IPL 2023 Points Table | केकेआरने आरसीबीला चारी मुंड्या चीत करत साधली सरशी, मुंबईला मोठा फटका
IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : आरसीबी संघाला आज दहा गुण मिळवण्याची संधी होती. मात्र केकेआरने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलेलं आहे. त्यामुळे आरसीबी आठ गुणांसह पाचव्या स्थानी राहिलेली आहे.
मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा पराभव केलेला आहे. या पराभवासह त्यांनी गुणतालिकेमध्ये सरशी साधलेली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स या संघाला याचा फटका बसलेला दिसत आहे. पॉइंट टेबल्स मध्ये पाहिलं तर पहिले चार संघ आहे त्याच स्थानी आहेत. मात्र त्यानंतर खाली एक हालचाल झालेली पाहायला मिळत आहे यामध्ये आरसीबी संघाला आज दहा गुण मिळवण्याची संधी होती. मात्र केकेआरने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलेलं आहे. त्यामुळे आरसीबी आठ गुणांसह पाचव्या स्थानी राहिलेली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आज दोन गुणांची कमाई करत एकूण सहा गुण प्राप्त केले आहेत. तर या आजच्या दोन मिळवलेल्या गुणांसह पॉइंट टेबलमध्ये आता केकेआर संघ सातव्या स्थानी आहे. कोलकाता संघाच्या विजयाचा फटका मुंबई इंडियन्स या संघाला बसलेला आहे. मुंबईच्या संघाची एक स्थानाने घसरण झालेली असून ते आठव्या स्थानी फेकले गेले आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
चेन्नई सुपर किंग्स 10 गुण आणि +0.662 रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर गुजरात 10 गुण 0.580 रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह तिसऱ्या, लखनऊ 8 गुणांसह चौथ्या, आरसीबी 8 गुणांसह पाचव्या, पंजाब किंग्स 8 गुणांसह सहाव्या, कोलकाता 6 गुणांसह सातव्या, मुंबई 6 गुणांसह आठव्या, हैदराबाद 4 गुणांसह नवव्या आणि दिल्ली 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कोलकात्याने दुसऱ्यांदा पराभूत केलं. पहिल्या सामन्यात 81 धावांनी पराभूत केलं. तर आता दुसऱ्या सामन्यात 21 धावांनी पराभवाचं तोंड पाहायला मिळालं. बंगळुरुला पराभूत केल्याने केकेआरच्या स्पर्धेतील आशा अजुनही कायम आहेत. दोन गुणांचा फायदा झाल्याने आता सहा गुण झाले आहेत.
सामन्याचा धावता आढावा
कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये जेसन रॉयची आक्रमक 56 धावांची अर्धशतकी खेळी त्यासोबतच नितेश राणा यानेसुद्धा 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर वेंकटेश अय्यरच्या उपयुक्त 31 धावा तर शेवटला येत रिंकू सिंगने 4 चौकार आणि एक षटकार मारत 18 धावा केल्या होत्या. आरसीबी संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी जबरदस्त सुरुवात केली होती. मात्र संघाच्या 31 धावा असताना वैयक्तिक 17 धावांवर तर त्याला सुयश शर्माने आऊट केलं. त्यानंतर शहबाज अहमद 2 धावा, ग्लेन मॅक्सवेल 5 धावांवर आऊट झाले. यांना मोठी खेळी करता आली नाही.
एकट्या विराटने 54 धावा केल्या होत्या, तर माहीपाल लोमरोर याने 18 चेंडूत तीन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने 34 धावा करत संघाच्या अशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तो सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादात कॅच आऊट झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकही 22 धावांवर बाद झाला. आरसीबी संघाच्या 20 षटकात केवळ 179 धावा झाल्या आणि 21 धावांनी कोलकाताने या सीझनमध्ये आरसीबीवर सलग दुसरा विजय मिळवला.