IPL 2023 Points Table | केकेआरकडून झालेल्या पराभवानंतर धोनीची सीएसकेही ‘गॅसवर’, पाहा आता कसं असणार समीकरण!
IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : केकेआरने विजय मिळवत सीएसके संघाला प्ले-ऑफचं तिकीट मिळवू दिलं नाही. धोनीच्या माहीला आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलाकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यामध्ये केकेआर संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसके संघाने निर्धारित 20 षटकात 144 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाची खराब सूरूवात झाली होती. मात्र रिंकू सिंग आणि नितीश राण यांनी 98 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
केकेआरने जर आजचा सामना गमावला असता तर ते लीगच्या बाहेर फेकले गेले असते. कोलकाताच्या रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी अर्धशतके करत संघाला विजयाच्या जवळ आणलं. 30 धावांवर संघाच्या विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर रिंकू आणि नितीशने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी 98 धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
सीएसकेचा दीपक चहर वगळता इतर कोणत्याही गोलंदा़जाला यश मिळवता आलं नाही. रिंकू सिंग एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्तात रनआऊट झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2012 नंतर पहिल्यांदाच कोलकाताने सीएसकेला चेपॉकला पराभूत केलं आहे.
केकेआरचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर चेन्नईला आता प्लेऑफ क्वालिफाय करण्यासाठी आपल्या पुढच्या दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.