ind vs wi | टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतर पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाला आठवला देव, म्हणाला….
ind vs wi | त्याने एका ओळीत मनातली गोष्ट सांगितली. IPL गाजवणाऱ्या पंजाब किंग्सच्या या प्लेयरकडे सिलेक्टर्सनी दुर्लक्ष केलं. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याला टीममध्ये स्थान देण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या 5 T20 सामन्यांच्या सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये अनेक बदल पहायला मिळतायत. हे बदल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. वेस्ट इंडिज विरुद्ध निवडलेलल्या टीममध्ये पंजाब किंग्सच्या एका स्फोटक फलंदाजाला स्थान मिळालेलं नाहीय. IPL 2023 चा सीजन या फलंदाजाने गाजवला. त्याने पंजाब किंग्सकडून खेळताना बहुतांश सामन्यात फिनिशिंगच कौशल्य दाखवलं.
त्याच्या याच कामगिरीची दखल घेऊन श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याला टीममध्ये स्थान देण्यात आलं होतं. पण त्याला डेब्युची संधी मिळाली नाही.
टीमला चांगल्या फिनिशरची गरज
आम्ही पंजाब किंग्सच्या ज्या फलंदाजाबद्दल बोलतोय, त्याचं नाव आहे जितेश शर्मा. वेस्ट इंडिज दौऱ्यावर T20 सीरीजसाठी त्याची टीममध्ये निवड होईल, अशी अपेक्षा होती. पण असं झालं नाही. टीम इंडियाला सध्याच्या घडीला एका चांगल्या फिनिशरची आवश्यकता आहे. जितेशने हे काम आपण चांगल्या पद्धतीने करु शकतो, हे दाखवून दिलय.
मुंबईकडून डेब्युची संधी नाही मिळाली
जितेश टीमच्या बाहेर गेल्यानंचर त्याने क्रिकेट डॉट कॉमला इंटरव्यू दिला. त्यात त्याने आपला मुद्दा मांडला. जितेशला याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने एकाओळीत उत्तर दिलं. ‘देवाकडे माझ्यासाठी मोठा प्लान आहे’ असं तो म्हणाला. जितेश 2022 पासून पंजाब किंग्ससाठी खेळतोय. पंजाबकडून खेळताना त्याचा खेळ अधिक बहरला. याआधी तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता. पण त्याला डेब्युची संधी मिळाली नाही. राहुल द्रविड यांच्याकडून काय शिकला?
श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेमुळे जितेशला टीम इंडियासोबत राहता आलं. त्याला त्यावेळी बरच काही शिकायला मिळालं. मी माझ्या खेळाबद्दल राहुल द्रविड यांच्याशी बोललो. त्यांच्याकडून बरच काही शिकलो, असं जितेशने सांगितलं. आपल्याला मोठ्या इनिंग खेळणारा फलंदाज बनायचय, असं त्याने द्रविडला सांगितलं होतं.