IPL 2022 points Table: पंजाब किंग्सच्या विजयामुळे पॉइंटस टेबलमध्ये चुरस, तिसऱ्या-चौथ्या नंबरसाठी ‘काँटे की टक्कर’
IPL 2022 points Table: राजस्थान रॉयल्स 12 पॉइंटससह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानला उर्वरित चार पैकी कमीत कमी दोन सामने जिंकण आवश्यक आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारपर्यंत ग्रुप स्टेजचे 48 सामने झाले आहेत. सध्या पॉइंटस टेबलमध्ये 10 पैकी 9 संघांमध्ये प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी चुरस रंगली आहे. सलग आठ पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे. मंगळवारी पंजाब किंग्सने (Punjab kings) गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) नमवल्यामुळे प्लेऑफची शर्यत अधिकच रंगतदार बनली आहे. पॉइंटस टेबलवर नजर टाकली, तर 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. जवळपास ते प्लेऑफमध्ये पोहोचलेच आहेत. कालची मॅच जिंकली असती, तर गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला असता. लखनौ सुपर जायंट्स 14 पॉइंटससह दुसऱ्या स्थानावर आहे. ते सुद्धा प्लेऑफच्या उंबरठ्यावरच आहेत. गुजरात आणि लखनौ या आयपीएलमधल्या दोन नवीन टीम्स आहेत. हा त्यांच्या डेब्युचा पहिलाच सीजन आहे.
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी राजस्थानला किती सामने जिंकावे लागतील?
राजस्थान रॉयल्स 12 पॉइंटससह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानला उर्वरित चार पैकी कमीत कमी दोन सामने जिंकण आवश्यक आहे. राजस्थान प्लेऑफ मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरु शकतो. सध्या पॉइंटस टेबलमध्ये तीन संघांचे एकसमान पॉइंटस आहेत. सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या तीन टीम्सचे प्रत्येकी दहा पॉइंटस आहेत. ते क्रमश: चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या नंबरवर आहेत. यात हैदराबादच्या संघाच्या पाच तर पंजाब-बँगोलरचे प्रत्येकी चार सामने बाकी आहेत.
IPL पॉइंट्स टेबल
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
चौथ्या स्थानसाठी पहायला मिळणार मोठी लढाई
या तीन टीम्सनंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी आठ पॉइंटस आहेत. सहा गुणांसह चेन्नई सुपर किंग्स नवव्या स्थानावर आहे. दिल्ली आणि चेन्नईचे प्रत्येकी पाच-पाच सामने बाकी आहेत. कोलकाताला चार सामने खेळायचे आहेत. राजस्थानने प्लेऑफमध्ये तिसरा नंबर पक्का केला, तर उर्वरित चौथं स्थान मिळवण्यासाठी या सहा टीम्समध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळेल.