्टेजवर बोलावले आहे आणि त्याच्याशी बोलला. यानंतर दोघांनीही शाहरुखच्या गाण्यांवर नाच केला.

  • 22 Mar 2025 06:48 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : दिशा पाटनी आणि करुन औजला यांचा परफॉर्मन्स

    श्रेया घोषालनंतर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या नृत्याने चाहत्यांचे मनोरंजन केलं. त्यांच्यानंतर आता पंजाबी गायक करण औजला याने त्याच्या हिट गाण्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.

  • 22 Mar 2025 06:15 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : बॉलिवूडमधील आघाडीची गायिका श्रेया घोषालकडून रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात

    बॉलिवूडमधील आघाडीची गायिका श्रेया घोषाल हीने रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. श्रेयाने आपल्या आवाजाने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.

  • 22 Mar 2025 06:09 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात

    आयपीएलच्या 18 व्या मोसमआधी रंगारंग कार्यक्रमाचा थरार पार पडणार आहे. या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.  या रंगारंग कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार हे परफॉर्मन्स करणार आहेत.

  • 22 Mar 2025 05:17 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : कोलकातामध्ये 10 वर्षांनंतर ओपनिंग सेरेमनी

    कोलकाताची तब्बल 1 दशकानंतर ओपनिंग सेरेमनीची प्रतिक्षा संपली आहे. कोलकाताला याआधी 10 वर्षांपूर्वी रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्याची संधी मिळाली होती. त्याचं कारणही तसंच आहे. कारण कोलकाता गतविजेता आहे. कोलकाताने 2014 नंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकलीय.

  • 22 Mar 2025 04:23 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : बॉलिवूड किंग शाहरुख खान ओपनिंग सेरेमनीत होणार सहभागी

    बॉलिवूड किंग आणि कोलकाता टीमचा मालक शाहरुख खान हा ओपनिंग सेरेमनीत सहभागी होणार आहे. आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली.

    ‘किंग खान’ ओपनिंग सेरेमनीत सहभागी होणार

  • 22 Mar 2025 04:08 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : दिशा पटानी, श्रेया घोषाल आणि करण औजलाच्या परफॉर्मन्सची चाहत्यांना प्रतिक्षा

    आयपीएलच्या 18 व्या हंगामाआधी श्रेया घोषाल आणि करण औजला हे त्यांच्या परफॉर्मन्सने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकतील. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील उद्घाटन समारंभात उपस्थित असणार आहे. आयपीएलकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

  • 22 Mar 2025 03:58 PM (IST)

    IPL 2025 Opening Ceremony Updates : क्रिकेट चाहत्यांना ओपनिंग सेरेमनीची प्रतिक्षा

    आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात शनिवारी 22 मार्चला कोलकाता विरुद्ध बंगळुरु भिडणार आहेत. त्याआधी होणाऱ्या ओपनिंग सेरेमनीकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. अनेक कलाकार या ओपनिंग सेरेमनीत आपल्या परफॉर्मन्सने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Published On - Mar 22,2025 3:57 PM

Follow us
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.