AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH : सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, कोलकाता नाईट रायडर्सची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Toss Ipl 2025 : कोलकाता नाईट रायडर्स सनरायजर्स हैदराबादविरुद्ध टॉस गमावल्यानंतर पहिले बॅटिंग करणार आहे. केकेआर घरच्या मैदानात किती धावसंख्या करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

KKR vs SRH : सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, कोलकाता नाईट रायडर्सची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
kkr vs srh toss ipl 2025Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 03, 2025 | 7:32 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)  आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलकातमधील ईडन गार्डन्ससध्ये (Eden Gardens) करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादने टॉस जिंकला. कर्णधार पॅट कमिन्स याने चेसिंगचा निर्णय घेत यजमान केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता केकेआर घरच्या मैदानात किती धावांपर्यंत मजल मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघांची सारखीच स्थिती

हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांची या हंगामात सारखीच स्थिती आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना आहे. दोन्ही संघांनी पहिल्या 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. तर एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर कमबॅक करुन विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.

केकेआरकडून एक बदल

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये फक्त 1 बदल केला आहे. स्पेन्सर जॉन्सन याच्या जागी ऑलराउंडर मोईन अली याचा समावेश करण्यात आला आहे. आता मोईन या संधीचा किती सोनं करतो? याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद टीममध्ये सिमरजीत सिंह याचं कमबॅक झालं आहे. तर कामिंदु मेंडीस याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

हैदराबादचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कामिंडू मेंडिस, सिमरजीत सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि जीशान अन्सारी.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.