IPL 2023 Points Table | रोहितच्या ‘पलटण’कडून एक घाव दोन तुकडे, पॉइंट्स टेबल पाहिलंत का? एकदा पाहाच!
वानखेडे स्टेडिअमवर केलेल्या पराभवाचा बदला पलटणने घेतलाच, मोहालीमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून मोठ्या थाटात विजय मिळवला.
![IPL 2023 Points Table | रोहितच्या 'पलटण'कडून एक घाव दोन तुकडे, पॉइंट्स टेबल पाहिलंत का? एकदा पाहाच! IPL 2023 Points Table | रोहितच्या 'पलटण'कडून एक घाव दोन तुकडे, पॉइंट्स टेबल पाहिलंत का? एकदा पाहाच!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/04053804/Tilak-Varma-1.jpg?w=1280)
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पलटणने दमदार विजय मिळवलेला आहे. पंजाबने दिलेल्या 215 धावांचं लक्ष मुंबईने 6 विकेट्स आणि 7 बॉल राखून पूर्ण केलं आहे. या विजयासह मुंबईने वानखेडे मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला घेतलाच तर त्यासोबतच पॉइंट टेबलमध्ये सुद्धा मुसंडी मारली आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
मुंबई इंडियन्स संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवत पॉइंट टेबल मध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा आज पराभव झाल्यामुळे 10 गुणांसह पॉईंट टेबल मध्ये सातव्या स्थानी आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी, मुंबई आणि पंजाब या संघाचे 10 गुण झालेले आहेत. अनुक्रमे संघ पॉइंट टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फक्त रनरेटच्या आधारावर हे संघ एकाखालोखाल आहेत. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये नेट रनरेट हा एक्स फॅक्टर ठरणार आहे.
सामन्याचा धावता आढावा
पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी केली होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना पंजाबने 214 धावांचं लक्ष मुंबईला दिलं होतं. यामध्ये पंजाबतर्फे लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 आणि जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाबने 200 धावांचा पल्ला पार केला होता.
मुंबईकडून हे लक्ष पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या सलामीवीरांनी एकदम निराशाजनक सुरुवात केली. रोहित शून्यावर झाला, त्यानंतर ग्रीन फलंदाजीला आला मात्र 23 धावांवर तोसुद्धा आऊट झाला. ग्रीन आऊट झाल्यावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. दुसरीकडे ईशान किशन यानेही एक बाजू लावून धरली होती. दोघांनी अनुक्रमे 75 धावा आणि 66 धावा केल्या. शेवटी तिलक वर्मा याने आक्रमक फलंदाजी करत सिक्स मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान