IPL 2025 Retention Live: सीएसकेकडून 5 खेळाडू रिटेन, महेंद्रसिंह धोनी याच्यासह आणखी कोण?

| Updated on: Oct 31, 2024 | 7:47 PM

IPL Retention 2025 Live Updates in Marathi: आयपीएल 2025 मेगा ऑक्शनआधी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची आज अंतिम मुदत संपत आहे. संध्याकाळपर्यंत 10 संघामध्ये कोणते खेळाडू असणार आणि कोण नसणार? हे स्पष्ट होईल. या रिटेन्शनबाबत प्रत्येक लाईव्ह अपडेट्स जाणून घेणार आहोत.

IPL 2025 Retention Live: सीएसकेकडून 5 खेळाडू रिटेन, महेंद्रसिंह धोनी याच्यासह आणखी कोण?
IPL Retention 2025Image Credit source: IPL

LIVE NEWS & UPDATES

  • 31 Oct 2024 06:58 PM (IST)

    सीएसकेकडून 5 खेळाडू रिटेन, महेंद्रसिंह धोनी याच्यासह आणखी कोण?

    आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी एकूण 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. सीएसकेने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवलं आहे. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड, ऑलराउंडर रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथीशा पथीराना यांनाही रिटेन केलं आहे.

    चेन्नईचे पंचरत्न

  • 31 Oct 2024 06:17 PM (IST)

    आरसीबीकडून विराटसह 3 खेळाडू रिटेन, 1 अनकॅप्ड

    आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी फक्त 3 खेळाडूंनाच रिटेन केलं आहे. या तिघांमध्ये 2 कॅप्ड आणि 1 अनकॅप्ड खेळाडूचा समावेश आहे. आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या तिघांना रिटेन केलं आहे.

    आरसीबीला या त्रिकुटावर विश्वास

  • 31 Oct 2024 05:36 PM (IST)

    मुंबईकडून 5 खेळाडू रिटेन, सर्वाधिक रक्कम कुणाला?

    मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 5 खेळाडू रिटेन केले आहेत.  या 5 खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे.

    मुंबईकडून हे 5 खेळाडू कायम

  • 31 Oct 2024 04:08 PM (IST)

    आयपीएल 2025 रिटेन्शनबाबत काही महत्त्वाचे मुद्दे

    मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक टीमला 120 कोटी रुपये मिळणार आहेत. प्रत्येक टीमला राईट टु मॅच कार्डसह जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम राखता येणार आहेत. एका संघाने 5 खेळाडू रिटेन केल्यास त्यांच्या कोट्यातली 75 कोटी रुपये खर्च होतील. त्यामुळे त्या संबंधित संघाकडे ऑक्शनसाठी 45 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहिल.

    या हिशोबाने 5 खेळाडूंसाठी 75 कोटी रुपये

  • 31 Oct 2024 03:27 PM (IST)

    IPL Retention 2025 Live Updates : आयपीएल रिटेन्शन लाईव्ह कुठे पाहता येणार?

    आयपीएल 2025 रिटेन्शन मोबाईलवर पाहण्यासाठी जिओ सिनेमा एप असणं महत्त्वाचं आहे. जिओ सिनेमा एपवर थोड्याच वेळात 4 वाजून 30 मिनिटांनी लाईव्ह पाहता येणार आहे. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

आयपीएल 2025 साठीचं मेगा ऑक्शन नोव्हेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये रेटन्शचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या रिटेन्शनची आज 31 ऑक्टोबर शेवटची मुदत आहे. संध्याकाळपर्यंत सर्व 10 संघांकडून रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतर कोणते खेळाडू हे ऑक्शनसाठी असणार हे स्पष्ट होईल. या रिटेन्शनबाबत आपण सर्व लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहोत.

Published On - Oct 31,2024 3:18 PM

Follow us
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.