IPL Auction 2022: यंदाच्या लिलावत प्रीति झिंटा पंजाब किंग्जसाठी बोली लावताना दिसणार नाही, कारण…
दरवर्षी आयपीएलमध्ये शाहरुख खान (Shahrukh khan) आणि प्रीति झिंटा (Prity Zinta) या दोघांची चर्चा असते. मागच्यावर्षी झालेल्या ऑक्शनमध्ये नव्या पीढीचे चेहरे दिसले होते.
नवी दिल्ली: IPL 2022 च्या मेगा ऑक्शनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेट आणि ग्लॅमरचा तडका. आयपीएलच्या पंजाब, केकेआर या संघांची मालकी बॉलिवूडच्या काही स्टार्सकडे आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये शाहरुख खान (Shahrukh khan) आणि प्रीति झिंटा (Prity Zinta) या दोघांची चर्चा असते. मागच्यावर्षी झालेल्या ऑक्शनमध्ये नव्या पीढीचे चेहरे दिसले होते. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि जुही चावलाची मुलगी होती. दरवर्षी आयपीएल ऑक्शनमधला ग्लॅमरस चेहरा म्हणजे प्रीति झिंटा. पण यावेळी प्रीति झिंटा ऑक्शनमध्ये दिसणार नाही. प्रीति झिंटा किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण आहे.
आयपीएलच्या पहिल्या वर्षपासून 2008 पासून प्रीति नेहमीच तिच्या संघासोबत दिसली आहे. दरवर्षी ती अन्य संघमालक आणि टीम मॅनेजमेंटसोबत ऑक्शनमध्ये दिसते. पण यावेळी प्रीति आपल्या टीमसाठी बोली लावताना दिसणार नाही.
प्रीतिने सांगितलं कारण…. आयपीएल सुरु झाल्यानंतर आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी प्रीति झिंटा नेहमी स्टेडियममध्ये उपस्थित असते. प्रीतिने टि्वट करुन यंदा ती आयपीएलमध्ये दिसणार नसल्याची माहिती दिली आहे. तिने चाहत्यांकडे सल्लाही मागितला आहे. “मी माझ्या लहान मुलाला सोडून भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे मी यंदाच्या आयपीएल लिलावात सहभागी होऊ शकणार नाही. मागचे काही दिवस मी आणि आमची टीम ऑक्शन संदर्भात चर्चेमध्ये व्यस्त होतो. तुमच्याकडे एखाद्या खेळाडू संदर्भात काही सल्ला असल्यास नक्की सांगा” असे प्रितीने तिच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
This year I’m going to miss the IPL Auction as I cannot leave my little ones & travel to India.The last couple of days have been hectic discussing d auction & all things cricket with our team.I wanted to reach out to our fans & ask them if they hv any player suggestions.. pic.twitter.com/oIOCqZT3PN
— Preity G Zinta (@realpreityzinta) February 11, 2022
वसीम जाफरने दिला राजीनामा IPL मेगा ऑक्शनआधीच किंग्ज इलेव्हन पंजाब (Punjab Kings) संघाला मोठा धक्का बसला आहे. वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ते किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. 2019 पासून ते किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या अन्य सपोर्ट स्टाफसोबत काम करत होते. संघातील खेळाडूंना फलंदाजीचे बारकावे शिकवत होते. अभिनेता रणबीर कपूरचा फोटो पोस्ट करुन वसीम जाफर यांनी खास त्यांच्या स्टाइलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदावरुन पाय उतार होत असल्याची माहिती दिली.
Ipl auction 2022 punjab kings co owner preity zinta reveals why she will not attend the event