IPL Mega Auction 2025 Updates And Highlights : मेगा ऑक्शनमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक, ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू

| Updated on: Nov 26, 2024 | 2:01 AM

IPL Auction 2025 Day 1 and Day 2 Updates and Highlights In Marathi : आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. मेगा ऑक्शनमधून एकूण 10 फ्रँचायजींनी 182 खेळाडूंवर बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं. या 182 खेळाडूंवर एकूण 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर 375 खेळाडू कमनशिबी ठरले.

IPL Mega Auction 2025 Updates And Highlights : मेगा ऑक्शनमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक, ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू
IPL 2025 MEGA AUCTION LIVE UPDATES

जगातील सर्वात श्रीमंत टी 20 लीग अशी ओळख असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) 2 दिवसीय मेगा ऑक्शन सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात पार पडलं आहे. मेगा ऑक्शनसाठी एकूण 1 हजार 557 खेळाडूंमधून 557 जणांची नावं ऑक्शनसाठी निवडण्यात आली होती. तर 10 संघांना मिळून एकूण 204 खेळाडू पाहिजे होते. त्यापैकी पहिल्या दिवशी 24 नोव्हेंबरला 84 खेळाडूंवर बोली लागली. त्यापैकी 72 खेळाडू सोल्ड झाले. तर 12 अनसोल्ड राहिले. या 12 अनसोल्ड खेळाडूंची दुसऱ्या दिवशी अखेरच्या फेरीत पुन्हा नावं घेतली जाणार होती.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबरला 485 खेळाडूंमधून 132 जणांची निवड केली जाणार होती. दुसऱ्या दिवशी एकूण 10 फ्रँचायजींनी 110 खेळाडू घेतले. नियमांनुसार, प्रत्येक टीम किमान 18 तर जास्तीत जास्त 25 खेळाडू घेऊ शकते. त्यामुळे सर्व संघांनी 20 आणि त्यापेक्षा अधिक खेळाडू घेतले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 485 मधून 110 सोल्ड ठरले. अशाप्रकारे या मेगा ऑक्शनमधून 577 पैकी फक्त 182 खेळाडू (72+110) सोल्ड झाले. तर इतर 375 खेळाडू अनसोल्ड राहिले.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Nov 2024 01:29 AM (IST)

    IPL 2025 Mega Auction Day 2 Live Updates : मेगा ऑक्शन पार

    आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं आहे. मेगा ऑक्शनमधून एकूण 10 फ्रँचायजींनी 182 खेळाडूंवर बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं. या 182 खेळाडूंवर एकूण 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर 375 खेळाडू कमनशिबी ठरले. या खेळाडूंसाठी कुणीच बोली न लावल्याने ते अनसोल्ड राहिले.

  • 25 Nov 2024 10:41 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction Day 2 Live Updates : अर्जुन तेंडुलकर अखेर सोल्ड, पलटणच्या ताफ्यात कमबॅक

    अर्जुन तेंडुलकर अखेर सोल्ड झाला आहे. अर्जून पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरला होता. मात्र दुसऱ्या फेरीत अर्जुनला 30 लाख याच बेस प्राईजमध्ये मुंबईनेच घेतलं. अर्जुनची यासह घरवापसी झाली आहे.

  • 25 Nov 2024 09:47 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction Live Updates : अर्जुन तेंडुलकर अनसोल्ड

    क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये अनसोल्ड राहिला आहे. अर्जुनला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्येही कुणी घेतलं नाही. अर्जुन याआधी मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र मुंबईने अर्जुनला रिलीज केलं होतं.

  • 25 Nov 2024 08:31 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction Live Updates : वैभव सूर्यवंशी मालामाल, किती मिळाले?

    आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमधील सर्वात युवा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीची चांदी झाली आहे. वैभवची 30 लाख रुपये बेस प्राईज होती. मात्र वैभवला 1 कोटी 10 लाख रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. वैभवला राजस्थानने घेतलं आहे.

  • 25 Nov 2024 08:16 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction Live Updates: मुशीर सोल्ड, सर्फराज अनसोल्ड

    ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या सर्फराज खानला मोठा झटका लागला आहे. सर्फराज खान पुन्हा एकदा अनसोल्ड राहिला आहे. मात्र सर्फराजचा धाकटा भाऊ मुशीर सोल्ड झाला आहे. मुशीरला 30 लाख रुपयांमध्ये पंजाबने घेतलं आहे.

  • 25 Nov 2024 07:51 PM (IST)

    1 ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणाऱ्या प्रियांश आर्याला 3.80 कोटी

    दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत 1 ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणाऱ्या प्रियांश आर्याला पंजाब किंग्सने 3.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलंय. प्रियांशला त्याच्या बेस प्राईजपेक्षा जवळपास 13 पट अधिक रक्कम मिळाली.

  • 25 Nov 2024 06:36 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Live Updates : अंशुल कंबोज याला 3.40 कोटी

    रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात एकाच डावात 10 पैकी 10 विकेट्स घेणाऱ्या अंशुल कंबोज याचं नशिब फळफळलं आहे. चेन्नईने अंशुलसाठी 3.40 कोटी रुपये मोजले. अंशुल कंबोज गेल्या हंगामात मुंबईच्या गोटात होता

  • 25 Nov 2024 05:32 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Live Updates : कॅप्ड स्पिनर, केशव महाराज अनसोल्ड

    • अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान अनसोल्ड राहिला. मुजीबची बेस प्राईज 2 कोटी होती.
    • मुंबईने अल्लाह गजनफर याला 4.80 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतलं.
    • विजयकात वियासकांत अनसोल्ड राहिला.
    • विंडिजचा अकील हुसैन अनसोल्ड राहिला.
    • आदिल रशीद अनसोल्ड राहिला.
    • केशव महाराज अनसोल्ड राहिला.
  • 25 Nov 2024 05:07 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Live Updates : कॅप्ड फास्टर बॉलर, भुवनेश्वर कुमारची चांदी, किती कोटी मिळाले?

    • तुषार देशपांडे याला राजस्थानने 6 कोटी 50 लाख रुपयात घेतलं.
    • गुजरातने गेराल्ड कोएत्झीला 2 कोटी 40 लाख रुपयात घेतलं.
    • भुवनेश्वर कुमारची चांदी झाली. भुवीला आरसीबीकडून 10 कोटी 75 लाख मिळाले. त्याची बेस प्राईज 2 कोटी होती.
    • मुकेश कुमारसाठी 6.50 कोटींची बोली लावण्यात आली. दिल्लीने मुकेशसाठी आरटीएमचा पर्याय निवडला. पंजाबने मुकेशसाठी दिल्लीसमोर 8 कोटींचा प्रस्ताव ठेवला. पंजाबचा हा प्रस्ताव दिल्लीने स्वीकारला. दिल्लीने या प्रकारे मुकेशला आरटीएमद्वारे 8 कोटींमध्ये घेतलं.
    • मुंबईने दीपक चाहर याला 9.25 कोटींमध्ये घेतलं.
    • लखनऊने आकाश दीप याला 8 कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं.
    • पंजाबने लॉकी फर्ग्यूसन याला 2 कोटींच्या बेस प्राईजमध्ये घेतलं.
  • 25 Nov 2024 04:27 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Live Updates : कॅप्ड विकेटकीपर बॅट्समन, केएस भरत अनसोल्ड

    • विंडिजचा शाई होप पहिल्या अनसोल्ड राहिला.
    • मुंबईने रायन रिक्लेटोन याला 1 कोटी या बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • केएस भरत अनसोल्ड ठरला.
    • जोश इंग्लिश याला पंजाब किंग्सने 2 कोटी 60 लाख रुपयांमध्ये घेतलं.
    • एलेक्स अनसोल्ड राहिला.
    • डोनावन फरेरा अनसोल्ड राहिला.
  • 25 Nov 2024 04:22 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Updates : कॅप्ड ऑलराउंडर सेट, शार्दूल ठाकुर अनसोल्ड

    • शार्दुल ठाकुर पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. शार्दुलची बेस प्राईज 2 कोटी होती.
    • गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरसाठी 3 कोटी 20 लाखांची बोली.
    • चेन्नईने सॅम करन याच्यासाठी 2.40 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.
    • मार्को यान्सेन याला पंजाबने 7 कोटींमध्ये घेतलं.
    • डॅरेल मिचेल पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला.
    • कृणाल पंड्या याच्यासाठी आरसीबीने 5.75 कोटी मोजले.
    • राजस्थानने नितीश राणा याला 4 कोटी 20 लाखांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
  • 25 Nov 2024 03:52 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Updates :कॅप्ड बॅट्समन, रहाणे-पृथ्वी अनसोल्ड

    • दुसऱ्या दिवशी ऑक्शनला कॅप्ड फलंदांच्या फेरीपासून सुरुवात झाली. अनेक दिग्गज फलंदाज हे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले. न्यूझीलंडचा केन विलियमसन, टीम इंडियाचे अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि ग्लेन फिलिप्स हे पाचही अनसोल्ड राहिले.
    • रोवमॅन पॉवेल याला केकेआरने 1.50 कोटी या बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • फाफ डुप्लेसिस याला दिल्लीने 2 कोटी या बेस प्राईजमध्ये घेतलं.
  • 25 Nov 2024 01:00 PM (IST)

    Ipl Mega Auction 2025 Day 2 Updates : दुसऱ्या दिवशी 485 खेळाडूंमधून 132 जणांची निवड होणार, कोण होणार मालामाल?

    आयपीएल मेगा ऑक्शन 2025 साठी एकूण 557 खेळाडूंची नावं अंतिम करण्यात आली. त्यापैकी 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावण्यात आली.त्यापैकी 72 खेळाडूंना विविध संघांनी घेतलं. तर 12 खेळाडू हे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी 485 खेळाडूंमधून 132 जणांसाठी बोली लावण्यात येणार आहे. तसेच पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंना दुसऱ्या दिवशी कुणी घेतं का? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

  • 25 Nov 2024 12:46 AM (IST)

    IPL 2025 Auction Live : मेगा ऑक्शनचा पहिला दिवस संपला

    मेगा ऑक्शनचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. 84 पैकी 72 खेळाडूंना विविध संघांनी घेतलं. तर 12 खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 25 Nov 2024 12:43 AM (IST)

    IPL 2025 Auction Live : अनकॅप्ड स्पिनर, पीयूष चावला अनसोल्ड

    • आरसीबीने सुयश शर्मा याच्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपये मोजले.
    • मुंबईने कर्ण शर्मासाठी 50 लाख रुपये मोजले.
    • मयंक मार्कंडे याला केकेआरने 30 लाख या बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • टीम इंडियाचा माजी स्पिनर पीयूष चावला अनसोल्ड राहिला.
    • कार्तिकेय सिंह याला राजस्थानकडून 30 लाख रुपयांमध्ये घेण्यात आलं.
    • गुजरातने मानव सुथार याला 30 लाख या बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • श्रेयस गोपाळ अनसोल्ड राहिला.
  • 25 Nov 2024 12:35 AM (IST)

    IPL 2025 Auction Live : अनकॅप्ड फास्टर बॉलर, कोणाला लॉटरी?

    • आरसीबीकडून रसीख डार याच्यावर 2 कोटींची बोली लावण्यात आली. दिल्लीकडून रसीखसाठी आरटीएमचा वापर करण्यात आला. आरसीबीने 6 कोटींचा प्रस्ताव ठेवला. मात्र दिल्लीने माघार घेतली आणि रसीख आरसीबीचा झाला.
    • राजस्थानने आकाश मधवाल याला 1 कोटी 20 लाख रुपयांमध्ये घेतलं.
    • दिल्लीने मोहित शर्मा याला 2.20 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
    • पंजाबने विजयकुमार वैशाख याला 1.80 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
    • केकेआरने वैभव अरोडा याला 1.80 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
    • यश ठाकुर याला पंजाबने घेतलं. पंजाबने यशसाठी 1.60 कोटी मोजले.
    • हैदराबादने सिमरजीत सिंह याला 1 कोटी 50 लाख रुपयांमध्ये घेतलं.
    • कार्तिक त्यागी अनसोल्ड राहिला.
  • 25 Nov 2024 12:25 AM (IST)

    IPL 2025 Auction Live : अनकॅप्ड विकेटकीपर, सर्वात महागडा कोण?

    • कुमार कुशाग्र याच्यासाठी गुजरातने 65 लाख मोजले.
    • रॉबिन मिंज याला मुंबईने 65 लाख रुपयात आपल्याकडे घेतलं.
    • बंगळुरुने अनुज रावत याला 30 लाख बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • लखनऊने आर्यन जुयाल याला 30 लाख बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • विष्णु विनोद याला पंजाब किंग्सने 95 लाख या किंमतीत आपल्या ताफ्यात घेतलं.
    • उपेंद्र यादव आणि लवनथी सिसोदीया अनसोल्ड राहिले.
  • 25 Nov 2024 12:19 AM (IST)

    IPL 2025 Auction Live : अनकॅप्ड ऑलराउंडर, सर्वात महागडा कोण?

    • गुजरात टायटन्सने निशांत सिंधूला 30 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
    • समीर रिझवी याला दिल्लीने 95 लाख रुपयांमध्ये घेतलं.
    • नमन धीर याच्यासाठी राजस्थानने 3.40 कोटींची बोली लावली. मात्र मुंबईने नमनसाठी आरटीएमचा वापर केला. राजस्थानने नमनसाठी 5.25 कोटींची अंतिम बोली लावली. मुंबईने राजस्थानचा हा प्रस्ताव मान्य केला. नमनची अशाप्रकारे घरवापसी झाली.
    • अब्दुल समदसाठी लखनऊने 4.20 कोटी मोजले.
    • हरप्रीत ब्रार याला पंजाबने 1.50 कोटींमध्ये आपल्याकडे घेतलं.
    • चेन्नईने विजय शंकर याला 1.20 कोटींमध्ये घेतलं.
    • महिपाल लोमरुरला गुजरातने 1.70 कोटींमध्ये घेतलं. आरसीबीने लोमरुरसाठी आरटीएम वापरण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
    • दिल्लीने आशुतोष शर्माला 3.80 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
    • उत्कर्ष सिंह अनसोल्ड राहिला. उत्कर्षची बेस प्राईज 30 लाख रुपये होती.
  • 25 Nov 2024 12:10 AM (IST)

    IPL 2025 Auction Live : अनकॅप्ड बॅट्समन, नेहाल वढेराला 4 कोटी 20 लाख

    • अर्थव तायडेला हैदराबादकडून 30 लाख
    • अनमोलप्रीत सिंह अनसोल्ड
    • पंजाब किंग्सकडून नेहल वढेरावर 4.20 कोटींची बोली लावण्यात आली, मात्र मुंबईकडून आरटीएमचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे नेहल 4.20 कोटींध्ये पंजाबचा झाला
    • केकेआरने अंगकृष रघुवंशी याला 3 कोटींमध्ये आपल्या गोटात घेतलं.
    • करुण नायरला दिल्लीने 50 लाखांमध्ये घेतलं.
    • यश धुल अनसोल्ड राहिला. यशची बेस प्राईज 30 लाख रुपये होती.
    • हैदराबादने अभिनव मनोहरसाठी 3.20 कोटी मोजले.
  • 24 Nov 2024 11:55 PM (IST)

    IPL Auction Live: कॅप्ड स्पिनर सेट, कुणाला किती किंमत?

    • राजस्थानकडून महीश तीक्षणा याला 4 .40 कोटी मिळाले. महीशसाठी चेन्नईने आरटीएमचा वापर करण्यात रस दाखवला नाही.
    • राहुल चाहर याला हैदराबादकडून 3.20 कोटी इतकी किंमत मिळाली. राहुलची बेस प्राईज 1 कोटी होती.
    • हैदराबादने एडन झॅम्पा याला 2 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.
    • राजस्थानने श्रीलंकेचा स्पिनर वानिंदु हसरंगा याला 5.25 कोटी मोजून आपल्या गोटात घेतलं.
    • सलामखेल पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. सलाामखेल याची बेस प्राईज 75 लाख रुपये होती.
    • नूर अहमद याच्यावर चेन्नईने 5 कोटींची बोली लावली. मात्र नूरसाठी गुजरातने आरटीएमचा वापर केला. त्यानंतर चेन्नईने नूरसाठी 10 कोटींचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्यानंतर गुजरातने माघार घेतली. त्यामुळे नूर चेन्नईचा झाला.
  • 24 Nov 2024 08:49 PM (IST)

    कॅप्ड वेगवान गोलंदाज, ट्रेन्ट बोल्टची पलटणमध्ये एन्ट्री

    • जोश हेझलवूड : 12 कोटी 50 लाख, आरसीबी
    • प्रसिध कृष्णा : 9 कोटी 50 लाख, गुजरात
    • आवेश खान : 9 कोटी 75 लाख, लखनऊ
    • एनरिच नॉर्खिया : 6 कोटी 50 लाख, केकेआर
    • जोफ्रा आर्चर : 12 कोटी 50 लाख, राजस्थान
    • खलील अहमद : 4 कोटी 80 लाख, सीएसके
    • टी नटराजन : 10 कोटी 75 लाख, दिल्ली
    • ट्रेन्ट बोल्ट : 12 कोटी 50 लाख, मुंबई
  • 24 Nov 2024 08:10 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : कॅप्ड विकेटकीपर, इशान किशनला किती कोटी?

    • केकेआरने क्विंटन डी कॉक याला 3 कोटी 60 लाख रुपयांमध्ये घेतलं.
    • जॉनी बेयरस्टो अनसोल्ड ठरला. बेयरस्टोची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.
    • फिल सॉल्ट याला आरसीबीने 11.50 कोटींमध्ये घेतलं.
    • केकेआरने रहमानुल्लाह गुरुबाज याला 2 कोटींच्या बेस प्राईजमध्ये घेतलं.
    • सनरायजर्स हैदराबादने ईशान किशनसाठी 11.25 कोटी मोजले. ईशानची बेस प्राईज 2 कोटी होती.
    • आरसीबीकडून जितेश शर्मासाठी 7 कोटींची बोली लावण्यात आली. जितेशसाठी पंजाबने आरटीएम वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीने पुन्हा जितेशवर 11 कोटींची अंतिम बोली लावली, मात्र पंजाबने रस दाखवला नाही. त्यामुळे जितेश शर्मा 11 कोटींसह आता आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.
  • 24 Nov 2024 07:54 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : कॅप्ड ऑलराउंडर, वेंकटेश अय्यरला 23 कोटी 75 लाख, इतरांना किती?

    • कॅप्ड ऑलराउंड खेळाडूंमध्ये वेकंटेश अय्यर सरस ठरला. केकेआरने वेंकटेश अय्यरला 23 कोटी 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.
    • हर्षल पटेल याच्यासाठी हैदराबादने 6 कोटी 75 लाख रुपये मोजले.
    • आर अश्विन याची घरवापसी झाली. चेन्नईने अश्विनला 9 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं.
    • रचीन रवींद्रसाठी पंजाबने 3.20 कोटींची बोली लावली. मात्र सीएसकेने आरटीएमचा पर्याय निवडला. सीएसकेने पंजाबने दिलेला 4 कोटींचा प्रस्ताव स्वीकारला. त्यामुळे रचीनला 4 कोटी मिळाले.
    • मार्कस स्टोयनिस याला पंजाब किंग्सला 11 कोटी रुपयांमध्ये घेतलं.
    • मिचेल मार्श याच्यसाठी लखनऊने 3 कोटी 40 लाख रुपये मोजले.
  • 24 Nov 2024 07:44 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : कॅप्ड बॅट्समन, पडीक्कल आणि वॉर्नर पहिल्या फेरीत अनसोल्ड

    12 प्रमुख खेळाडूंपासून मेगा ऑक्शनला सुरुवात झाली. या 12 खेळाडूंचं 2 यादींमध्ये प्रत्येकी 6-6 नुसार विभागण्यात आलं. अशाप्रकारे मॉर्की प्लेअर्स सोल्ड ठरले. ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅप्ड बॅट्समन आणि त्यानंतर कॅप्ड ऑलराउंडर खेळाडूंवर बोली लावण्यात आली. कॅप्ड बॅट्समनमधून अनुभवी डेव्हिड वॉर्नर आणि देवदत्त पडीक्कल हे दोघे कमनिशबी ठरले.

    कॅप्ड बॅट्समन

    • राहुल त्रिपाठी 3.40 कोटी (csk)
    • डेव्हॉन कॉनव्हे 6.25 कोटी (csk)
    • एडन मार्रक्रम 2 कोटी ( lsg)
    • जॅक फ्रेजर मॅकगर्क 5.50 कोटी (pbks)
    • हॅरी ब्रकू याला दिल्ली कॅपिटल्सने 6 कोटी
  • 24 Nov 2024 07:11 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : वेंकटेश अय्यर याला लॉटरी, केकेआरकडून 23 कोटी 75 लाख रुपये

    वेंकटेश अय्यर याला लॉटरी लागली आहे. वेंकटेश अय्यर याच्यासाठी केकेआरने 23 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत.

    वेंकटेश अय्यरची चांदी, केकेआरकडून 23 कोटी 75 लाख रुपये

  • 24 Nov 2024 07:07 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : देवदत्त पडीक्कल आणि डेव्हिड वॉर्नर अनसोल्ड

    ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि टीम इंडियाचा युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल हे दोघेही दुर्देवी ठरले आहेत. या दोघांनाही कुणीही आपल्या टीममध्ये घेण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे दोघेही अनसोल्ड ठरले आहेत.

  • 24 Nov 2024 05:35 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : मॉर्की सेट 2 मधील बोली पूर्ण, कुणाला किती कोटी?

    आयपीएल ऑक्शन 2025 मधील 2 सेटमधील 6 मॉर्की खेळाडूंवरील बोली पूर्ण झाली आहे. या दुसऱ्या सेटमध्ये मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर,  युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, लियाम लिविंगस्टोन आणि केएल राहुल यांचा समावेश होता.  कुणाला किती कोटी आणि कोणत्या टीमने घेतलं जाणून घेऊयात.

    • मोहम्मद शमी : हैदराबाद, 10 कोटी, लखनऊ
    • डेव्हिड मिलर – 7.5 कोटी, लखनऊ
    • युझवेंद्र चहल : 18 कोटी, पंजाब
    • मोहम्मद सिराज : 12.25 कोटी, गुजरात
    • लियाम लिविंगस्टोन : 8.75 कोटी, आरसीबी
    • केएल राहुल : 14 कोटी, दिल्ली
  • 24 Nov 2024 04:57 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : मार्की प्लेअर सेट 1 मधील सोल्ड खेळाडू, ऋषभ पंत सर्वात महागडा

    आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मधील मार्की प्लेअर सेटमधील 6 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ऋषभ पंत हा या सेटमधील आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

    पहिल्या सेटमधील 6 खेळाडूंची किंमत आणि टीम

    • ऋषभ पंत : 27 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
    • श्रेयस अय्यर : 26 कोटी 75 लाख, पंजाब किंग्स
    • अर्शदीप सिंह : 18 कोटी, पंजाब किंग्स
    • जॉस बटलर : 15 कोटी 75 लाख, गुजरात
    • मिचेल स्टार्क : 11 कोटी 75 लाख, दिल्ली
    • कगिसो रबाडा : 10 कोटी 75 लाख, गुजरात
  • 24 Nov 2024 04:40 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू, श्रेयसचा रेकॉर्ड ब्रेक

    ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्येच श्रेयस अय्यर याचा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असण्याचा बहुमान हिसकावला आहे. श्रेयस अय्यर याला पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं. मात्र त्यानतंर लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी श्रेयसच्या तुलनेत 25 लाख रुपये जास्त मोजले आणि 27 कोटींमध्ये आपल्या गोटात घेतलं.

  • 24 Nov 2024 04:30 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात

    आयपीएल 17 व्या मोसमातील सर्वात महागडा ठरलेल्या मिचेल स्टार्कला यंदा झटका बसला आहे.. दिल्ली कॅपिट्ल्सने मिचेलला 11 कोटी 75 लाख रुपयांमध्ये आपल्या गोटात घेतंल आहे. त्यामुळे मिचेलला काही कोटींचं नुकसान झालं आहे. स्टार्कची बेस प्राईज ही 2 कोटी होती.

  • 24 Nov 2024 04:24 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : जॉस बटलर गुजरातचा, किती मिळाले?

    इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला गुजरातने ऑक्शनमधून आपल्या गोटात घेतलं आहे. जोसला 15.75 कोटी रुपयांमध्ये गुजरातने घेतलं आहे.

  • 24 Nov 2024 04:18 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू

    श्रेयस अय्यर याने इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपये मोजून त्याला पंजाब किंग्सने आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 24 Nov 2024 04:02 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : कगिसो रबाडाला गुजरात टीमकडून 10 कोटी 75 लाख

    वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला गुजरात टीमकडून 10 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं आहे. रबाडाच्या आधीच्या पंजाब संघाने त्याला आरटीएमद्वारे घेण्यास नकार दिला. त्यामुळे रबाडा आता गुजरातचा झाला आहे.

  • 24 Nov 2024 03:57 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : अर्शदीप सिंह पंजाबचाच, पीबीकेसकडून 18 कोटी, RTM द्वारे घेतलं

    पंजाब किंग्सने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आरटीएमचा उपयोग करत 18 कोटी रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं आहे. अर्शदीपची बेस प्राईज ही 2 कोटी होती.

  • 24 Nov 2024 03:53 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : अर्शदीप सिंहपासून मेगा ऑक्शनला सुरुवात, बॉलरसाठी जोरदार चुरस

    वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याच्यापासून मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. अर्शदीपची बेस प्राईज ही 2 कोटी आहे. मात्र अर्शदीपला आपल्या गोटात घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अर्शदीपला आता किती भाव मिळतो? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

  • 24 Nov 2024 03:41 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : आयपीएल मेगा ऑक्शनला सुरुवात

    आयपीएल 2025  मेगा ऑक्शनला सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे सुरुवात झाली आहे.  फ्रँचायजी अनेक खेळाडूंना आपल्यात ताफ्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अवघ्या काही मिनिटानी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

  • 24 Nov 2024 02:35 PM (IST)

    जयंत पाटील सांगलीतून मुंबईकडे रवाना

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीतुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूर येथून वाहनाने जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूर मधील विजयाचा जल्लोष टाळत जयंत पाटलांनी मौन बाळगले होते.

  • 24 Nov 2024 02:31 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Updates : पहिल्या दिवशी फक्त 87 खेळाडूंवर बोली लागणार

    मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अर्थात आज 24 नोव्हेंबरला 577 पैकी फक्त 84 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. उर्वरित इतर खेळाडूंवर दुसर्‍या दिवशी अर्थात 25 नोव्हेंबरला उर्वरित खेळाडूंवर झटपट बोली लावली जाणार आहे.

  • 24 Nov 2024 02:25 PM (IST)

    अजित पवारांचा उमेश पाटील, राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन

    अजित पवारांचा उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांचा दारुण पराभव केला.

  • 24 Nov 2024 02:15 PM (IST)

    अमरावतीत महायुतीचा दणदणीत विजय

    अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. विजय उमेदवारांचे अमरावतीच्या राजापेठ भाजप कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला.

  • 24 Nov 2024 02:07 PM (IST)

    कोणत्या टीमकडे किती रक्कम?

    आयपीएल मेगा ऑक्श 2025 मध्ये एकूण 10 संघ मिळून 641 कोटी रुपये खर्च करु शकतात. पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.5 कोटी तर राजस्थानकडे सर्वात कमी 41 कोटी इतकी रक्कम आहे.

    • पंजाब किंग्स :110.50 कोटी
    • चेन्नई : 55 कोटी
    • बंगळुरु : 83 कोटी
    • दिल्ली : 73 कोटी
    • गुजरात : 69 कोटी
    • लखनऊ : 69 कोटी
    • कोलकाता : 51 कोटी
    • मुंबई : 45 कोटी
    • हैदराबाद : 45 कोटी
    • राजस्थान : 41 कोटी
  • 24 Nov 2024 01:45 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : एका संघात किमान आणि कमाल किती खेळाडू ठेवण्याची अट?

    नियमांनुसार जास्तीत जास्त 25 तर कमीत कमी 18 खेळाडू टीममध्ये ठेवता येणार. तसेच त्या 25 खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू ठेवण्याची सूट आहे. तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 पेक्षा अधिक खेळाडूंना घेता येणार नाही.

  • 24 Nov 2024 01:09 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : कोणत्या टीमकडून किती आणि कोणते खेळाडू रिटेन?

    आयपीएल मेगा ऑक्शनआधी रिटेन्शनसाठी नियमांनुसार, प्रत्येक संघाला 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. त्यानुसार आरटीएम अर्थात राईट टु मॅच कार्ड पर्यायाचा समावेशही आहे. यामध्ये जास्तीत 2 अनकॅप्ड भारतीय खेळाडू घेण्याची तरतूद आहे. तसेच जास्तीत जास्त 5 खेळाडू कॅप्ड खेळाडू कायम अर्थात रिटेन ठेवण्याची मुभा होती. त्यात सर्व 5 भारतीय किंवा सर्व 5 परदेशी खेळाडू रिटेन करण्याची सूट होती. तर फक्त 1 अनकॅप्ड खेळाडू ठेवण्याची सूट होती.

    त्यानुसार मेगा ऑक्शनआधी एकूण 10 संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानुसार कोलकाता आणि राजस्थान या 2 संघांनी सर्वाधिक प्रत्येकी 6-6 खेळाडू रिटेन केले. कोणत्या संघाने किती आणि कोणते खेळाडू आपल्यासह कायम ठेवेल? जाणून घेऊयात.

    • मुंबई : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा. (एकूण : 5)
    • चेन्नई : ऋतुराज गायकवाड, मथीथा पथीराणा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी. (एकूण : 5)
    • बंगळुरु : विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल. (एकूण : 3)
    • दिल्ली : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टह्स आणि इशान पोरेल. (एकूण : 4)
    • कोलकाता : रिंकु सिंह, वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमनदीप सिंह. (एकूण : 6)
    • लखनऊ : निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक अग्रवाल, मोहसिन खान आणि आयुष बदोनी. (एकूण : 5)
    • हैदराबाद : पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेन्रिक क्लासेन आणि ट्रेव्हिस हेड. (एकूण : 5)
    • गुजरात : राशिद खान, शुबमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान. (एकूण : 5)
    • पंजाब : शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह. (एकूण : 2)
    • राजस्थान : संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा. (एकूण : 6)
  • 24 Nov 2024 12:58 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : कोणत्या टीमला किती खेळाडूंची गरज? विदेशी खेळाडूंची मर्यादा जाणून घ्या

    • चेन्नई – 20, 7 विदेशी खेळाडू
    • आरसीबी – 22, 8 विदेशी खेळाडू
    • एसआरएच – 20, 5 विदेशी खेळाडू
    • मुंबई – 20, 8 विदेशी खेळाडू
    • दिल्ली – 21, 7 विदेशी खेळाडू
    • राजस्थान – 19, 7 विदेशी खेळाडू
    • पंजाब – 19, 8 विदेशी खेळाडू
    • कोलकाता – 19, 6 विदेशी खेळाडू
    • गुजरात – 20, 7 विदेशी खेळाडू
    • लखनऊ – 20, 7 विदेशी खेळाडू
  • 24 Nov 2024 12:51 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : 46 खेळाडू रिटेन, आता 577 मधून 204 जणांची होणार निवड

    आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी थोड्यातच वेळात मेगा ऑक्शनला सुरुवात होणार आहे. या ऑक्शनमध्ये 577 खेळाडू आहेत. ऑक्शनमधील 577 खेळाडूंमध्ये 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये 3 असोसिएट देशांचे खेळाडू आहेत. या मेगा ऑक्शनमधून 10 संघांकडून 204 खेळाडूंची निवड केली जाणार आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त 70 परदेशी खेळाडूंना घेता येणार आहे. तर त्याआधी 10 संघांनी रिटेन्शनमध्ये एकूण 46 खेळाडू कायम ठेवले आहेत.

  • 24 Nov 2024 12:29 PM (IST)

    2 दिवस, 577 खेळाडू आणि 641 कोटी, थोड्याच वेळात मेगा ऑक्शन

    आयपीएल 2025 मेगा ऑक्शन एकूण 2 दिवस चालणार आहे. या मेगा ऑक्शमध्ये 204 जागांसाठी 577 खेळाडू ऑक्शनमध्ये आपलं नशिब आजमवणार आहेत.  या ऑक्शनसाठी किमान बेस प्राईज ही 30 लाख तर कमाल 2 कोटी इतकी आहे.  10 संघांनी अनेक स्टार खेळाडू रिलीज केले आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आपण या लाईव्ह ब्लॉगमधून या मेगा ऑक्शनमधील प्रत्येक अपडेट्स जाणून घेणार आहोत.

Published On - Nov 24,2024 12:26 PM

Follow us
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.