AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs PBKS : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजी घेत म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत हैदराबादची कामगिरी सुमार राहिली आहे. आता यापुढचे सर्व सामने करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे.

SRH vs PBKS : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजी घेत म्हणाला...
| Updated on: Apr 12, 2025 | 7:09 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  सनरायझर्स हैदराबादकडे स्ट्राँग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.  श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. गेल्या काही सामन्यांमध्ये आपण प्रथम फलंदाजी केली आहे. त्यामुळे आपल्याकडे चांगल्या धावा मिळवण्याची क्षमता आहे. आपल्याला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे, सध्या हीच आपली मानसिकता आहे. आपण पाहिले आहे की पॉवरप्लेमध्ये आपला रेकॉर्ड चांगला नाही. आपल्या मनात तो विचार नाही. आपल्या संघातील प्रत्येक खेळाडू आपापल्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. आपल्याला अव्वल दर्जाचे असायला हवे, आपल्या प्रवृत्तीला पाठिंबा द्यायला हवा. आपल्याला ते वारंवार सांगत राहावे लागेल. त्याच संघासोबत खेळणार आहोत.’

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ठीक आहे. मला वाटतं आपण कोणत्याही धावांचा पाठलाग करू शकतो. ही सुरुवात आदर्श नाही. पण आपण खूप चांगला सराव करत आहोत. प्रत्येकजण चांगल्या स्थितीत आहे. आपण सलग काही गमावले आहेत, पण ते आदर्श नाही. संघात एक बदल केला आहे. कामिंदू मेंडिसऐवजी मलिंगाचा संघात समावेश आहे.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा राहिला आहे. सनरायझर्स हैदराबादने 16, तर पंजाब किंग्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. या ठिकाणी या स्पर्धेत त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. हैदराबादने घरच्या मैदानावर पंजाब किंग्सविरुद्ध फक्त 1 सामना गमावला आहे. तर 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, एशान मलिंगा.

वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.