IPL 2022 Points Table: धोनीचा संघ KKR च्या एक पाऊल पुढे, CSK च्या विजयामुळे बँगलोरला आघाडी, एकदा पॉइंटस टेबलवर नजर मारा

IPL 2022 Points Table: रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई आणि बँगलोरने मोठ्या फरकाने विजय मिळवून आपली स्थिती अजून बळकट केली.

IPL 2022 Points Table: धोनीचा संघ KKR च्या एक पाऊल पुढे, CSK च्या विजयामुळे बँगलोरला आघाडी, एकदा पॉइंटस टेबलवर नजर मारा
MS Dhoni-Faf du plessisImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 8:31 AM

मुंबई: IPL 2022 मध्ये लीग स्टेजचे 55 सामने पूर्ण झाले आहेत. प्लेऑफची (Playoff) शर्यत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. रविवारी 8 मे रोजी डबल हेडरचे दोन सामने झाले. या दोन्ही सामन्यांचे निकाल एकतर्फी लागले. त्यामुळे प्लेऑफचं चित्र हळूहळू स्पष्ट होतं आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सनरायजर्स हैदराबादला (RCB vs SRH) मोठ्या फरकाने हरवून चौथ्या स्थानावरील आपली स्थिती मजबूत केली. तेच चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे चेन्नईचा फायदा झालाच पण बँगलोरला सुद्धा मदत झाली.

रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई आणि बँगलोरने मोठ्या फरकाने विजय मिळवून आपली स्थिती अजून बळकट केली. चेन्नईकडून डेवन कॉनवेने 87 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर मोइन अलीने दमदार फिरकी गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 208 धावा केल्या. दिल्लीचा डाव अवघ्या 117 धावात आटोपला. 91 धावांनी मिळवलेल्या या विजयाने CSK ला दोन पॉइंटस मिळाले. त्याचवेळी त्यांच्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झाली. CSK आणि KKR चे आता प्रत्येकी 8-8 पॉइंट्स झाले आहेत. नेट रनरेटमधल्या फरकामुळे चेन्नई आता कोलकाताच्या पुढे आहे. बऱ्याच दिवसानंतर चेन्नई 9 स्थानावरुन 8 व्या क्रमांकापर्यंत पोहोचली आहे.

RCB ची आघाडी

एकाबाजूला सीएसके जिंकली, दुसऱ्याबाजूला फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बँगलोरने SRH वर 67 धावांनी मोठा विजय मिळवला. डू प्लेसिसने स्वत: कॅप्टन इनिंग्स खेळताना 73 धावा केल्या. त्या बळावर बँगलोरने SRH समोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंन्दु हसरंगाने पाच विकेट काढून एसआरएचच्या डावाला मोठं खिंडार पाडलं. बँगलोरने हा सामना 67 धावांनी जिंकला.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

दोन्ही मॅचमुळे बँगलोरलाच फायदा

कालच्या सामन्यात जे दोन निकाल लागले, त्याचा सर्वात जास्त फायदा बँगलोरलाच झाला. सर्वप्रथम RCB ने SRH ला हरवलं व त्यांना आपली बरोबरी करण्यापासून रोखलं. SRH चे 10 पॉइंटस तर बँगलोरचे 12 पॉइंटस होते. SRH जिंकली असती, तर ते बँगलोरच्या पुढे निघून गेले असते. आता दोन्ही टीम्समध्ये 4 पॉइंटसच अंतर आहे. CSK ने दिल्लीला हरवून बँगलोरला मदतच केली. हैदराबादप्रमाणे दिल्ली सुद्धा बँगलोरच्या जवळ होती. दिल्लीचे 10 पॉइंटस होते. ते CSK ला हरवून 12 पॉइंटसपर्यंत पोहोचले असते. पण आता दोन्ही टीम्स हरल्यामुळे बँगलोर त्यांच्यापेक्षा चार पॉइंटसनी पुढे आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.