IPL Media Rights: 44 हजार कोटींना टीवी-डिजिटल राइट्सची विक्री, रिलायन्स-सोनीने मारली बाजी

आयपीएलच्या मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव सुरु आहे. 2023-27 अशा पाच वर्षांसाठी सामन्याचे प्रसारण अधिकार दिले जाणार आहेत.

IPL Media Rights: 44 हजार कोटींना टीवी-डिजिटल राइट्सची विक्री, रिलायन्स-सोनीने मारली बाजी
IPLImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:17 PM

मुंबई: आयपीएलच्या मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव सुरु आहे. 2023-27 अशा पाच वर्षांसाठी सामन्याचे प्रसारण अधिकार दिले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-ऑक्शनमध्ये 410 सामन्यांसाठी एकूण 44,075 कोटी रुपयांना हे अधिकार विकले गेले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्स 23,575 कोटींना तर पॅकेज बी मध्ये डिजिटल राइट्स 20,500 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. म्हणजे टीवी राइट्समधून प्रतिसामना 57.5 कोटी तर डिजिटल राइट्समधून प्रति मॅच 50 कोटी रुपये मिळणार आहेत. टीवी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या (Digital Platform) एका सामन्यासाठी BCCI ला 107.5 कोटी रुपयांची रक्कम मिळेल. पुढच्या पाचवर्षांसाठी राइट्सचा हा लिलाव झाला आहे. 2017 साली स्टार इंडियाने आयपीएलचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी जितकी रक्कम मोजली होती, त्यापेक्षा अडीचपट जास्त मुल्य वाढलं आहे.

दोन कंपन्यांना मिळाला अधिकार

रिपोर्ट्सनुसार आयपीएलचे टीवी राइट्स सोनीजवळ तर डिजिटल राइट्स वायकॉम 18 म्हणजे रिलायन्सने मिळवले आहेत. अजून याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. पॅकेज सी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यातील नॉन एक्सक्लूसिव राइट्स आहेत. पॅकेड डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार आहेत. आजच याचाही लिलाव पार पडणार आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगला टाकलं मागे

एक मॅचमधून होणाऱ्या कमाईत बीसीसीआयने लोकप्रिय फुटबॉल लीग इंग्लिशन प्रीमियर लीगला मागे टाकलं आहे. या फुटबॉल लीगमधील प्रतीमॅच किंमत 81 कोटी रुपये आहे. पण आता आयपीएल यापुढे निघून गेलं आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी आयपीएलने हा आकाड पार केला होता. आज दुसऱ्यादिवशी यावर शिक्कामोर्तब झालं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.