AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपर ओव्हरचा थरार..! दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यातील बॉल टू बॉल डिटेल्स, एका क्लिकवर

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सुपर ओव्हरचा थरार अनुभवता आला. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ड्रॉ झाला. त्यामुळे निकालासाठी सुपर ओव्हर टाकली गेली. या सुपर ओव्हरमध्ये काय झालं ते जाणून घ्या

सुपर ओव्हरचा थरार..! दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यातील बॉल टू बॉल डिटेल्स, एका क्लिकवर
दिल्ली कॅपिटल्सImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 16, 2025 | 11:52 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सुपर ओव्हरची अनुभूती क्रीडाप्रेमींना मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 188 धावा केल्या आणि विजयासाठी 189 धावा दिल्या. पण राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 188 धावाच केल्या. त्यामुळे सामना ड्रॉ झाला आणि सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 2 विकेट राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचे 10 गुण झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने एक पाऊल प्लेऑफच्या दिशेने टाकलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह 10 गुण मिळवले आहेत.  सुपर ओव्हरमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. पण दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सवर भारी पडली. या विजयाचं खरं श्रेय मिचेल स्टार्ककडे जातं. कारण त्याच्यामुळेच सुपर ओव्हरमध्ये सामना गेला.

राजस्थान रॉयल्सचा 6 चेंडूंचा डाव

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम सुपर ओव्हर टाकली आणि राजस्थान रॉयल्सकडून फलंदाजीसाठी करण्यासाठी शिरोमन हेटमायर आणि रियान पराग उतरले होते. सुपर ओव्हरसाठी दिल्लीने मिचेल स्टार्कच्या हाती चेंडू सोपवला.मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी शिरोमन हेटमायर होता. पहिलाच चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर हेटमायरने काही चूक केली नाही आणि चौकार मारला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसला आणि चौकार पडला. तिसऱ्या चेंडूवर हेटमायरने एक धाव घेतली आणि रियान परागला स्ट्राईक मिळाली. रियान परागने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पण हा चेंडू नो असल्याचं घोषित झाला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण मिचेल स्टार्कने साईड लाईन टच केल्याने नो बॉल दिला. त्यानंतरच्या चेंडूवर रियान पराग रनआऊट झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आला. पण स्ट्राईकला हेटमायर होता. त्यानंतर जोरदार फटका मारला मात्र दोन धाव घेताना यशस्वी जयस्वाल रनआऊट झाला. त्यामुळे 11 धावा झाल्या आणि 12 धावांचं आव्हान दिलं गेलं.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

विजयासाठी दिलेल्या 12 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स ही जोडी मैदानात आली. राजस्थानकडून संदीप शर्मा गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर स्ट्राईकला असलेल्या केएल राहुलने दोन धावा घेतल्या. या चेंडूवर रनआऊटची संधी हुकली. दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलने चौकार मारला. त्यामुळे 4 चेंडूत सहा धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकला आला. तीन चेंडूत पाच धावांची गरज होती. स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.