AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Orange Cap : श्रेयस अय्यरची दुसऱ्या स्थानी झेप, निकोलस पूरनला थेट आव्हान, ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढत

Ipl 2025 Orange Cap List : श्रेयस अय्यर याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. श्रेयसने या खेळीसह निकोलस पूरनला थेट आव्हान दिलं आहे.

IPL 2025 Orange Cap : श्रेयस अय्यरची दुसऱ्या स्थानी झेप, निकोलस पूरनला थेट आव्हान, ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढत
Shreyas Iyer Punjab Kings Captain IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2025 | 5:43 PM
Share

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 1 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या (Lucknow Super Giants) सामन्यात स्फोटक खेळी केली. श्रेयसने 172 धावांचा पाठलाग करताना 30 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 52 रन्स केल्या. श्रेयसने या खेळीसह ऑरेंज कॅपच्या (IPL 2025 Orange Cap) शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. श्रेयस थेट 12 स्थानांची झेप घेतली आहे. श्रेयस 14 वरुन दुसर्‍या स्थानी पोहचला आहे. श्रेयस दुसऱ्या स्थानी पोहचल्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी असलेल्या निकोलस पूरन (Nicholas Pooran) याचं टेन्शन वाढलं आहे. श्रेयसने दुसऱ्या स्थानी झेप घेत पूरनची डोकेदुखी वाढवली आहे.

श्रेयस अय्यर लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याआधी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आसपासही नव्हता. श्रेयस 14 व्या क्रमांकावर होता. मात्र एका खेळीसह सर्व चित्रच बदललं. श्रेयसच्या नावावर अवघ्या 2 सामन्यांमध्ये 149 धावा झाल्या आहेत. तर पूरनने श्रेयसच्या तुलनेत 1 सामना जास्त खेळला आहेत. पूरन 3 सामन्यात 189 धावांसह पहिल्या स्थानी आहे. पूरनने पंजाबविरुद्ध 30 बॉलमध्ये 44 धावा केल्या. पूरन या खेळीसह ऑरेंज कॅप स्वत:कडे ठेवण्यात यशस्वी ठरला.

अनिकेत वर्माला फटका

श्रेयसने दुसऱ्या स्थानी झेप घेतल्याने अनिकेत वर्माला (Aniket Varma) झटका लागला आहे. अनिकेत टॉप 5 मधून बाहेर झाला आहे. निकोलस पूरन आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस आहे. तर या दोघांव्यतिरिक्त गुजरात टायटन्सचा (Sai Sudharsan) साई सुदर्शन, सनरायजर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड (Travis Head) आणि लखनौ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श (Mitchell Marsh) टॉप 5 मध्ये आहेत.

निकोलस पूरन ऑरेंज कॅपचा मानकरी

साई सुदर्शनकडे संधी

दरम्यान साई सुदर्शन याला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आणखी पुढे येण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, साई या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. बुधवारी 2 एप्रिलला गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणार आहे. साईने या सामन्यात 53 धावा केल्यास तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरेल.

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.