IPL Kolkata Knight Riders Team 2021 | कोलकाताकडे हरभजन-शाकिब अनुभवी फिरकी जोडी, तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणार का?
आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून (IPL Auction 2021) कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) एकूण 8 खेळाडू खरेदी केले आहेत.
चेन्नई | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) काल 18 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात चेन्नईत पार पडला. यामध्ये काही खेळाडू हे नशिबवान ठरले. तर काही खेळाडूंना पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. एकूण 8 फ्रँचायजींनी मिळून 298 पैकी फक्त 57 खेळाडूंनाच खरेदी केले. दरम्यान 2 वेळेस विजयी ठरलेल्या शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने एकूण 8 खेळाडूंना लिलावातून खरेदी केलं. (ipl auction 2021 Kolkata Knight Riders team see full players list 2021)
कोलकाताने सर्वाधिक किंमत ही बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनसाठी मोजली आहे. केकेआरने शाकिबसाठी 3 कोटी 20 लाख खर्च केले आहेत. तर टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंहला त्याच्या बेस प्राईज (2 कोटी) मध्ये खरेदी केलं आहे. तसेच बेन कटिंगलाही 75 लाख मोजून आपल्याकडे घेतलं आहे.
KKR ने लिलावातून खरेदी केलेले खेळाडू
शाकिब अल हसन, 3.2 कोटी रुपये
हरभजन सिंह, 2 कोटी रुपये
बेन कटिंग, 75 लाख रुपये
पवन नेगी, 50 लाख रुपये
करुण नायर, 50 लाख
शेल्डन जॅकसन, 20 लाख
वैभव अरोडा, 20 लाख रुपये
वेंकटेश अय्यर, 20 लाख रुपये
KKRने रिटेन केलेले खेळाडू :
ऑयन मॉर्गन, शिवम मावी, संदीप वॉरियर, दिनेश कार्तिक, पॅट कमिंस, सुनील नारायण, आंद्रे रसेल, लॉकी फग्युर्सन, प्रसिद्ध कृष्णा, शुबमन गिल, नीतीश राणा, टीम सायफर्ट, कमलेश नागरकोटी, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती आणि राहुल त्रिपाठी.
शाकिब आणि हरभजन कोलकाताकडे आल्याने त्यांची बोलिंग साईड आणखी मजबूत झाली आहे. तर बॅटिंगसाईड जोरदार झाली आहे. तसेच कोलकाताचा सलामीवीर शुबमन गिल गेल्या काही काळापासून सातत्याने चांगली कामगिरी करतोय. यामुळे यावेळेसही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
कोलकाताला तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी
कोलकाताने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण दोन वेळा 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. मात्र गेल्या 6 वर्षांपासून कोलकाताला उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. गेल्या मोसमादरम्यान दिनेश कार्तिकऐवजी इयॉन मॉर्गनला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र यानंतरही कोलकाताच्या कामगिरीत विशेष प्रगती पाहायला मिळाली नाही. यामुळे या 14 व्या मोसमात कोलकाता तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL Royal Challengers Bangalore Team 2021 | विराट-मॅक्सवेलसह अनेक स्फोटक फलंदाज, बंगळुरुची असणार विजेतेपदावर नजर, बघा सर्व खेळाडूंची नावं
IPL Royal Challengers Bangalore Team 2021 | विराट-मॅक्सवेलसह अनेक स्फोटक फलंदाज, बंगळुरुची असणार विजेतेपदावर नजर, बघा सर्व खेळाडूंची नावं
अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखांची बोली, कोणत्या संघाकडून खरेदी?
(ipl auction 2021 Kolkata Knight Riders team see full players list 2021)