AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2022: ऑक्शनमध्ये इशानने 15.25 कोटी कमावल्यानंतर गर्लफ्रेंड अदिति हुंडियाने दिली अशी Reaction

IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने विकत घेतल्यानंतर इशान किशनने इन्स्टाग्रामवरुन त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार मानले. इशानच्या या पोस्टवर अभिनंदन करणाऱ्या मेसेजेसचा पूर आला होता.

IPL Auction 2022: ऑक्शनमध्ये इशानने 15.25 कोटी कमावल्यानंतर गर्लफ्रेंड अदिति हुंडियाने दिली अशी Reaction
Ishan-Aditi Instagram Photo
| Updated on: Feb 13, 2022 | 4:53 PM
Share

IPL Mega Auction च्या पहिल्या दिवशी काल भारतीय क्रिकेटपटू इशान किशनवर (Ishan kishan) अक्षरक्ष: धनवर्षाव झाला. इशान कालच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. काल मुंबई इंडियन्सने त्याला तब्बल 15.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. इशासाठी हा एकप्रकारचा जॅकपॉटच आहे. युवराज सिंगनंतर आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील तो दुसरा महागडा भारतीय खेळाडू ठरला. आयपीएलच्या ऑक्शन इतिहासातील तो चौथा महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) सुद्धा ऑक्शनमध्ये पहिल्यांदा एका खेळाडूसाठी 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड या चौघांनाच रिटेन केलं होतं. त्यामुळे ऑक्शनमध्ये इशानवर बोली लागली. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि SRH मध्ये इशानला विकत घेण्यासाठी चुरस दिसून आली. अखेर दोन कोटी बेस प्राइस असलेल्या इशानला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं.

एका मेसेजने सर्वांच लक्ष वेधून घेतलं

मुंबई इंडियन्सने विकत घेतल्यानंतर इशान किशनने इन्स्टाग्रामवरुन त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार मानले. इशानच्या या पोस्टवर अभिनंदन करणाऱ्या मेसेजेसचा पूर आला होता. यात अदिति हुंडियाच्या एका मेसेजने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अदिति आणि इशान डेटिंग करतात. अदिति इशानची कथित गर्लफ्रेंड असल्याची मीडियामध्ये चर्चा आहे.

सोशल मीडियावर दोघांमध्ये काहीतरी

दोघांनी अजून त्यांची रिलेशनशिप जाहीर केलेली नाही. पण सोशल मीडियावर दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची नेहमी चर्चा असते. इशानच्या या व्हिडिओ पोस्टवर अदितिने तुझा अभिमान वाटतो असं म्हटलं आहे. सोबत तिने फायर आणि निळ्या रंगातील हार्टचा इमोजी टाकला आहे. अदिति हुंडिया मूळची राजस्थान जयपूरची आहे. 15 जानेवारी 1997 रोजी तिचा जन्म झाला. आयपीएल 2019 च्या फायनलपासून अदिति चर्चेत आली. तेव्हा मुंबई इंडियन्सने चेन्नईचा पराभव करुन जेतेपद पटकावलं होतं. अदिति मॉडलिंग करते.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.