IPL Auction 2024 Highlight | ipl लिलावाचा महासंग्राम! कोटीच्या कोटी संपले, पाहा सर्व संघांचे फायनल स्क्वॉड एका क्लिकवर

| Updated on: Dec 27, 2023 | 5:13 PM

IPL Mini Auction 2024 Live Updates in Marathi : आयपीएलचा लिलाव संपला असून सर्व फ्रंचायसींनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला आहे. कोट्यवधी रूपयांचा खजिना खाली झाल्यावर आता कोणत्या संघाकडे कोणते खेळाडू आलेत? फायनल स्क्वॉड जाणून घ्या.

IPL Auction 2024 Highlight | ipl लिलावाचा महासंग्राम! कोटीच्या कोटी संपले, पाहा सर्व संघांचे फायनल स्क्वॉड एका क्लिकवर
IPL Auction Live Blog 2024 update in Marathi

मुंबई : आयपीएल 2024 पर्वाचा लिलाव आज दुबई येथे पार पडला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच लिलाव भारताबाहेर म्हणजे परदेशात झाला. दुबईमध्ये आयपीएलमधील दहा संघांकडे एकूण 262.95 कोटी रूपये शिल्लक होते. लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला 20 कोटी 50 लाख आणि मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाख रूपयांची विक्रमी बोली लागली आहे. प्रत्येक फ्रँचायसींनी आपला संघ तगडा मजबूत करण्यासाठी कोट्यवधी रूपये खेळाडूंवर लावले आहेत. लिलावामधील सर्व अपडेट टीव्ही9 मराठीच्या ब्लॉगवर जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Dec 2023 09:23 PM (IST)

    IPL All Team Full Squad 2024 : आयपीएलमधील सर्व संघांचे फुल स्क्वॉड

    लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल संंघ 2024 केएल राहुल (C), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौथम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.

    राजस्थान रॉयल्स आयपीएल संंघ 2024 संजू सॅमसन (C), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अॅडम झम्पा , आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.

    पंजाब किंग्ज आयपीएल फायनल संंघ 2024 शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कावेरप्पा , शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसौ.

    गुजरात टायटन्स आयपीएल फायनल संंघ 2024 डेव्हिड मिलर, शुभमन गिल (C), मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ.

    कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल फायनल संंघ 2024 नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (C), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.

    सनरायजर्स हैदराबाद पंजाब किंग्ज आयपीएल फायनल संंघ 2024 अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नायक. नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल फायनल संंघ 2024 फाफ डु प्लेसिस(C), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, हिमन्स, मोहम्मद सिराज. शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

    दिल्ली कॅपिटल्स आयपीएल फायनल संंघ 2024 ऋषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसीख दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.

    मुंबई इंडियन्स आयपीएल फायनल संंघ 2024 रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

    चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल फायनल संंघ 2024 एमएस धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद. , निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.

  • 19 Dec 2023 09:11 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : शेवटच्या राऊंडमध्ये काहींना लागली लॉटरी

    करुण नायर – अनसोल्ड

    वकार सलामखेल – अनसोल्ड

    सौरव चौहान – अनसोल्ड

    अर्शद खान – LSG ने २० लाखांना घेतले

    मायकेल ब्रेसवेल – अनसोल्ड

    मोहम्मद नबी – मुंबईने 1.50 कोटींना घेतलं

    शाई होप – DC ने 75 लाखांना खरेदी केलं

    गस ऍटकिन्सन – केकेआरने 1 कोटींना घेतलं

    दुष्मंथा चमीरा – अनसोल्ड

    मॅट हेन्री – अनसोल्ड

    अॅडम मिलने – अनसोल्ड

    स्वस्तिक चिकारा – दिल्लीने 20 लाखांना खरेदी केलं

    अमनदीप खरे – अनसोल्ड

    आबिद मुश्ताक – राजस्थानने 20 लाखांना खरेदी केलं

    रोहित रायुडू – अनसोल्ड

    शिवालिक शर्मा – मुंबईने 20 लाखांना खरेदी केलं

    स्वप्नील सिंग – आरसीबीने 20 लाखांना खरेदी केलं

    जी. अजितेश – अनसोल्ड

    अविनाश राव अरावेली – सीएसकेने 50 लाखांना  खेरदी केलं

    केएल श्रीजीथ – अनसोल्ड

    नांद्रे बर्गर – राजस्थानने 50 लाखांना  खेरदी केलं

    साकिब हुसेन – केकेआरने 20 लाखांना  खेरदी केलं

    गुरजपनीत सिंग – अनसोल्ड

    सौरभ चौहान – आरसीबीने 20 लाखांना खेरदी केलं

  • 19 Dec 2023 08:48 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : हे अनसोल्ड राहिलेले खेळाडू शेवटला मालमाल, भारतीय खेळाडूचा समावेश

    पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड गेलेल्या राईली रूसो याला लॉटरी लागली आहे. पंजाब किंग्जने त्याला तब्बल 8 कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. दुसरा अनसोल्ड खेळाडू फर्गुसन याला आरसीबीने २ कोटी रूपयांना आपल्या ताफ्यत सामील केलं आहे. अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमाना याला केकेआरने २ कोटी रूपयांना घेतलं आहे. मनीष पांडे यालाही 50 लाखांमध्ये केकेआरने शेवटला खरेदी केलं आहे.

  • 19 Dec 2023 08:38 PM (IST)

    आयपीएल लिवावामध्ये मुंबई इंडियन्सने घेतला ‘मलिंगा 2.0’, व्हिडीओ पाहा

    आयपीएल लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने स्टार गोलंदाजा मलिंगाची कॉपी घेतली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून नुवान तुषाराला 4 कोटी 80 लाख रूपयांना विकत घेतलं आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    पाहा व्हिडीओ-

  • 19 Dec 2023 07:40 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : स्टार बॉलरची सीएसकेमध्ये एन्ट्री

    बांगलादेश संघाचा बॉलर मुस्तफिजुर रहमान याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने 2 कोटी रूपयांना विकत घेतलं आहे.

  • 19 Dec 2023 07:36 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : डेव्हिडी विली 2 कोटी, लखनऊमध्ये एन्ट्री

    लखनऊ सुपर जायंट्स संघाने डेव्हिडी विली याला 2 कोटी रूपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे.

  • 19 Dec 2023 06:45 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : मुंबई इंडियन्समध्ये श्रेयस गोपाळची एन्ट्री

    श्रेयस गोपाळला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना विकत घेतलंय. एम सिद्धार्थला लखनऊ सुपर जायंट्सने 2.4 कोटींना विकत घेतलंय रसिक दारला दिल्ली कॅपिटल्सने 20 लाख रुपयांना विकत घेतलंय मानव सुथारला गुजरात टायटन्सने 20 लाख रुपयांना विकत घेतलंय

  • 19 Dec 2023 06:24 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : गुजरात टायटन्समध्ये कार्तिक त्यागीची एन्ट्री

    कार्तिक त्यागी युवा खेळाडूली गुजरात टायटन्स संघाने 60 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे.

  • 19 Dec 2023 06:18 PM (IST)

    Yash Dyal IPL Auction 2024 : रिंकू सिंहने सलग पाच सिक्स मारलेल्या बॉलरला इतक्या कोटींची बोली

    आयपीएलमध्ये कोलकाताच्या रिंकू सिह याने सलग पाच सिक्स मारलेल्या यश दयाल याला मोठी बोली लागली आहे. यश दयाल याला घेण्यासाठी गुजरातने प्रयत्न केले होते पण आरसीबीने त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 5 कोटी रूपयांची बोली लावली.

  • 19 Dec 2023 06:14 PM (IST)

    सर्वात महागडा खेळाडू ठरल्यावर स्टार्कची पहिली प्रतिक्रिया

    आयपीएल लिलावात मिचेल स्टार्क सर्वात महागडा खेळाडू ठरल आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला 24 कोटी 75 लाख रूपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे.  कोलकाताने व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 19 Dec 2023 05:51 PM (IST)

    Shahrukh Khan IPL Auction 2024 : गुजरात टायटन्सने शाहरूख खानला घेतलं विकत

    शाहरूख खान याला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि  गुजरात टायटन्स यांच्यात चांगलीच टसल झालेली पाहायला मिळाली. प्रीती झिंटाने खेळाडूला संघात परत घेण्यासाठी ताकद लावली पण  गुजरातने शेवटपर्यंत बोली लावत त्याला 7 कोटी 40 लाखांमध्ये खरेदी कलं आहे.

  • 19 Dec 2023 05:37 PM (IST)

    Sameer Rizvi IPL Auction 2024 : समीर रिझवी मालामाल

    उत्तर प्रदेशचा फलंदाज समीर रिझवी याला चेन्नई सुपर किंग्जने 8.4 कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

  • 19 Dec 2023 05:24 PM (IST)

    IPL Auction 2024 Live | विदर्भाचा पोट्ट्या झाला करोडपती

    अनकॅप खेळाडूंच्या राऊंडला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला शुभम दुबे याच्यावर बोली लावली गेली. शुभमची बेस प्राईज ही 20 लाख होती. राजस्थान रॉयल्स आणि दिल्लीमध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस लागली होती. 20 लाख बेस प्राईज असलेल्या शुभमला राजस्थान रॉयल्सने 5 कोटी 80 लाख रूपयांना विकत घेतलं आहे.

  • 19 Dec 2023 03:58 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : शिवम मावीला 6.40 कोटींची बोली

    फ्रँचायझीने युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीला मोठी बोली लागली आहे. मावीची मूळ किंमत 50 लाख आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली लावली होती. शेवटी लखनऊने शिवम मावीला 6.40 कोटींना विकत घेतले.

  • 19 Dec 2023 03:52 PM (IST)

    Mitchell Starc IPL Auction 2024 : इतिहास घडला, मिचेल स्टार्क इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

    मिचेल स्टार्कसाठी पैसे लागणार यात काही शंक नव्हती, गड्याची किंमत 2 कोटी होती. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार लढाई सुरू होती. मात्र दोघांनी हार मानली आणि कोलकाता आणि गुजरात यांच्यात भिडंत लागली. दोन्ही फ्रंचायसी विचार करत होते आणि आकडा वाढत होता, वाढता वाढता आकडा थेट 24 कोटी 75 लाख रूपयांना कोलाकाता नाईट रायडर्स संघाने खरेदी केलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

  • 19 Dec 2023 03:29 PM (IST)

    Player Name IPL Auction 2024 |अल्जारी जोसेफसाफी बंगलोरने मोजले 11 कोटी 50 लाख

    अल्जारी जोसेफसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात  चुरस लागली होती. त्यानंतर  बंगलोरने सहभाग घेतला, लखनऊ आणि बंगलोरमध्ये लढाई सुरू झाली होती. अखेर बंगलोरने त्याला 11 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं.

  • 19 Dec 2023 03:27 PM (IST)

    Umesh Yadav IPL Auction 2024 | विदर्भ एक्सप्रेस उमेश यादव करोडपती

    भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने आपली बेस प्राईज दोन कोटी ठेवली होती.  गुजरात टायटन्स संघाने त्याला खरेदी केलं आहे. गुजरात आणि हैदराबादमध्ये लढाई सुरू होती त्यानंतर दिल्लीने एन्ट्री मारली पण शेवटी त्याला 5 कोटी 80 लाख रूपयांना आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 19 Dec 2023 03:18 PM (IST)

    IPL Auction 2024 Live | चेतन साकारिया बेस प्राईजमध्ये खरेदी

    चेतन साकारिया याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 50 लाखांना खरेदी केलं आहे. कोलकाताने आपल्या संघातील बॉलर रीलीज केले होते. त्यासाठी ते बॉलर्सवर पैसे लावताना दिसतील.

  • 19 Dec 2023 03:15 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : दोन बडे खेळाडू अनसोल्ड

    जोस इंग्लिस आणि कुसल मेंडिस दोघेही अनसोल्ड राहिले आहेत. दोघांनाही कोणीच घेतलं नाही.

  • 19 Dec 2023 03:13 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : के. एस. भरत कोलकाताच्या ताफ्यात

    केस भरत याला कोलकाता संघाने 50 लाखांमध्ये खरेदी केलं आहे. इतर कोणत्याही संघाने त्याला विकेत इच्छा दाखवली नाही.

  • 19 Dec 2023 03:11 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : शतकवीर साल्ट अनसोल्ड

    फिल साल्ट याला कोणीच बोली लावली नाही. आता गेल्या काही दिवसांमागे त्याने शतक ठोकलं होतं. तिसऱ्या सेटमध्ये त्याला कोणीच बोली लावली नाही.

  • 19 Dec 2023 02:46 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : ख्रिस वोक्ससाठी पंजाब किंग्सने मोजले 4 कोटी

    इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सला पंजाब किंग्सने 4.20 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.

  • 19 Dec 2023 02:43 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : डॅरेल मिचेलसाठी सीएसकेने मोजले 14 कोटी

    डॅरेल मिचेल याची बेस प्राईज ही 1 कोटी होती. त्याला घेण्यासाठी पंजाब आणि दिल्लीच्या फ्रंचायसींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती, त्यानंतर चेन्नईने एन्ट्री केली आणि. अखेर त्याला चेन्नईने 14 कोटी रूपयांन आपल्या संघात घेतलं आहे.

  • 19 Dec 2023 02:27 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : हर्षल पटेलचं नशीब फळफळलं

    भारताचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल याला गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढाई सुरू होती. अखेर पंजाबने त्याला 11 कोटी 75 लाख रूपयांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

  • 19 Dec 2023 02:21 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : मुंबई इंडियन्सची पहिली खरेदी

    दक्षिण आफ्रिका संघाच्या जेराल्ड कोएत्झी याला मुंबई इंडियन्सने 5 कोटी रूपयांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने लिलावामध्ये खरेदी केलेला पहिला खेळाडू आहे.

  • 19 Dec 2023 02:18 PM (IST)

    Pat Cummins IPL Auction 2024 : आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू

    ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची बेस प्राईज 2 कोटी होती. हैदराबाद, चेन्नई, बंगलोर यांच्यात त्याला घेण्यासाठी चुरस रंगली होती, शेवटला आरसीबी आणि हैदराबादने उडी घेतली. बराचवेळ दोघांमध्ये भिडंत पाहायला मिळाली अखेर हैदराबादने त्याला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं आहे.

  • 19 Dec 2023 02:04 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : लॉर्ड ठाकूरला लॉटरी, परत एकदा सीएसकेकडून खेळणार

    भारताचा युवा खेळाडू शार्दुल ठाकूर परत एकदा सीएसकेमध्ये परतला आहे. सीएसकेने त्याला 4 कोटी रूपयांमध्ये  खरेदी केलं. हैदराबाद आणि सीएसकेमध्ये मोठी चुरस रंगली होती.

  • 19 Dec 2023 02:00 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : सीएसकेकडून खेळणार रचिन रविंद्र

    न्यूझीलंड संघाचा युवा खेळाडू रचिन रविंद्र याला घेण्यासाठी दिल्ली आणि चेन्नईमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. रचिनची बेस प्राईज 50 लाख होती त्याला चेन्नईने 1 कोटी 80 लाख रूपयांंना खरेदी केलं आहे.

  • 19 Dec 2023 01:55 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : वनिंदू हसरंगाची बेस प्राईजमध्ये खरेदी

    दुसरा सेट ऑल राऊंडर्स खेळाडूंचा असणार असून यामध्ये तगड्या खेळाडूंची नाव आहेत. पहिला खेळाडू वनिंदू हसरंगा होता, त्याला बेस प्राईज 1 कोटी 50 लाखमध्ये सनाराईजर्स हैदराबादने खरेदी केलं.

  • 19 Dec 2023 01:41 PM (IST)

    IPL Auction 2024 : पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड राहिले हे मॅचविनर खेळाडू

    भारतीय खेळाडू करूण नायर, मनीष पांडे आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे तीन खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. पहिल्या आयपीएलपासून खेळत आलेला पांडे अनसोल्ड पहिल्या राऊंडमध्ये राहिला आहे.

  • 19 Dec 2023 01:36 PM (IST)

    IPL Mock Auction 2024 | ट्रॅव्हिस हेडसाठी चेन्नई-हैदराबादमध्ये घमासान

    ट्रॅव्हिस हेड याची बेस प्राईज २ कोटी होती, वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हेडसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात चुरसं रंगलेली पाहायला मिळाली. अखेर हैदराबाद संघाने त्याला 6 कोटी 80 लाख रूपयांना खरेदी केलं.

  • 19 Dec 2023 01:31 PM (IST)

    IPL Mini Auction 2024 Live : हा खेळाडू राहिला अनसोल्ड

    दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रौसो याला कोणीच बोली लावली नाही. पहिला खेळाडू जो लिलावात अनसोल्ड राहिला.

  • 19 Dec 2023 01:29 PM (IST)

    IPL Mini Auction 2024 Live : हॅरी ब्रुक

    हॅरी ब्रुक याला दिल्ली कॅपिटल्स संघाने 4 कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे. हैदराबादने त्याला यंदा रिलीज केलं होतं.

  • 19 Dec 2023 01:22 PM (IST)

    Rovman Powell IPL Auction 2024 : पहिल्याच खेळाडूला तगडी किंमत

    आयपीएलच्या लिलावात पहिलाच वेस्ट इंडिजचा खेळाडू रोव्हमन पॉवेल याच्यासाठी फ्रंचायसींमध्ये चुरस रंगलेली पाहायला मिळाली. कोलकाता आणि राजस्थानमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. शेवटी राजस्थान संघाने त्याला ७ कोटी ४० लाखांमध्ये विकत घेतलं.  रोव्हमन पॉवेल याची बेस प्राईज 1 कोटी होती.

  • 19 Dec 2023 01:15 PM (IST)

    IPL Mock Auction 2024 : महेंद्र सिंह धोनी पोहोचला दुबईत

    IPL 2023 चा लिलाव लवकरच सुरु झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचाॉ ऋषभ पंत आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीह दुबईला पोहोचला आहे.

  • 19 Dec 2023 01:10 PM (IST)

    IPL Mock Auction 2024 : आयपीएल लिलावाला सुरूवात

    आयपीएल लिलावाला सुरूवात झाली आहे. पहिल्या राऊंडमध्ये फ्रँचायसी कोणत्या खेळाडूसाठी खजिना उघडतात, करूण नायर, हॅरी ब्रूक, ट्रॅव्हिस हेड यांच्यावर सर्वांची नजर असणार आहे.

  • 19 Dec 2023 01:02 PM (IST)

    IPL Mini Auction 2024 Live : आयपीएल लिलावामधून तीन खेळाडूंची माघार

    आयपीएल लिलावाच्या आधी तीन खेळाडूंनी आपली नावं मागे घेतली आहेत. इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमद, बांगलादेशचा शरीफुल इस्लाम आणि वेगवान गोलंदाज तस्किन अहमद यांचा समावेश आहे.

  • 19 Dec 2023 12:57 PM (IST)

    IPL Mini Auction 2024 Live : या खेळाडूंवर राहणार सर्वांची नजर

    आयपीएल लिलावात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, रचिन रविंद्र, शार्दुल ठाकूर, जेराल्ड कोएत्झी, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, हॅरी ब्रुक या खेळाडूंवर मजबूत बोली लागण्याची शक्यता आहे.

  • 19 Dec 2023 12:47 PM (IST)

    IPL Auction 2024 Live : ऋषभ पंत इज बॅक

    दुखापतीनंतर ऋषभ पंत आता तंदुरुस्त आहे. तो लवकरच संघात परतणार आहे. पण त्याआधी आज होणाऱ्या लिलावात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलावर बसलेला दिसणार आहे.

  • 19 Dec 2023 12:39 PM (IST)

    आयपीएल लिलावात आज 20 कोटींची बोली लागणार का?

    आयपीएल लिलावात आज 20 कोटींची बोली लागणार का? आतापर्यंत 20 कोटींचा आकडा पार झालेला नाही. पंजाब संघाने सॅन करन याला सर्वाधिक 18.50 कोटींची बोली लागली होती. आज हा रेकॉर्ड मोडला जाणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

  • 19 Dec 2023 12:33 PM (IST)

    आयपीएलमध्ये पहिल्यांदाच महिला लिलावकर्ता असणार

    आयपीएलमध्ये पहिल्यांदाच महिला लिलावकर्ता असणार आहे. मल्लिका सागर असं लिलावाचं काम पाहणाऱ्या महिलेचं नाव आहे.  मल्लिका सागर यांनीच वुमन्स प्रीमिअर लिलावावेळी ऑक्शनर म्हणून काम पाहिलं होतं.

  • 19 Dec 2023 12:27 PM (IST)

    Ipl Auction : कोणत्या संघाकडे किती सर्वात जास्त पैसे?

    गुजरात संघाकडे एकूण 38.15 कोटी रूपये आहेत. दुसऱ्या स्थानी हैदराबाद संघ असून त्यांच्याकडे 34 कोटी आहे. तिसऱ्या स्थानी केकेआर असून त्यांच्याकडे 32.7 कोटी, चौथ्या स्थानी सीएसके असून त्यांच्याकडे 31.4 कोटी, पाचव्या स्थानी पंजाब संघ असून 29.1 कोटी आहेत.

    सहाव्या क्रमांकावर आरसीबी असून त्यांच्याकडे आता 23.25 कोटी, सातव्य स्थानी दिल्ली कॅपिटल्स 28.95 कोटी, आठव्या स्थानी मु्ंबई इंडियन्स असून 17.75 कोटी तर नऊव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स असून त्यांच्याकडे 14.5 कोटी तर दहाव्या स्थानी लखनऊ सुपर किंग्ज संघ असून त्यांच्याकडे 13.15 कोटी बाकी आहेत.

  • 19 Dec 2023 11:56 AM (IST)

    Ipl Auction : आयपीएलचा लिलाव कुठे आणि किती वाजता होणार सुरू?

    आयपीएलचा लिलाव दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी, तेलुगु, कन्नड स्टार स्पोर्ट्स 1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स 3 वर पाहता येणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कनाडा, पंजाबी आणि भोजपुरी या 7 भाषांमध्ये जिओ सिनेमा एपवर आयपीएल ऑक्शनचं दिग्गजांकडून विश्लेषण करण्यात येणार आहे.

Published On - Dec 19,2023 11:39 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.