IPl Final 2023 : रविंद्र जडेजाला मारायची होती मिठी, पत्नीने पकडले त्याचे पाय, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल!

Rivaba Jadeja viral video : सामना संपल्यानंतर जडेजा आणि धोनीचा एक व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये धोनीने जडेजाला उचलून घेतलेल आहे. अशातच सोशल मीडियावर आणख एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जडेजाची पत्नी त्याच्या पाया पडत आहे.

IPl Final 2023 : रविंद्र जडेजाला मारायची होती मिठी, पत्नीने पकडले त्याचे पाय, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल!
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 8:56 PM

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि  गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या फायनलमध्ये सीएसके संघाने बाजी मारली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात सुपरस्टार खेळाडू रवींद्र जडेजा याने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर जडेजा आणि धोनीचा एक व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये धोनीने जडेजाला उचलून घेतलेल आहे. अशातच सोशल मीडियावर आणख एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जडेजाची पत्नी त्याच्या पाया पडत आहे.

पाहा व्हिडीओ- 

ऑल राऊंडर रविंद्र जडेजा शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाही हे अनेकदा आपण पाहिलं आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये ते प्रत्यक्षपणे दिसूनही आलं. श्वास रोखून ठेवायला लावलेल्या सामन्यात जडेजाने कडक खेळी करत संघाला पाचव्यांदा चॅम्पिअन बनवलं. फायनल संपल्यानंतर जडेजाचे जोरदार कौतुक होत आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही खूप व्हायरल होत आहेत. आता जडेजाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो पत्नी रिवाबा जडेजासोबत दिसत आहे.

विजेतेपदाचा सामना संपल्यानंतर रिवाबा जड्डूला भेटण्यासाठी मैदानात आली. त्यावेळी जडेजाने मिठी करण्यासाठी हात पुढे केले पण रिवाबाने आधी त्याच्या पायाला स्पर्श केला. यानंतर रिवाबा आणि जडेजाने मिठी मारली. सोशल मीडियावर अनेकांनी रिवाबाच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. ही भारतीय संस्कृती असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रिवाबा जडेजा भाजप पक्षाची आमदार आहे मात्र भर मैदानात आपण आमदार आहोत असा कसलाही गर्व न करता तिने जडेजाच्या पायाला स्पर्श केल्याने तिचं सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी कौतुक करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.