AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Mumbai Indians Retained-Released Players 2021: मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याबाबत मोठा निर्णय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians Retained and Released Players) IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे.

IPL Mumbai Indians Retained-Released Players 2021: मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याबाबत मोठा निर्णय
| Updated on: Jan 20, 2021 | 9:51 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलमधील आठ संघ चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स या संघांनी अनेक खेळाडूंना मुक्त केलं आहे, तर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. (IPL Retained and Released Players 2021, Mumbai Indians kept Hardik Pandya and Kieron Pollard)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील भारतीय क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयपीएलसाठी लिलावाची प्रक्रिया पार पडते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे लिलावाची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबली आहे. दरम्यान, इंडियन प्रिमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वीच (प्राथमिक लिलाव) मुंबई इंडियन्स संघाने अनेक खेळाडूंना संघमुक्त करण्याचा (रिलीज करण्याचा) निर्णय घेतला आहे, तर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.

आज अनेक संघानी बड्या खेळाडूंना संघमुक्त केलं. एकट्या मुंबई इंडियन्सने तब्बल 7 खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये मुंबई इंडियन्समध्ये पहिल्या मोसमापासून असलेल्या लसिथ मलिंगाचाही (Lasith Malinga) समावेश आहे. मुंबई इंडियन्सने दुबईत झालेल्या आयपीएल 2020 चं जेतेपद पटकावलं. मुंबई इंडियन्सच्या नावे आतापर्यंत पाच विजेतेपदं आहेत. नव्या मोसमात नव्या खेळाडूंसह उतरण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे.

मुंबई इंडियन्सकडून 7 खेळाडू रिलीज

मुंबईने सात बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा मिचेल मॅक्लेंघन, ऑस्ट्रेलियाचा नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेफ्रन रुदरफोर्ड, फिरकीपटू बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख यांना मुंबई इंडिन्सने आपल्या संघातून मुक्त केलं आहे.

सध्या 18 जण ताफ्यात

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सध्या 18 खेळाडू आहेत. ज्या सात जागा रिक्त झाल्या आहेत, त्या येत्या आयपीएल लिलावात (IPL auction) भरल्या जातील, असं मुंबई इंडियन्सने म्हटलं. मुंबई इंडियन्स चार परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात समावेश करण्याच्या तयारीत आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या संघमालकांनी संघातील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा, धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवअष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात कायम असतील. आतापर्यंत मुंबईला अनेकवेळा विजेतेपद मिळवून देण्यासाठी या खेळाडूंचं योगदान खूप मोठं आहे.

मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू (Mumbai Indians Retained players )

फलंदाज ( Batsmen):

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (WK), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (WK), ख्रिस लीन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (WK)

 अष्टपैलू खेळाडू ( All-rounders) 

किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय

गोलंदाज (Bowlers)

जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान

(Mumbai Indians Retained and Released Players)

संबंधित बातम्या

IPL Teams Ratained and Released Players : पंजाबकडून मॅक्सवेलला डच्चू, बंगळुरुकडून फिंचची उचलबांगडी, सर्व संघाच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

चेन्नईकडून केदार जाधवला नारळ, आता बोली कोण लावणार?

RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड

IPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

Kedar Jadhav | आधी सोशल मीडियावर ट्रोल, आता केदार जाधवच्या नावे नकोसा विक्रम

(IPL Retained and Released Players 2021, Mumbai Indians kept Hardik Pandya and Kieron Pollard)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.