TV वर IPL च्या एका मॅचसाठी चॅनल मोजणार 49 कोटी रुपये, आयपीएल Media Rights बद्दल जाणून घ्या मोठ्या गोष्टी

2023 ते 2028 सीजनसाठी मीडिया राइट्स दिले जाणार आहेत. मीडिया राइट्ससाठी बोलीची रक्कम 50 ते 60 हजार कोटीपर्यंत जाऊ शकते.

TV वर IPL च्या एका मॅचसाठी चॅनल मोजणार 49 कोटी रुपये, आयपीएल Media Rights बद्दल जाणून घ्या मोठ्या गोष्टी
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 10:36 AM

मुंबई: IPL 2022 चा 15 वा सीजन नुकताच संपला असून या लीग संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढच्या सीजनसाठी आयपीएलच्या मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव होणार आहे. 2023 ते 2028 सीजनसाठी मीडिया राइट्स दिले जाणार आहेत. मीडिया राइट्ससाठी बोलीची रक्कम 50 ते 60 हजार कोटीपर्यंत जाऊ शकते. आयपीएल मीडिया राइट्ससाठी टेंडर आधीच निघालं असून एकूण पाच कंपन्यांमध्ये चुरस आहे. यावेळी BCCI च्या तिजोरीत घसघशीत रक्कम जमा होणार आहे. याआधी सुद्धा मीडिया राइट्सचा लिलाव झालेला, तेव्हा बीसीसीआयला मोठी रक्कम मिळाली होती. यापूर्वी 2018 ते 2022 असं चार वर्षांसाठी मीडिया राइट्सचा लिलाव झाला होता. त्यावेळी बीसीसीआयला 16,300 कोटी रुपये मिळाले होते. यावेळी बीसीसीआयच्या तिजोरीत तीन ते चार पट जास्त रक्कम जमा होईल.

लिलावाबद्दलच्या काही मोठ्या गोष्टी

  1. क्रिकबजच्या वृत्तानुसार, चार पॅकेजसाठी हा लिलाव होईल. भारतीय उपखंडातील टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म, भारतीय डिजिटलसाठी स्पेशल पॅकेज आणि उर्वरित जगाचा समावेश आहे.
  2. बीसीसीआय या लिलावासाठी व्हर्च्युअल वर्कशॉप आणि मॉक ऑक्शनही करतेय. मीडिया राइट्स मिळवण्याच्या स्पर्धेतील कंपन्यांना सर्व प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी हे सुरु आहे.
  3. टीव्ही राइट्सचा लिलाव 49 कोटी रुपयापासून सुरु होईल. डिजिटल राइट्सचा लिलाव 33 कोटीपासून सुरु होईल. एकदा बोली लावल्यानंतर पुढची बोली लावण्यासाठी 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल.

एकूण 10 टीम्स

आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 संघ होते. पुढच्या सीजनमध्येही एवढेच संघ असतील. आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. 10 टीम्स झाल्यानंतर रोमांच वाढेल अशी अपेक्षा होती. पण टीव्ही रेटिंग्सच्या हिशोबाने पहिला सीजन खास राहिला नाही. टीआरपीमध्येही मोठी पडझड झाली. पुढच्या सीजनमध्ये आयपीएलच्या टीआरपीमध्ये वाढ करण्याचं बीसीसीआयचं प्रमुख लक्ष्य असेल. इंडियम प्रीमियर लीग जगातील एक यशस्वी लीग स्पर्धा आहे. जगातील नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. इथे चांगल्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.