IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं

ipl 2021 auction live today 3 pm in chennai india time ऑस्ट्रेलीयाचा खेळाडून स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंना 2 कोटींच्या  बेस प्राईजमध्ये स्थान देण्यात आले आहे.

IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं
आयपीएल ट्रॉफी
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:46 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाची अनेक जण वाट पाहत आहेत.. या 14 व्या मोसमासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार (IPL 2021 Auction Date) आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण 292 खेळाडू उतरणार असून ही प्रक्रिया चेन्नईमध्ये पार पडणार आहे. स्पिनर हरभजन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलीयाचा खेळाडून स्टीव्ह स्मिथ यांना 2 कोटींच्या  बेस प्राईजमध्ये स्थान देण्यात आले आहे. (IPL auction 2021 total 292 players will go under auction process in Chennai)

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या वेळच्या आयपीएल हंगामात खेळाडूंची संख्या कमी केली आहे. या हंगामात एकूण 292 खेळांडूचा लिलाव होईल. 18 फेब्रुवारीच्या लिलावात आठ फ्रेंचायझी एकूण 61 खेळाडू घेण्यासाठी लिलावात सहभागी होतील. लिलावाच्या यादीमध्ये एकूण 164 भारतीय तर 125 विदेशी, असोशिएट देशांच्या तीन खेळाडूंना स्थान मिळालेले आहे.

कोणता संघ किती खेळाडू घेऊ शकणार ?

फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या लिलावलात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हा संघ 13 खेळाडूंना खरेदी करु शकेल. तर सनरायझर्स हैदराबाद या संघाला फक्त तीन खेळाडूंना खरेदी करता येईल. किंग्स ईलेव्हन पंजाब (KXIP) या टीमकडे सर्वाधिक 53 कोटी 10 लाख रुपयांची राशी असून ते मोठ्या ताकदीने लिलाव प्रक्रियात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर हैदराबाद संघाकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी 10 कोटी 75 लाख रुपयांचे भांडवल असेल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) जवळ एकूण 22 कोटी 70 लाख रुपये असून चेन्नई संघाला एकूण 7 खेळाडू खरेदी करता येतील. चेन्नई सुपर किंग्स या संघाने या वर्षी हरभजन सिंग आणि केदार जाधव या खेळाडूंना आपल्या संघातून वगळले आहे.

कोणत्या खेळाडूंची बेस प्राईज काय?

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला सर्वाधिक कमी बेस प्राईजमध्ये ठेवण्यात आलं आहे. अर्जुनची बेस प्राईज 20 लाख रुपये आहे. मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लाँकेट, जेसन रॉय, मार्क वुड या खेळाडूंना सर्वाधिक बेस प्राईजमध्ये ठेवण्यात आले आहे.

कधी सुरु होणार आयपीएल 2021?

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी ( IPL 2021) खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. दरम्यान या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारतातच होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यातच आता या मोसमाची तारीखही जवळपास निश्चित झाल्याचं समजत आहे. 11 एप्रिलपासून या 14 व्या मोसमाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत आयपीएल प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विजय हजारे ट्रॉफी आणि वुमन्स वनडे सीरिजनंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या मोसमातील अंतिम सामना 5 किंवा 6 जूनला खेळवण्यात येऊ शकतो. यानुसार बीसीसीआयची टी-20 स्पर्धा साधारण 56 दिवस चालू शकते.

इतर बातम्या :

VIDEO | मोहम्मद रिझवानचा जॉन्टी रोड्स अवतार, डाईव्ह मारली आणि 29 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या

‘वासिम, तू जे केलं ते योग्य, मी तुझ्यासोबत’, अनिल कुंबळेकडून जाफरची पाठराखण

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

(IPL auction 2021 total 292 players will go under auction process in Chennai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.