IPL 2023 Points Table | मुंबईला पराभूत केल्यानंतर गुजरातला जबरदस्त फायदा, चेन्नईनंतर अशी कामगिरी करणारी दुसरी टीम
IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघाचे प्रत्येकी सात सामने झाले असून उर्वरित सात सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. चला जाणून घेऊयात गणित कसं आहे ते...
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांचा मध्यांतर पार पडला. 14 पैकी प्रत्येक संघाचे सात सामने पार पडले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सात सामन्यात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 55 धावांनी पराभूत करत दोन गुणांसह नेट रनरेटमध्येही चांगली झेप घेतली आहे. तर मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे जबरदस्त फटका बसला आहे. आता सुपर 4 मध्ये येण्यासाठी मुंबईला उर्वरित सर्वच्या सर्व सामने जिंकणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
गुणतालिकेत मोठा बदल
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव झाल्याने नेट रनरेट चांगलाच पडला आहे. त्यामुळे आता स्पर्धेतील चुरस चांगलीच वाढली आहे. आता उर्वरित 7 सामने प्रत्येक संघासाठी करो या मरो असे असणार आहेत. चेन्नईचा संघ अव्वल स्थानी आहे. दिल्लीचा संघ सर्वात शेवटी आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
चेन्नई सुपर किंग्स 10 गुण आणि +0.662 रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर गुजरात 10 गुण 0.580 रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह तिसऱ्या, लखनऊ 8 गुणांसह चौथ्या, आरसीबी 8 गुणांसह पाचव्या, पंजाब किंग्स 8 गुणांसह सहाव्या, मुंबई 6 गुणांसह सातव्या, कोलकाता 4 गुणांसह आठव्या, हैदराबाद 4 गुणांसह नवव्या आणि दिल्ली 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.