AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs LSG Toss : कर्णधार संजू सॅमसन बाहेर, लखनौची राजस्थानविरुद्ध बॅटिंग, वैभव सूर्यवंशीचं 14 व्या वर्षी पदार्पण

Vaibhav Suryavanshi Ipl Debut RR vs LSG : लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला दुखापतीमुळे खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच राजस्थानने युवा वैभव सूर्यवंशी याला पदार्पण करण्याची संधी आहे.

RR vs LSG Toss : कर्णधार संजू सॅमसन बाहेर, लखनौची राजस्थानविरुद्ध बॅटिंग, वैभव सूर्यवंशीचं 14 व्या वर्षी पदार्पण
Riyan Parag and Rishahb Pant RR vs LSG Toss Ipl 2025 Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 19, 2025 | 7:48 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज शनिवारी 19 एप्रिलला डबल हेडर अर्थात 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. हा सामना राजस्थानच्या होम ग्राउंड असलेल्या सवाई मानसिंह स्टेडियम जयपूर येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजचा टॉस झाला. लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार ऋषभ पंत याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

कर्णधार संजू सॅमसन आऊट

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन बाहेर झाला आहे. संजूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे संजूच्या अनुपस्थितीत युवा रियान पराग याच्याकडे कर्णधारपदाची धुरा आहे. तसेच राजस्थानने या सामन्यातून वैभव सूर्यवंशी याला आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली आहे. वैभवचं 14 व्या वर्षी पदार्पण झालं आहे. वैभव यासह आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. वैभवचा इमपॅक्ट प्लेअरमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैभव दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. प्रिंस यादव याच्या जागी आकाश दीप याचं कमबॅक झालं आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान आकडेवारीनुसार राजस्थान लखनौवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांत राजस्थानने विजय मिळवला आहे. तर लखनौला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता उभयसंघातील सहाव्या सामन्यात कोण जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

वयाच्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीचं आयपीएल पदार्पण

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी आणि आवेश खान.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.