Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Points Table 2022: पंजाबच्या विजयाने प्लेऑफची रंगत वाढली, SRH, KKR ला फटका, एकदा पॉइंटस टेबलवर नजर मारा

IPL Points Table 2022: या सामन्याआधी पॉइंटस टेबलमध्ये 7 विजयासह आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर होता, तर पंजाब किंग्सचा संघ 5 विजयासह 8 व्या स्थानावर होता.

IPL Points Table 2022: पंजाबच्या विजयाने प्लेऑफची रंगत वाढली, SRH, KKR ला फटका, एकदा पॉइंटस टेबलवर नजर मारा
PBKS Win over RCB Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 11:57 PM

मुंबई: IPL 2022 स्पर्धेत प्लेऑफमध्ये दाखल होण्याची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RCB vs PBKS) सामना झाला. आयपीएलमधला हा 60 वा सामना होता. मुंबईच्या ब्रबॉर्न स्टेडियमवर ही लढत झाली. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 54 धावांनी विजय मिळवला. RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला. PBKS ने आरसीबीला विजयासाठी 210 धावांचे टार्गेट दिले. पण आरसीबीने निर्धारित 20 षटकात 9 बाद 155 धावा केल्या. या विजयासह पंजाबने महत्त्वाचे दोन पॉइंटस घेतले. पंजाबचे प्लेऑफ मधील आव्हान अद्यापही टिकून आहे. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. रजत पाटीदारने 26 आणि विराट कोहलीने 20 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. पंजाबच्या गोलंदाजांनी आज अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जॉनी बेयरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे दोन पंजाबच्या विजयाचे नायक ठरले.

पॉइंटस टेबलची स्थिती

या सामन्याआधी पॉइंटस टेबलमध्ये 7 विजयासह आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर होता, तर पंजाब किंग्सचा संघ 5 विजयासह 8 व्या स्थानावर होता. पण आजच्या आरसीबीवरील विजयामुळे पंजाबच्या क्रमावरीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन टीम्सना फटका बसला आहे. पंजाब किंग्सचे अजून दोन सामने बाकी असून त्यांचे 16 पॉइंटस होऊ शकतात. पराभवानंतरही आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे. RCB चा आता फक्त एक सामना उरला आहे.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

जॉनी बेयरस्टो, लिव्हिंगस्टोन विजयाचे हिरो

आज सलामीला आलेल्या जॉनी बेयरस्टो आणि शिखर धवनने पहिल्या ओव्हरपासून आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात पंजाब किंग्सने 1 बाद 83 धावा केल्या. जॉनी बेयरस्टोने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याने 29 चेंडूत 66 धावा चोपल्या. यात 4 चौकार आणि सात षटकार होते. शिखर धवनही दुसऱ्याबाजूने त्याला चांगली साथ देत होता. तो 21 धावांवर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. भानुका राजपक्षे आज लवकर अवघ्या 1 रन्सवर आऊट झाला. 101 धावांवर जॉनी बेयरस्टो तंबुत परतला. त्यानंतर लियाम लिव्हिंस्टोनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी करुन आरसीबीच्या गोलंदाजांना हतबल करुन सोडलं. लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावा चोपल्या. यात पाच चौकार आणि 4 षटकार होते.

दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.