DC IPL 2022 Auction: ‘त्या’ माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ

IPL Mega Auction 2022 DC full squad: दमदार टीम बनवण्यासाठी तुमच्या पर्समध्ये अमाप पैसा हवा, असं काही गरजेच नाहीय. कमी बजेटमध्येही तुम्ही उत्तम संघ बांधणी करु शकता.

DC IPL 2022 Auction: 'त्या' माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 11:01 AM

IPL Mega Auction 2022 DC full squad: दमदार टीम बनवण्यासाठी तुमच्या पर्समध्ये अमाप पैसा हवा, असं काही गरजेच नाहीय. कमी बजेटमध्येही तुम्ही उत्तम संघ बांधणी करु शकता. दोन दिवसाच्या IPL Mega Auction 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) हे करुन दाखवलय. मेगा ऑक्शनच्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये सर्वात कमी पैसे होते. पण तरीही त्यांनी कमी पैशात योग्य खेळाडूंची निवड केली. हरणारा डाव विजयामध्ये बदलू शकतात, अशा खेळाडूंची दिल्ली कॅपिटल्सने निवड केली आहे. युवा खेळाडूंना (Young players) संघात स्थान देतानाच दिल्लीने अनुभवी खेळाडूंनाही संघात प्राधान्य दिलं आहे. कमी पैशात दिल्लीने एक संतुलित संघ बांधला आहे. डेविड वॉर्नरपासून दिल्ली कॅपिटल्सने 19 खेळाडूंना निवडण्याची सुरुवात केली. डेविड वॉर्नर सारखा आक्रमक फलंदाज दिल्लीकडून खेळणार आहे. कधीही सामना फिरवण्याची क्षमता त्याच्या फलंदाजीमध्ये आहे. दिल्लीकडे फार मोठे खेळाडू नाहीयत. पण ज्यांची निवड केलीय, ते विजयासाठी संपूर्ण ताकत पणाला लावतील. दिल्ली कॅपिटल्सने अजूनपर्यंत आयपीएलचे जेतेपद मिळवलेले नाही.

दिल्लीच्या एका माणसामुळे खेळाडूंची किंमत वाढली

दिल्लीच्या ऑक्शन टीममधला एक माणूस खेळाडूंची किंमत वाढावी, यासाठी लिलाव करत सुटला. पण जेव्हा खेळाडू घेण्याची वेळ यायची, तेव्हा मात्र हा माणूस चिडीचूप असायचा. शेवटी ज्यानं बोलीमध्ये पछाडलंय, त्याला नाईलाजानं जास्त पैसे मोजून खेळाडू खरेदी करावा लागत होता. हैदराबाद आणि मुंबईसोबत ऑक्शन करताना झालेली गंमत या माणसामुळे चांगलीच चर्चिली जाते. त्याचे अनेक मीम्स तयार झालेत. अनेकांच्या पर्स खाली करायला लावणारा हा माणूस आहे किरण कुमार गांधी. जाणून घ्या त्यांच्याबद्दल  

असा आहे दिल्लीचा संघ

डेविड वॉर्नर – 6.25 करोड

मिचेल मार्श – 6.25 करोड

शार्दुल ठाकुर – 10.75 करोड

मुस्ताफिजुर रहमान – दो करोड

कुलदीप यादव – दो करोड

अश्विन हेब्बर – 20 लाख

केएस भरत – दो करोड

कमलेश नागरकोटी – एक करोड 10 लाख

सरफराज खान – 20 लाख

मनदीप सिंह 1.1 करोड

खलील अहमद – 5.25 करोड

चेतन साकरिया – 4.20 करोड

ललित यादव-65 लाख

रिपन पटेल – 20 लाख

यश धुल – 50 लाख

रोवमॅन पवॅल – 2.80 करोड

लुंगी निगिडी – 50 लाख

टिम सिफर्ट – 50 लाख

विक्की ओस्तवाल – 20 लाख

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.