AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025: गुजरातविरुद्ध आरसीबीची कामगिरी कशी? कुणी जिंकलेत सर्वाधिक सामने?

RCB vs GT Head To Head Records IPL : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांचा हा 18 व्या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी राहिलीय? जाणून घ्या.

IPL 2025: गुजरातविरुद्ध आरसीबीची कामगिरी कशी? कुणी जिंकलेत सर्वाधिक सामने?
RCB vs GT Head To Head Records IplImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 01, 2025 | 10:34 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2205) बुधवारी 2 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने या हंगा्मात अप्रतिम सुरुवात केली आहे. आरसीबीने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांना पराभूत केलंय. विशेष म्हणजे आरसीबीने हे दोन्ही सामने प्रतिस्पर्धी संघांच्या घरच्या मैदानात विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबीचा विश्वास दुणावलेला आहे.

तर दुसऱ्या बाजूला गुजरातची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. पंजाब किंग्सने गुजरातवर मात केली. मात्र गुजरातने दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यात दोन्ही संघांचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्ना कोण यशस्वी ठरणार? हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

आरसीबी-गुजरात यांच्यापैकी सरस कोण?

आकडेवारीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरात टायटन्सवर वरचढ आहे. दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. आरसीबीने या 5 पैकी सर्वाधिक 3 सामने जिंकले आहेत. तर गुजरातनेही 2 सामन्यात पलटवार केला आहे. त्यामुळे एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबल आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना बुधवारी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

गेल्या हंगमात काय झालं?

दरम्यान गेल्या हंगामात दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले होते. आरसीबीने दोन्ही वेळा गुजरातचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे गुजरात या पराभवाचा वचपा घेण्यासह आरसीबीची विजयी घोडदौड रोखण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.

गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.