IPL 2023 Points Table | लखनऊने पराभूत केल्याने मुंबईचं प्लेऑफचं काही खरं नाही, आता जर तर गणित असं असेल
आयपीएल 2023 स्पर्धेत अजूनही प्लेऑफचं चित्र काही स्पष्ट नाही. गुजरात टायटन्स सोडलं तर अजूनही इतर सर्व संघांना संधी आहेत. पण ही संधी कशी मिळेल ते जाणून घ्या.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्स सोडलं तर कोणताच संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय झालेला नाही. त्यामुळे जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईला पराभूत करत दोन गुणांची कमाई केली आहे. एकूण 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.लखनऊच्या तुलनेत चेन्नईचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
आरसीबी संघ 12 गुणांसह पाचव्या स्थानावर असून अजूनही दोन सामने उरले आहेत. त्यामुळे 16 गुणांची कमाई करता येईल. दुसरीकडे आरसीबीचा रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. राजस्थान रॉयल्सचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे. आता मुंबई आणि बंगळुरुच्या पराभव आणि रनरेटवर अवलंबून असणार आहे. कोलकात्याचाही एक सामना उरला असून त्यांचही राजस्थानसारखंच आहे.
पंजाब किंगस सध्या 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. मात्र दोन सामने असल्याने 16 गुणांची कमाई करण्याची संधी आहे. मोठा उलटफेर झाल्यास पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये येऊ शकतो.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव झाला आहे. मुंबईच्या पराभवामुळे बंगळुरु, राजस्थान, कोलकाता आणि पंजाबला एक संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना सनराईजर्स हैदराबादसोबत आहे.
कसं असेल मुंबईचं प्लेऑफचं गणित
- मुंबई इंडियन्सनने लखनऊ विरुद्धचा सामना गमावला असून हैदराबाद विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. त्याचबरोबर इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल.
- कोलकात्याने लखनऊला पराभूत करावं, तसेच आरसीबीला हैदराबाद आणि गुजरातने पराभूत करणं गरजेचं आहे.त्याचबरोबर पंजाब विरुद्धचा सामना राजस्थाने जिंकावा.
- चेन्नईला दिल्लीने पराभूत केल्यास मुंबईसाठी प्लेऑफचं गणित सोपं होईल आणि आणखी एक संधी मिळेल.
- हैदराबाद आणि दिल्लीचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे हे दोन संघ टॉपमधील संघांना पराभूत करतील तितकं मुंबईला बरं असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान