IPL Auction 2024 | ऑक्शनर मल्लिका सागरची एक चूक आणि आरसीबीला इतक्या लांखाचं नुकसान
Ipl Auction 2024 | पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासात कुणी महिला ऑक्शनर असल्याने मल्लिका सागर यांच्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून होतं. मात्र मल्लिका सागर यांनी केलेल्या एका चुकीमुळे आरसीबीला मोठा फटका बसला.
दुबई | आयपीएल 17 व्या मोसमासाठी दुबईत ऑक्शन पार पडलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दुबईत ऑक्शचं आयोजन करण्यात आलं. या ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच ऑक्शनर म्हणून महिलेने भूमिका बजावली. मल्लिका सागर यांनी वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये ऑक्शनरची भूमिका बजावली. त्यानंतर आता आयपीएलमध्ये मल्लिका सागर यांनीच ऑक्शनरची भूमिका पार पाडली. मात्र ऑक्शन दरम्यान मल्लिका सागर यांच्याकडून एक मोठी घोडचूक झाली.
मल्लिका सागर यांच्या चुकीमुळे आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्या बोलीदरम्यान मल्लिका सागर यांच्याकडून ही घोडचूक झाली. नक्की काय झालं, मल्लिका सागर यांच्याकडून नक्की काय चुकलं हे जाणून घेऊयात.
अल्झारी जोसेफ याची ब्रेस प्राईज 1 कोटी रुपये होती. आरसीबीने अल्झारीसाठी 10 कोटी 50 लाख रुपये अधिकचे मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतला. आरसीबीने अल्झारीला 11 कोटी 50 लाख रुपयात खरेदी केलं. अल्झारी आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळवणारा वेस्ट इंडिजचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. विंडिजच्या निकोलस पूरन याला आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक 16 कोटी रुपये मिळाले.
नक्की काय झालं?
चेन्नई सुपर किंग्सने अल्झारी जोसेफवर बोलीची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने दिल्ली कॅपिट्ल्सही अल्झारीसाठी इच्छूक होती. अल्झारीचा भाव वाढत 3 कोटी रुपयांपर्यंत गेला. मात्र त्यानंतर सीएसकेने माघार घेतली. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स आणि आरसीबी यांच्यात अल्झारीसाठी चढाओढ पाहायला मिळाली. या दोघांमध्ये बोली सुरुच राहिली. अल्झारीचा आकडा 6 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत येऊन पोहचला. मात्र त्यानंतर काही वेळ ऑक्शन थांबवण्यात आलं.
मिचेल मार्श सर्वात महागडा
That’s a GRAND return to the IPL for Mitchell Starc 😎
DO NOT MISS the record-breaking bid of the left-arm pacer who will feature for @KKRiders 💜💪#IPLAuction | #IPL pic.twitter.com/D1A2wr2Ql3
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
…आणि गडबड झाली
या दरम्यान मल्लिका सागर यांच्याकडून चूक झाली. ब्रेकनंतर पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली.आरसीबीने पुन्हा एकदा बोली लावायला सुरुवात केली. मल्लिका सागर यांना इथून 6 कोटी 60 लाखपासून पुढे आकडा सांगायचा होता, मात्र त्यांनी 6 कोटी 80 लाख असा आकडा सांगितला. त्यानंतर पुन्हा बोली 11 कोटी 50 लाख रुपयांवर येऊन थांबली. आरसीबीने अल्झारीला आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र मल्लिका सागर यांच्या चुकीमुळे आरसीबीला अल्झारी 20 लाख रुपयांनी महागात पडला.