IPL 2024 Auction | 333 मधून 77 खेळाडूंची निवड होणार, कोणत्या टीमकडे किती जागा?
IPL Mini Auction 2024 Date Time | आयपीएल 2024 मिनी ऑक्शनला अवघे काही तास शिल्लक आहेत. या ऑक्शनमध्ये 333 खेळाडू आपलं नशीब आजमवणार आहेत. या 333 पैकी 77 खेळाडूंचीच निवड होणार आहे.
दुबई | आयपीएल 2024 साठी मिनी ऑक्शन दुबईत पार पडणार आहे. आयपीएल भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिनी ऑक्शन असल्याने 10 संघांकडे बऱ्यापैकी खेळाडू आहेत. या ऑक्शनमधून नव्या खेळाडूंना खरेदी करुन आपली टीम बॅलन्स करण्याचा प्रयत्न फ्रँचायजींचा असणार आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायजी अशाच 5 खेळाडूंना घेईल, जे त्यांना पुढील 5 वर्षांसाठी हवे असतील. जेणेकरुन त्यांना टीममध्ये कायम ठेवता येईल. या 17 व्या ऑक्शनबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1 हजार 166 खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 333 खेळाडूंची नावं अंतिम करण्यात आली. या 333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी आहेत. या यादीतील 333 पैकी 116 कॅप्ड खेळाडू आहेत. तर 215 खेळाडू हे अनकॅप्ड आहेत. तर 2 खेळाडू हे असोसिएट आहेत. तसेच 10 संघांना 77 खेळाडूंची गरज आहे. या 77 खेळाडूंपैकी 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. तर उर्वरित जागा भारतीय खेळाडूंसाठी आहेत. या 77 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकूण 10 संघांकडे 262 कोटी 95 लाख रुपये इतकी रक्कम आहे.
कोणत्या टीमकडे किती रक्कम?
सर्वाधिक रक्कम ही गतविजेत्या गुजरात टायटन्सकडे आहे. गुजरात टायटन्सने ट्रेड विंडोद्वारे हार्दिक पंड्या याला ट्रेड केलं. गुजरातकडे सर्वाधिक 38 कोटी 15 लाख रुपये इतकी रक्कम आहे. तर गुजरातला 8 खेळाडूंची गरज आहे. गुजरातला 8 पैकी 6 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडू घ्यावे लागणार आहेत. तर लखनऊकडे सर्वात कमी म्हणजे 13 कोटी 15 लाख इतरी रक्कम आहे. लखनऊला 6 खेळाडूंची गरज आहे. लखनऊला 5 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडू आपल्या टीममध्ये घ्यावे लागतील.
आयपीएल 2024 ऑक्शनबाबत सर्वकाही
🚨 NEWS 🚨
IPL 2024 Player Auction list announced.
The roster for the Indian Premier League (IPL) 2024 Player Auction has been unveiled. The auction is set to take place in Dubai at the Coca-Cola Arena on December 19th, 2023.
𝗔𝗹𝗹 𝗧𝗵𝗲 𝗗𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝘀 🔽… pic.twitter.com/w26igPZRBH
— IndianPremierLeague (@IPL) December 11, 2023
असा होईल ऑक्शन
एकूण 77 खेळाडूंना 19 यादीत विभागण्यात आलं आहे. यामध्ये बॅट्समन, बॉलर, ऑलराउंडर, स्पिन बॉलर, कॅप्ड खेळाडू, अनकॅप्ड खेळाडू अशा प्रकारे विभागणी करण्यात आली आहे. यानुसार बोली लावली जाईल. आधी कॅप्ड खेळाडूंचा लिलाव होईल. त्यानंतर अनकॅप्ड खेळाडूंसाठी चढाओढ पाहायला मिळेल.
ऑक्शनर कोण असणार?
दरम्यान काही दिवसांपूर्वी वूमन्स प्रीमिअर लीगसाठी ऑक्शन पार पडलं. या डब्ल्यूपीएलमध्ये मल्लिका सागर यांनी ऑक्शनरची भूमिका पार पाडली. आता या आयपीएल ऑक्शनमध्येही मल्लिका सागरच ऑक्शनर असणार आहेत. ह्यू एड्मीड्स यांनी आयपीएल ऑक्शनरची भूमिका पार पाडली.