IPL Players Auction 2022 : आज एकूण 97 खेळाडूंवर लागली बोली, फ्रेंचायजींनी 74 खेळाडूंना घेतलं विकत

| Updated on: Feb 14, 2022 | 3:57 PM

IPL 2022 Auction Live Updates in Marathi: बंगळुरमध्ये आज आणि उद्या असं दोन दिवस मेगा ऑक्शन होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ आहेत.

IPL Players Auction 2022 : आज एकूण 97 खेळाडूंवर लागली बोली, फ्रेंचायजींनी 74 खेळाडूंना घेतलं विकत
Image Credit source: Twitter/Punjab Kings

बंगळुरु: TATA IPL 2022 Auction चा पहिला दिवस संपला आहे. आज एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना विकत घेतलं. 23 खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. लिलावात विकत घेतलेल्या 74 खेळाडूंमध्ये 20 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये आज अपेक्षेप्रमाणे अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली तर सुरेश रैना, (Suresh Raina) स्टीव्ह स्मिथ सारख्या नावाजलेल्या खेळाडूंना कोणी विकत घेतल नाही. अनकॅप्ड प्लेयर्समध्ये अनेक युवा खेळाडूंना मोठी किंमत मिळाली. भारतीय संघाकडून अजून पदार्पण न केलेल्या या खेळाडूंसाठी फ्रेंचायजींनी सढळ हस्ते रक्कम खर्च केली. यात आवेश खान, (Avesh khan) शाहरुख खान, राहुल तेवतिया यांची नाव घ्यावी लागतील. या युवा खेळाडूंची बेस प्राइस काही लाख रुपये असूनही त्यांच्यावर कोट्यवधीची बोली लागली.

इशान किशन आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या इतिहासात प्रथमच एका खेळाडूसाठी 15.25 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजली. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. त्यानंतर दीपक चाहर, श्रेयस अय्यर, आवेश खान, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि निकोलस पूरन या खेळाडूंची 10 कोटीच्या घरात विक्री झाली.

शिखर धवनला 8.25 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतलं आहे. राजस्थान रॉयल्सने 5 कोटींच्या बोलीवर रवीचंद्रन अश्विनला आपल्या संघात घेतलं. 9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्जने कगिसो रबाडाला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Feb 2022 09:46 PM (IST)

    आजच्या दिवसाचा लिलाव संपला

    TATA IPL 2022 Auction चा पहिला दिवस संपला आहे. आज एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना विकत घेतलं. 23 खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. लिलावात विकत घेतलेल्या 74 खेळाडूंमध्ये 20 परदेशी खेळाडू आहेत.

  • 12 Feb 2022 09:34 PM (IST)

    आर साई किशोरला गुजरात टायटन्स विकत घेतलं

    20 लाख बेस प्राइस असलेल्या आर साई किशोरला गुजरात टायटन्सने तब्बल 3 कोटींना विकत घेतलं आहे.

  • 12 Feb 2022 09:32 PM (IST)

    IPL 2022 Auction: श्रेयस गोपालला SRH ने घेतलं विकत

    लेग स्पिनर श्रेयस गोपालला सनरायजर्स हैदराबादने विकत घेतलं आहे. फक्त 75 लाखामध्ये विकत घेतलं. गोपाल याआधी राजस्थानकडून खेळला आहे.

  • 12 Feb 2022 09:26 PM (IST)

    IPL 2022 Auction: केसी करियप्पा राजस्थानचा भाग

    राजस्थान रॉयल्सने केसी करियप्पाला 30 लाख रुपयामध्ये विकत घेतलं आहे. करियप्पाची बेस प्राइस 20 लाख रुपये होती.

  • 12 Feb 2022 09:22 PM (IST)

    आजच्या दिवसात मुंबईने विकत घेतला तिसरा खेळाडू

    लेग स्पिनर मुरुगन अश्विनसाठी SRH आणि मुंबई इंडियन्समध्ये स्पर्धा होती. मुंबईने 1.60 कोटी रुपयांना मुरुगन अश्विनला विकत घेतलं. मुंबईने विकत घेतलेला आजच्या दिवसातील हा तिसरा खेळाडू आहे.

  • 12 Feb 2022 09:11 PM (IST)

    IPL 2022 Auction: आवेश खानची बोली लखनऊने जिंकली

    आवेश खानसाठी फ्रेंचायजीमध्ये जोरदार चुरस दिसली. 20 लाख बेस प्राइस असलेल्या आवेश खानसाठी सीएसके, मुंबई इंडियन्स, SRH आणि लखनऊ जायंट्सने बोली लावली. अखेर लखनऊने बोली जिंकत तब्बल 10 कोटी रुपयांना आवेश खानला विकत घेतलं. मागच्यावेळी दिल्लीने त्याला 70 लाखांना विकत घेतलं होतं.

  • 12 Feb 2022 09:03 PM (IST)

    IPL 2022 Auction: कार्तिक त्यागीसाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस

    वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीला आपल्या चमूत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसते आहे. 20 लाख बेस प्राइस असलेला कार्तिक त्यागी मागच्या सीजनमध्य राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. कार्तिक त्यागीला SRH ने चार कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

  • 12 Feb 2022 08:58 PM (IST)

    IPL 2022 Auction: KKR ने शेल्डन जॅक्सनला घेतलं विकतं

    शेल्डन जॅक्सन पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्सचा हिस्सा बनला आहे. KKR ने या अनुभवी भारतीय खेळाडूसाठी 60 लाख रुपये खर्च केले.

  • 12 Feb 2022 08:52 PM (IST)

    IPL 2022 Auction: प्रभसिमरन सिंह पुन्हा पंजाबच्या संघात

    पंजाबचा विकेटकीपर प्रभसिमरन सिंहची बेस प्राइस 20 लाख आहे. त्याला पंजाब किंग्सने 60 लाखामध्ये विकत घेतलं आहे.

  • 12 Feb 2022 08:48 PM (IST)

    अनुज रावत विराटच्या संघामधून खेळणार

    अनकॅप्ड खेळाडूंमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या अनुज रावतला RCB ने तब्बल 3.40 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. SRH आणि RCB मध्ये अनुजसाठी चुरस दिसून आली.

  • 12 Feb 2022 08:42 PM (IST)

    IPL 2022 Auction: अनकॅप्ड विकेटकीपर, केएस भरतपासून सुरुवात

    अनकॅप्ड विकेटकिपरमध्ये केएस भरतला दिल्ली कॅपिटल्सने दोन कोटीमध्ये विकत घेतलं आहे. मागच्या सीजनमध्ये भरत RCB कडून खेळला होता.

  • 12 Feb 2022 08:25 PM (IST)

    हरप्रीत बराडसाठी लागली मोठी बोली

    हरप्रीत बराडला पंजाब किंग्सने 3.80 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

  • 12 Feb 2022 08:16 PM (IST)

    कमलेश नागरकोटीला 1.1 कोटींना घेतलं विकत

    KKR चा माजी ऑलराऊंडर कमलेश नागरकोटीवर दिल्ली कॅपिटल्सने विश्वास दाखवला आहे. त्याला 1.1 कोटींना विकत घेतलं आहे.

  • 12 Feb 2022 08:11 PM (IST)

    40 लाख बेस प्राइस असलेल्या तेवतियाला गुजरातने 9 कोटींना घेतलं विकतं

    40 लाख बेस प्राइस असलेल्या हरयाणाचा ऑलराऊंडर राहुल तेवतियाला गुजरात टायटन्सने तब्बल 9 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं.

  • 12 Feb 2022 08:00 PM (IST)

    शिवम मावीची घरवापसी

    कोलकाता नाईट रायडर्सने जलदगती गोलंदाज शिवम मावीसाठी 7.25 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 12 Feb 2022 07:52 PM (IST)

    शाहरुख खान पुन्हा एकदा प्रीती झिंटाच्या संघात

    अनकॅप्ड युवा खेळाडू शाहरुख खान पुन्हा एकदा प्रीती झिंटाच्या संघाकडून खेळताना दिसेल. 9 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सने त्याला आपल्या संघात सामावून घेतलं.

  • 12 Feb 2022 07:43 PM (IST)

    युवा अनकॅप्ड खेळाडू अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबामध्ये

    युवा अनकॅप्ड खेळाडू अभिषेक शर्मासाठी अनेक संघांनी बोली लावल्या, गुजरात पंजाबसह सनरायझर्स हैदराबामध्ये झालेल्या या बिडींग वॉरमध्ये एसआरएचने बाजी मारली. तब्बल 6.50 कोटी रुपयांच्या बोलीवर हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 12 Feb 2022 07:33 PM (IST)

    रियान पराग पुन्हा एकदा पिंक जर्सीत दिसणार

    अष्टपैलू खेळाडू रियान परागसाठी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्समध्ये जोरदार बिडींग वॉर झालं. अखेर हे बिडींग वॉर राजस्थानने जिंकत आपल्या खेळाडूला पुन्हा एकदा संघात घेतलं आहे. आरआरने त्याच्यासाठी 3.80 कोटींची बोली लावली.

  • 12 Feb 2022 07:23 PM (IST)

    राहुल त्रिपाठीसाठी हैदराबादची 8.50 कोटींची बोली

    मधल्या फळीतला विश्वासू फलंदाज राहुल त्रिपाठीसाठी चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद संघांच्या फ्रँचायझींमध्ये मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं. अखेर हे वॉर हैदराबादने जिंकलं. हैदराबादने 8.50 कोटी रुपयांच्या बोलीवर राहुलला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 07:17 PM (IST)

    8 तासांनंतर मुंबईने दुसरा खेळाडू खरेदी केला, बेबी एबी डीव्हिलियर्स मुंबईच्या ताफ्यात

    बेबी एबी डीव्हिलियर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डिवॉल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईमध्ये मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं. हे वॉर अखेर मुंबईने जिंकलं. 3 कोटी रुपयांच्या बोलीवर मुंबईने ब्रेविसला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.

  • 12 Feb 2022 07:12 PM (IST)

    युवा खेळाडू अभिनव सदारंगनीसाठी बिडींग वॉर

    युवा आणि अनकॅप्ड खेळाडू अभिनव सदारंगनीसाठी बिडींग वॉर पाहायला मिळालं. दिल्ली, कोलकाता, गुजरात या तिन्ही फ्रँचायझींनी अभिनवसाठी बोली लावली. यात गुजरातने हे बिडींग वॉर जिंकलं. 2.60 कोटींच्या बोलीवर गुजरातने अभिनवला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 07:08 PM (IST)

    प्रियम गर्ग हैदराबादच्या ताफ्यात

    हैदराबादने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये प्रियम गर्गला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 12 Feb 2022 07:07 PM (IST)

    रजत पाटीदार अनसोल्ड

    भारतीय युवा खेळाडू रजत पाटीदार अनसोल्ड राहिला

  • 12 Feb 2022 06:41 PM (IST)

    अमित मिश्रा अनसोल्ड

    भारतीय फिरकीपटू अमित मिश्रासाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू अखेर अनसोल्ड राहिला.

  • 12 Feb 2022 06:39 PM (IST)

    युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात

    भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलला राजस्थान रॉयल्सने 6.5 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

  • 12 Feb 2022 06:33 PM (IST)

    राहुल चाहर पंजाब किंग्सच्या ताफ्यात

    5.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सने राहुल चाहरला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. राजस्थान रॉयल्सने बराच वेळ राहुलसाठी बिडींग केलं.

  • 12 Feb 2022 06:24 PM (IST)

    आदील रशीद, इम्रान ताहीर, मुजीब जादरान अनसोल्ड

    इंग्लंडचा फिरकीपटू आदील रशीद, द. आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब जादरान या तिघांवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे तिन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 12 Feb 2022 06:21 PM (IST)

    कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स संघात

    दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला आपल्या संघात घेतलं. कुलदीपसाठी पंजाब किंग्सने बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 06:18 PM (IST)

    बांगलादेशी जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान दिल्लीच्या ताफ्यात

    दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये बांगलादेशी जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 06:14 PM (IST)

    लॉर्ड ठाकूरवर पैशाचा पाऊस, तब्बल 10.75 कोटींची बोली

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लॉर्ड या नावाने प्रसिद्ध असलेल्या जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरवर आयपीएलच्या लिलावात पैशाचा पाऊस पडला. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं. ठाकूरसाठी दिल्ली, पंबाज आणि चेन्नई या तीन फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.

  • 12 Feb 2022 06:04 PM (IST)

    भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा ऑरेंज आर्मीत

    भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा ऑरेंज आर्मीकडून खेळताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदाराबादने भुवनेश्वर कुमारसाटी 4.20 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 12 Feb 2022 05:59 PM (IST)

    मार्क वूडसाठी लखनौची सर्वात मोठी बोली

    7.50 कोटी रुपयांची बोली लावत लखनौ सुपरजायंट्सने मार्क वूडला आपल्या ताफ्यात घेततं. मुंबईने त्याचासाठी 7.25 कोटींची बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 05:55 PM (IST)

    जॉश हेजलवूड बँगलोरच्या ताफ्यात

    7.75 कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जॉश हेजलवूडला आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईने त्याचासाठी 7.50 कोटींची बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 05:50 PM (IST)

    लॉकी फर्ग्युसनसाठी गुजरातची 10 कोटींची बोली

    लॉकी फर्ग्युसनसाठी 10 कोटी रुपयांची बोली लावत गुजरात टायटन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 12 Feb 2022 05:44 PM (IST)

    उमेश यादव अनसोल्ड

    भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादवसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू आजच्या दिवसासाठी अनसोल्ड राहिला.

  • 12 Feb 2022 05:43 PM (IST)

    प्रसिद्ध कृष्णासाठी राजस्थानची 10 कोटींची बोली

    जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णासाठी राजस्थानने 10 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. कृष्णा यंदाच्या लिलावातला दुसऱा सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

  • 12 Feb 2022 05:33 PM (IST)

    दीपक चाहरसाठी चेन्नईची आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली

    मोठ्या बिडींग वॉरनंतर दीपक चाहरला चेन्नईने पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने त्याच्यासाठी 14 कोटींची बोली लावली. दीपकसाठी दिल्ली, चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद या फ्रँचायझींमध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं.

  • 12 Feb 2022 05:23 PM (IST)

    टी. नटराजन सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात

    टी. नटराजनवर सनरायझर्स हैदराबादने 4 कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं. त्याच्यासाठी गुजरात टायटन्सने बराच वेळ बिडींग केलं. मात्र हैदराबादने हे बिडींग वॉर जिंकलं.

  • 12 Feb 2022 05:02 PM (IST)

    निकोलस पूरन आजच्या दिवसातला तिसरा सर्वात महागडा खेळाडू

    निकोलस पूरन आजच्या दिवसातला तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 10.50 कोटींपर्यंत बोली लावली. पर्समध्ये केवळ 20 कोटी रुपये असूनही कोलकात्याने पूरनसाठी बोली लावली.

  • 12 Feb 2022 04:53 PM (IST)

    सॅम बिलिंग्स अनसोल्ड

    सॅम बिलिंग्स या यष्टीरक्षक फलंदाजावर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडूदेखील आज अनसोल्ड राहिला.

  • 12 Feb 2022 04:51 PM (IST)

    ऋद्धीमान साहा अनसोल्ड

    भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धीमान साहा आजच्या दिवसात अनसोल्ड राहिला. कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नाही.

  • 12 Feb 2022 04:51 PM (IST)

    दिनेश कार्तिक बँगलोरमध्ये

    दिनेश कार्तिकसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं. हे वॉर बँगलोरने जिंकलं. बँगलोरने 5.50 कोटी रुपयांमध्ये कार्तिंकला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 04:42 PM (IST)

    जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्स संघात

    इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबने 6.75 कोटी रुपये खर्चून बेअरस्टोला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 04:33 PM (IST)

    इशान किशनसाठी मुंबईची आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली

    इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली लावली आहे. मुंबईने 15.25 कोटी रुपयांच्या बोलीवर इशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं. किशनसाठी पंजाब, हैदराबाद आणि राजस्थानने मोठमोठ्या बोली लावल्या, अखेर हे बिडींग वॉर मुंबईने जिंकलं.

  • 12 Feb 2022 04:23 PM (IST)

    अंबाती रायुडू पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत दिसणार

    अंबाती रायुडू पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने 6.75 कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. रायुडूसाठी हैदराबाद आणि दिल्लीनेही बराच वेळ बोली लावली. अखेर ही बोली चेन्नईने जिंकली.

  • 12 Feb 2022 04:18 PM (IST)

    मॅथ्यू वेड अनसोल्ड

    नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल सामन्यात शाहीन आफ्रिदीला सलग चार षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू आज अनसोल्ड राहिला.

  • 12 Feb 2022 04:15 PM (IST)

    मोहम्मद नबी अनसोल्ड

    अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. त्यामुळे हा खेळाडू आज अनसोल्ड राहिला.

  • 12 Feb 2022 04:13 PM (IST)

    मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्स संघात

    नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतलं. दिल्लीने त्याच्यासाठी 6.50 कोटी रुपयांची बोली लावली. हैदराबादने या खेळाडूसाठी 6.25 कोटींची बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 04:08 PM (IST)

    कृणाल पंड्या लखनौच्या ताफ्यात, मुंबईने बोली लावली नाही

    लखनौ सुपरजायंट्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर अष्टपैलून कृणाल पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. हैदराबाद, चेन्नई आणि गुजरात या फ्रँचायझींनी कृणालवर बोली लावल्या अखेर लखनौने बोली जिंकली. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने कृणाल पंड्यावर बोली लावली नाही. कृणाल गेली अनेक वर्ष मुंबईकडून खेळत होता.

  • 12 Feb 2022 03:59 PM (IST)

    वॉशिंग्टन सुंदरसाठी हैदराबादची 8.75 कोटींची बोली

    सनरायझर्स हैदराबादने आज आपला पहिला खेळाडू खरेदी केला आहे. फ्रँचायझीने 8.75 कोटींच्या बोलीवर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 03:53 PM (IST)

    वानिंदू हसरंगा आरसीबीच्या ताफ्यात, दिवसभरातला दुसरा सर्वात महागडा खेळाडू

    10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने वानिंदू हसरंगाला आपल्या ताफ्यात घेतलं. तो दिवसभरातला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पहिल्या सत्रात श्रेयस अय्यरसाठी कोलकात्याने 12.25 कोटी रुपयांची बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 02:10 PM (IST)

    शाकिब अल हसन अनसोल्ड

    बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. त्यामुळे शाकिब अनसोल्ड राहिला.

  • 12 Feb 2022 02:04 PM (IST)

    पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलसाठी 10.75 कोटींची बोली

    आयपीएल 2021 मधील पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 10.75 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 01:52 PM (IST)

    जेसन होल्डर लखनौ सुपरजायंट्स संघात

    वेस्ट इंडिंजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरसाठी लखनौ सुपरजायंट्सने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. होल्डरसाठी चेन्नई सुपरकिंग्सनेदेखील मोठी बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 01:45 PM (IST)

    नितीश राणा कोलकात्याच्या संघात कायम

    8 कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणाला आपल्या संघात परत घेतलं.

  • 12 Feb 2022 01:44 PM (IST)

    ड्र्व्हेन ब्राव्हो चेन्नईत कायम

    वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्र्व्हेन ब्राव्हो चेन्नई सुपरकिंग्समध्ये कायम राहील. 4.40 कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नईने त्याला संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 01:42 PM (IST)

    दीपक हुडा लखनौच्या ताफ्यात

    भारतीय अष्टपैलू खेळाडू दीपक हुडासाठी लखनौ सुपरजायंट्सने 5.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 12 Feb 2022 01:42 PM (IST)

    डेव्हिड मिलर, स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड

    किलर मिलर म्हणून ओळखला जाणारा द. आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 12 Feb 2022 01:40 PM (IST)

    देवदत्त पडीक्कल राजस्थानच्या ताफ्यात

    युवा क्रिकेटपटू देवदत्त पडीक्कलसाठी राजस्थान रॉयल्सने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईने त्याच्यावर 7.50 कोटी रुपयांची बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 01:38 PM (IST)

    मिस्टर आयपीएल सुरेश रैना अनसोल्ड, कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही

    एके काळी मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपरकिंग्सनेदेखील रैनासाठी इंटरेस्ट दाखवला नाही.

  • 12 Feb 2022 01:30 PM (IST)

    जेसन रॉय गुजरातच्या ताफ्यात

    गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर जेसन रॉयला आपल्या संघात घेतलं. कोणत्याही संघाने जेसन रॉयसाठी बोली लावली नाही. अखेर गुजरात टायटन्सने दोन कोटींच्या बोलीवर त्याला आपल्या ताफ्यात घेतलं

  • 12 Feb 2022 01:28 PM (IST)

    रॉबिन उथप्पासाठी चेन्नईची बोली

    चेन्नईने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉबिन उथप्पाला आपल्या संघात घेतलं. उथप्पावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. अखेर चेन्नईने आपल्या खेळाडूला संघात परत घेतलं.

  • 12 Feb 2022 01:26 PM (IST)

    शिमरन हेटमायर राजस्थान संघात

    राजस्थान रॉयल्सने 8.50 कोटी रुपयांच्या बोलीवर शिमरन हेटमायरला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 12 Feb 2022 01:21 PM (IST)

    मनिष पांडे लखनौच्या ताफ्यात

    लखनौ सुपरजायंट्सने 4.60 कोटी रुपयांच्या बोलीवर मनिष पांडेला आपल्या ताफ्यात घेतलं. सुरुवातीला सनरायझर्स हैदाराबाद आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावली. अखेरी यात लखनौच्या विजय झाला.

  • 12 Feb 2022 12:59 PM (IST)

    पृथ्वी शॉला सलामीचा जोडीदार मिळाला, वॉर्नर दिल्लीच्या ताफ्यात

    डेव्हिड वॉर्नरवर दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे पृथ्वी शॉला सलामीचा जोडीदार मिळाला आहे.

  • 12 Feb 2022 12:52 PM (IST)

    क्विंटन डीकॉक लखनौ संघात

    लखनौ या नव्या फ्रँचायझीने 6.75 कोटी रुपयांच्या बोलीवर क्विटंन डीकॉकला आपल्या संघात घेतलं. डीकॉक याआधी मुंबईकडून खेळायचा मुंबईने डीकॉकवर 5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. मात्र डीकॉक आता केएल राहुलसोत लखनौसाठी सलामीला उतरणार आहे.

  • 12 Feb 2022 12:48 PM (IST)

    फाफ डुप्लेसी विराटच्या संघात

    7 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने फाफ डुप्लेसीला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.

  • 12 Feb 2022 12:43 PM (IST)

    मोहम्मद शमी गुजरातच्या ताफ्यात

    गुजरात टायटन्सने 6.25 कोटी रुपयांच्या बोलीवर मोहम्मद शमीला आपल्या ताफ्यात घेतलं. बँगलोरने शमीवर 6 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती.

  • 12 Feb 2022 12:39 PM (IST)

    कोलकात्याला कर्णधार मिळाला, श्रेयस अय्यर केकेआरच्या ताफ्यात

    कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांच्या बोलीवर श्रेयस अय्यरला आपल्या ताफ्यात घेतलं. कदाचित अय्यरकडे कोलकात्याचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.

  • 12 Feb 2022 12:34 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सची ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी बोली

    राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. बोल्टवर मुंबईने 7.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र राजस्थानने अखेर मुंबईचा खेळाडू आपल्याकडे घेतला.

  • 12 Feb 2022 12:28 PM (IST)

    कगिसो रबाडा पंजाब किंग्सच्या ताफ्यात

    9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सने कगिसो रबाडाला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.

  • 12 Feb 2022 12:24 PM (IST)

    पॅट कमिन्सवर कोलकात्याची 7.25 कोटींची बोली

    कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सवर 7.25 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. गेल्या वर्षी त्याच्यावर कोलकात्याने 15 कोटींची बोली लावली होती. कमिन्स आता पुन्हा एकदा कोलकात्याकडून खेळणार आहे.

  • 12 Feb 2022 12:20 PM (IST)

    रवी अश्विनवर राजस्थान रॉयल्सची 5 कोटींची बोली

    राजस्थान रॉयल्सने 5 कोटींच्या बोलीवर रवीचंद्रन अश्विनला आपल्या संघात घेतलं. अश्विन आणि जॉस बटलर यंदा एकाच संघाकडून खेळणार आहेत.

  • 12 Feb 2022 12:16 PM (IST)

    8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर शिखर धवन पंजाबच्या संघात

    पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर शिखर धवनला आपल्या संघात घेतलं आहे. धवनसाठी दिल्लीने 8 कोटींपर्यंत बोली लावली. अखेर गेल्या वर्षी दिल्लीकडून खेळलेला धवन यंदा पंजाबकडून खेळणार आहे.

  • 12 Feb 2022 12:14 PM (IST)

    IPL 2022 Auction: सर्वात आधी शिखर धवनवर बोली

    दिल्ली कॅपिटल्सचा माजी सलामीवीर शिखर धवनपासून आयपीएलच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.

  • 12 Feb 2022 11:44 AM (IST)

    IPL 2022 Auction: लिलावासाठीचं व्यासपीठ सज्ज

    Tata IPL 2022 Acution च्या पहिल्या दिवसाच्या अॅक्शनला काही वेळातच सुरुवात होत आहे. सर्व संघ सज्ज झाले असून स्टेजही सजले आहे.

  • 12 Feb 2022 11:01 AM (IST)

    आज 161 खेळाडूंवर बोली लागेल

    IPL च्या 15 व्य़ा सीजनसाठी आज बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन होत आहे. आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी दहा संघ आहेत. एकूण 600 खेळाडूंवर बोली लागेल. आज 161 खेळाडूंवर बोली लागेल.

  • 12 Feb 2022 10:53 AM (IST)

    राजस्थान रॉयल्सच्या CEO ने केलेलं हे टि्वट पाहिलत का?

    IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी सर्वच संघ उत्साहित आहेत. सर्वच टीम्स सोशल मीडियावर सक्रिय आहेत. राजस्थान रॉयल्सच्या CEO ने एक मजेदार टि्वट केलं आहे. चित्रपटातल्या लाइन्सवरुन त्यांनी दुसऱ्या संघांनाही संदेश दिला आहे.

Published On - Feb 12,2022 10:50 AM

Follow us
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.